वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स
वांद्रे कुर्ला संकुलाचा विकास
दक्षिण मुंबईतील कार्यालये व वाणिज्य व्यवहार यांची होणारी गर्दी रोखण्यास मदत म्हणून वांद्रे-कुर्ला संकुलाचा विकास केला जात आहे. तसेच वित्तीय, माहिती तंत्रज्ञान व इतर संलग्न संस्थांना देखिल वांद्रे-कुर्ला संकुलात विकसनासाठी योग्य भूखंड उपलब्ध आहेत.
इतिहास
सन 1977, मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची वांद्रे-कुर्ला संकुलाच्या नियोजनासाठी व विकसनासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती झाली. सदर संकुलाचे क्षेत्र 370 हे.एमएमआरडीएने तयार केलेल्या नियोजन प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारने १९७९ मध्ये मंजुरी दिली होती.
बीकेसी मधील प्रमुख कंपन्यांची यादी
प्रकल्पाची वैशिष्टये -
वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) हे शासनाने या प्राधिकरणास विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केलेल्या अनेक क्षेत्रांपैकी एक प्रमुख क्षेत्र आहे. आज, संकुलाची स्थिती नरिमन पॉईंटसारखीच प्रगत आहे. हे संकुल सध्या दोन लाखांहून अधिक रोजगार (नोक-या) पुरवत आहे आणि भविष्यातील कार्यालये आणि व्यावसायिक विकसनांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. या संकुलाने बदलत्या काळाअनुरुप प्रगती केली असून येथील प्रगती उल्लेखनीय आहे.
- ई-ब्लॉक वांद्रे कुर्ला संकुल: प्राधिकरणाने भारतीय रिझर्व्ह बँक, आयकर विभाग, विक्रीकर विभाग, भविष्य निर्वाह निधी आणि इतर अनेक महत्वाच्या कॉर्पोरेट आणि व्यावसायिक आस्थापनांना जमीन वाटप केली असून या संस्थांनी त्यांना वाटप कलेली जमीन विकसित केले आहे. या इमारतीमध्ये १,१७,००० चौ.मी. एवढी मोठी कार्यालयीन जागा उपलब्ध आहे. या संकुलात हजारो रोजगार (नोक-या) उपलब्ध करण्याची क्षमता आहे. ई-ब्लॉकचा काळजीपूर्वक विकास प्राधिकरणाने केला असून येथील सिटी पार्कमध्ये देखील नियमितपणे लोकांची गर्दी असते.
- जी-ब्लॉक वांद्रे-कुर्ला संकुल: प्राधिकरण जी-ब्लॉकचा विकास आंतरराष्ट्रीय वित्त व व्यापार केंद्र म्हणून करत आहे आणि येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांची कार्यालये आहेत. सध्या, वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये ३० किलोमीटर सायकल ट्रॅक देखील आहे. या संकुलामध्ये कार्यालये (ऑफीसेस), स्टाफ क्वार्टर, ५ स्टार हॉटेल्स, कन्व्हेन्शन कॉम्पेक्स, डायमंड बोर्स शाळा, फायर स्टेशन, रिसीव्हींग स्टेशन, बहुमजली वाहनतळ विकसीत बगिचे आणि हॉस्पिटल आहेत.
MMRDA ने आत्तापर्यंत "E" ब्लॉकमध्ये जमीन दिली आहे, जिथे कार्यालयीन इमारतींची संख्या 31 आणि निवासी इमारती 12 बांधल्या गेल्या आहेत. "ई" ब्लॉकमध्ये अर्बन प्लाझा आणि सिटी पार्क विकसित केले आहे.
MMRDA ने आत्तापर्यंत "G" ब्लॉकमध्ये जमीन दिली आहे, जेथे G ब्लॉकमध्ये कार्यालयीन इमारतींची संख्या 70, निवासी इमारतींची संख्या 15 आणि सामाजिक सुविधा इमारतींची संख्या 14 (रुग्णालय, शाळा, रिसीव्हिंग स्टेशन इ.) विकसित केली आहे.