inner-banner

ठाणे आणि बोरीवली दरम्यान ट्विन ट्युब रोड बोगदा

ठाणे ते बोरीवली दरम्यान दोन भयुारी मार्ग आणि बोगद्या जवळचा मार्ग व इतर नागरी बांधकामाची कामे करणे.

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्राधिकरणाने ११.८५ किमी लांबीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत ठाणे आणि बोरिवली दरम्यान दुहेरी भुयारी मार्गाचे बांधकाम करण्याचे हाती घेण्यात आले आहे.

सदर प्रकल्पाची एकूण लांबी ११.८४ कि.मी. असून त्यापैकी बोगद्याची लांबी १०.२५ कि.मी. व पोचमार्गांची लांबी १.५९ कि.मी. आहे. सदर बोगद्यांचा व्यास १३.३ मी (२ मुख्य मार्गिका + १ आपत्कालीन मार्गिका) इतका आहे. सदर प्रकल्पामुळे ठाणे आणि बोरिवलीचा प्रवास १२ किमी ने कमी होईल आणि सुमारे १ तास वेळेची बचत होईल.

प्रकल्पाची अंदाजित बांधकाम किंमत ₹. १६६००.४० कोटी (भुसंपादनासह) असून सदर अंदाजित किंमतीस प्राधिकरणाने दि. १० मार्च २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

प्राधिकरणाच्या दिनांक ०४ मे २०२३ रोजीच्या २७५ व्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांची कंत्राटदार म्हणून नियुक्ती करण्यात आली (पॅकेज-१ करिता ₹ ६,१७८ कोटी आणि पॅकेज-२ करिता ₹ ५,८७९ कोटी लघुत्तम देकार प्राप्त). सदर प्रकल्पाचे कामास दिनांक १९ मे २०२३ रोजी सुरुवात झाली.

मे. हिल इंटरनॅशनल प्रोजेक्ट मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड - मे. टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड (जेव्ही) या सल्लागारास दि.२०/०६/२०२४ रोजी कार्यारंभ आदेश (Notice to Proceed) देण्यात आलेले आहेत.

शासनाने सदर प्रकल्पास दिनांक १४ ऑक्टोंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाचे बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास व इतर प्रकल्प अनुषंगिक बाबी जसे की, बाह्य कर्ज सहाय्य/इतर वित्तीय संस्थांमार्फत कर्ज उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर प्रकल्प “महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प” व “निकडीचा सार्वजनिक प्रकल्प” म्हणून घोषित करण्यात आला आहे.

प्रकल्पाची सद्यस्थिती

सद्यस्थितीत, प्रकल्पातील पॅकेज १ (बोरिवली बाजू कडील) कास्टिंग यार्डची उभारणी सुरू आहे तसेच प्रकल्पस्थळी प्रकल्पग्रस्त लोकांच्या पुनर्वसनाचे काम प्रगतीपथावर असून लॉंचिंग शाफ्ट क्षेत्रात पाईलिंगचे काम प्रगतीपथावर आहे.

प्रकल्पातील पॅकेज-२ (ठाणे बाजू कडील) येथील जमीन संपादनाचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. प्रकल्पासाठीच्या कास्टिंग यार्डची उभारणी पूर्ण झाली असून ते कार्यरत आहे. प्रकल्पस्थळी टीबीएम लॉंचिंग शाफ्टचे खोदकाम पुर्ण झाले आहे.

ठाणे बाजू कडील टीबीएम-१ (नायक) चा शुभारंभ कार्यक्रम मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते दि. ०७ एप्रिल २०२६ रोजी पार पडला असून बोगद्याच्या खोदकामास सुरुवात होत आहे. तसेच, टीबीएम-२ (अर्जुन) चे भाग जोडण्याचे काम प्रगतीपथावर असून मे २०२६ मध्ये लाँचिंग प्रस्तावित आहे.

सदर प्रकल्पाची आजपर्यंतची भौतिक प्रगती ११.४९% असून आर्थिक प्रगती १०.३६% आहे.

सदर प्रकल्पावर माहे मार्च, २०२६ अखेर ₹. ३६३०.९६ कोटी एवढा खर्च झाला आहे.

×

Rate Your Experience