Background
प्रकल्पाची पार्श्वभूमी :
- मुंबई महानगर क्षेत्रातील वाढती वाहतूक मागणी आणि वाहतुकीच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या मुंबई बेट शहरातील भूमिगत रस्त्याचे बांधकाम हाती घेतले आहे.
- प्राधिकरणामार्फत मे. पेडॅको कंपनी लिमिटेड यांचा प्रकल्पाचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आले. त्यानुसार, सल्लागारातर्फे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून दि. 14.06.2023 रोजी सादर करण्यात आला.
- प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सुमारे ₹ 8,056 कोटी इतक्या रक्कमेस प्राधिकरणाच्या दि. 10/03/2023 रोजी झालेल्या 154व्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
- सदर प्रकल्पाची पायाभरणी दि. 12 जानेवारी, 2024 रोजी भारताचे माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते पार पडली.
प्रकल्पाचे वर्णन :
- पूर्व मुक्तमार्ग पी. डी’ मेलो रस्त्यावरील मुंबई पत्तन प्राधिकरणाच्या ऑरेंज गेट येथे संपते. वाहतूक पी. डी’ मेलो रस्त्यावरील सध्याच्या रहदारीमध्ये विलीन होते. यामुळे गर्दीच्या वेळेत ट्रॅफिक जोडणी आणि रांगा वर तसेच खाली उतरतात. यामुळे जीपीओ जंक्शन प्रभावित झाले आहे आणि प्रवाशांसाठी सिग्नल वेळेत लक्षणीय वाढ झाली आहे. सदर प्रकल्प मुंबईतील अतिशय गर्दीच्या व शहरी भागाखालून पूर्व मुक्तमार्ग ते सागरी किनारा मार्ग या द्वारे पूर्व-पश्चिम किनारपट्टी जोडणारा व वेगवान सुरळीत वाहतुक व्यवस्था उपलब्ध करुन देणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरणार आहे.
- सदर प्रकल्पाचे संरेखन जुन्या एल्फिन्स्टन पुलाजवळ हार्बर लाइन (मध्य रेल्वे), चर्नी रोड स्टेशनजवळ पश्चिम रेल्वे, लॅमिंग्टन रोड जंक्शनजवळ मेट्रो मार्ग 11 आणि मेट्रो मार्ग 3 आणि मरीन ड्राइव्हच्या खालून जाते आणि मरीन ड्राइव्हवरील नेताजी सुभाषचंद्र बोस रोडवरील बाल भवन जवळ संपते.
- सदर प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि इंधनाची बचत होईल. 2029 मध्ये ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पातून सुमारे 14650 वाहने दैनंदिन प्रवास करतील असा अंदाज आहे.
- प्रकल्पात 2 टनेल बोरिंग मशीन (TBM) वापरून भूमिगत बोगदे बांधण्यात येतील तसेच दोन्ही बाजूंना कट आणि कव्हर आणि ओपन रॅम्प आणि ईस्टर्न फ्री वे पासून एलिव्हेटेड डाउन रॅम्पचा समावेश असणार आहे.
- प्रत्येक बोगद्याच्या आतीलबाजूचा व्यास सुमारे 11 मी. आतीलबाजूचा व्यास सुमारे 12.30 मी. इतका आहे.
- प्रत्येक बोगद्यात 3.2 मीटर रुंदीचे 2 पदरी रस्ते, 1 पदरी आपत्कालीन रस्ता असेल. दोन्ही बोगद्यांमध्ये वेग मर्यादा वेग 80 किमी/तास इतकी असेल.
- बोगद्यांमध्ये योग्य वायुवीजन सुनिश्चित करण्यासाठी, आवश्यक यांत्रिकीकरण प्रस्तावित आहे. आग प्रतिरोधक यंत्रणा, पुरेश्या प्रमाणात प्रकाश व्यवस्था, सुयोग्य व आधुनिक पध्दतीने वाहतूक विनिमयासाठी इन्टीलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (ITS) इत्यांदी बाबींचे प्रयोजन आहे.
- प्रकल्पाची एकूण लांबी 4.9 किमी आहे ज्यामध्ये 3.71 किमी LHS बोगदा आणि 3.73 किमी RHS बोगद्याच्या समाविष्ट आहे.
- बोगद्याच्या क्राउनची कमाल खोली जमिनीपासून सुमारे 52 मीटर आहे, त्यामुळे MML3, मध्यवर्ती रेल्वे, पश्चिम रेल्वे, उंच इमारतींचे पाया आणि इतर विद्यमान इमारती आणि संरचनेसह सुरक्षित अंतर (खोली) राखता येईल.
- बोगद्यांमध्ये संरचना स्थिरता, टिकाऊपणा तसेच क्रॉस पॅसेज इत्यादींसाठी अंतर्गत प्रबलित काँक्रीट प्रीकास्ट लाइनिंग सेगमेंट असतील.
- मुख्य मार्गिका आणि आपत्कालीन पदरी रस्त्याच्या पूर्ण रुंदीवर किमान 5.50 मीटर असे उंच अंतर प्रदान केला जात आहे.
- बोगद्यातील लाईटिंग फिक्स्चर आणि इतर अॅक्सेसरीज सामावून घेण्यासाठी अतिरिक्त आवश्यक उंची प्रदान केली जात आहे.
- बोगद्यातील मार्गिका सिमेंट काँक्रीटचे असतील.
- प्रकल्पाचा प्रस्तावित कालावधी 54 महिने इतका आहे.
- सदर प्रकल्पास युनियन बँक ऑफ इंडिया कडून कर्ज सहाय्यक घेण्यात आले आहे.
प्रकल्पाची सद्यस्थिती
- मे. लार्सन ॲण्ड टुब्रो लि. कामाचे कार्यारंभ आदेश (Notice to Proceed) दि. 20/06/2024 रोजी देण्यात आलेले आहे.
- प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारासाठी, मे. हिल इंटरनॅशनल प्रोजेक्ट मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड - मे. टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड (जेव्ही) या सल्लागारास दि. 20/06/2024 रोजी कामाचे कार्यारंभ आदेश (Notice to Proceed) देण्यात आलेले आहे.
- संबंधित प्राधिकारणांकडून आवश्यक असलेल्या बहुतेक परवानग्या प्राप्त झाल्या आहेत आणि इतर परवानग्या प्राप्त करून घेण्याचा अंतिम टप्प्यात आहेत.
- मा. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्तक्षेपानंतर, मुंबई पत्तन प्राधिकरण (MbPA) यांच्याकडून 1.96 हेक्टर जमीन दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी हस्तांतरित करण्यात आली असून, त्यानंतर लॉन्चिंग शाफ्टची कामे सुरू करण्यात आली आहे.
- प्रकल्पस्थळी लॉन्चिंग शाफ्टचे बांधकाम पूर्ण झाले असून दोन पैकी एका टीबीएम लॉन्चिंगचा समारंभ दिनांक 03.12.2025 रोजी मा. मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. टी
- बीएम (TBM) चे FAT (Factory Acceptance Test) तसेच SAT (Site Acceptance Test) हे लॉन्चिंग शाफ्ट परिसराखाली यशस्वीरित्या पार पडले आहे.
- तसेच दक्षिण दिशेचा बोगद्याचे (South Bound Tunnel-SBT) खोदकाम सुरू झाले असून, सदर कामाची प्रगती 1000 मीटरपेक्षा अधिक झाली आहे.
- प्रकल्पाची सप्टेंबर 2026 पर्यंतची भौतिक प्रगती 33.27% इतकी असून आर्थिक प्रगती 27.04% इतकी आहे.
| S. No. | Title | Download |
|---|---|---|
| 1 | AA | डाउनलोड (2.21 MB) |
| 2 | Work Order for Ms. PADECO | डाउनलोड (309.04 KB) |
| 3 | Letter of Acceptance to Ms. L&T | डाउनलोड (81.83 KB) |
| 4 | Contract Agreement of Ms. L&T | डाउनलोड (2.34 MB) |
| 5 | Letter of Acceptance of Ms. Hill-TCE (JV) | डाउनलोड (1.19 MB) |
| 6 | contract a | डाउनलोड (3.99 MB) |
| 7 | Notice to proceed from MMRDA to Ms. L&T | डाउनलोड (82.04 KB) |
| 8 | Notice to proceed from MMRDA to Ms. Hill-TCE (JV) | डाउनलोड (112.98 KB) |
| 9 | CRZ approval granted by MCZMA in its 171st meeting. | डाउनलोड (2.24 MB) |
| 10 | Msrdc in principal noc pdf | डाउनलोड (521.49 KB) |
| 11 | Mumbai Port Authority In-principle NOC. | डाउनलोड (496.55 KB) |
| 12 | Joint CP (Traffic) In- principal NOC. | डाउनलोड (332.8 KB) |
| 13 | MCZMA NOC 198th MoM | डाउनलोड (5.07 MB) |
| 14 | MSRDC-Final NOC | डाउनलोड (1.31 MB) |
| 15 | Orange Gate Gr Dated | डाउनलोड (235.04 KB) |
| 16 | PMC NTP WO Letter No.773 | डाउनलोड (112.98 KB) |
| 17 | Traffic Police NOC | डाउनलोड (1.27 MB) |
| 18 | Work Order PADECO dated 15.11.2022 | डाउनलोड (309.04 KB) |
| 19 | Central Railway NOC | डाउनलोड (370.61 KB) |
| 20 | Coastal Road_BMC_In principle NOC for Option E | डाउनलोड (178.78 KB) |
| 21 | Contract agreement Hill | डाउनलोड (3.99 MB) |
| 22 | Contract Agreement | डाउनलोड (2.34 MB) |
| 23 | Contractor NTP WO LEtter No. 772 | डाउनलोड (82.04 KB) |
| 24 | CRZ clearance-Orange gate tunnel road 01.07.2026 | डाउनलोड (1.2 MB) |
| 25 | GR dated 12.08.2025_Finance SASCI 2025-26 Rs.132 Cr | डाउनलोड (379.89 KB) |
| 26 | GR dated 07.10.2024 ऑरंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग | डाउनलोड (191.71 KB) |
| 27 | GR dated 26.12.2025_Finance SASCI 2025-26 Rs.68 Cr | डाउनलोड (404.18 KB) |
| 28 | LOA PMC | डाउनलोड (1.19 MB) |
| 29 | LOA-L&T | डाउनलोड (87.88 KB) |
| 30 | MbPA_In-Principle-NOC_09-01-2024 | डाउनलोड (496.55 KB) |
| 31 | 154th_Authority Meeting_dated_24.03.2023_MOM_dated_10.03.2023_Regarding Giving Administrative sanction to the work | डाउनलोड (249.81 KB) |
| 32 | 272nd_Executive Committee Meeting dated_01_11_2022 & MOM dated 21_10_2022 | डाउनलोड (183.89 KB) |
| 33 | 276 EC | डाउनलोड (5.71 MB) |
| 34 | 277 EC | डाउनलोड (6.15 MB) |
| 35 | AA for appointment | डाउनलोड (2.21 MB) |
Aerial view of Launching Shaft

Aerial view of Launching Shaft

All 3 backup gantries shifted near Launching Shaft & assembly works are in progress

Launching shaft and Cut & Cover Excavation with temporary supports erection in progress (1)

Slurry Treatment Plant - Foundation top slab in progress

TBM Launching Shaft excavation with temporary supports erection in progress-2

Tunnel

Marine Drive Works

Casting Yard

Aerial View



