काळू धरण प्रकल्प व प्रादेशिक पाणीपुरवठा योजना
मुंबई महानगर क्षेत्रातील पूर्व उप-प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पिण्याच्या व औद्योगिक वापराच्या पाणी पुरवठ्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे काळू पाणी पुरवठा प्रकल्प राबविण्याचे हाती घेतले असून त्यातील धरण बांधकाम कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ यांच्यातर्फे करण्यात येत आहे. धरणातून 1140 द.ल.लि. प्रतिदिन पाणीसाठा उपलब्ध होणार असून तो पूर्व उप-प्रदेशातील ठाणे, भिवंडी, कल्याण – डोंबिवली, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर, या महानगरपालिका/नगरपरिषद व याच परिसरातील ग्रामीण भागाच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
- प्रकल्पाचे स्थान – काळू नदी प्रकल्प. ता.मुरबाड जि.ठाणे
- धरणाचा प्रकार – मातीचे धरण
- एकूण जलसाठा - 414.18 द.ल.घ.मी
- उपयुक्त जलसाठा - 401.24 द.ल.घ.मी (1140 द.ल.ली. प्रतिदिन)
- धरणाची लांबी - 802 मी
- धरणाची उंची - 61.28 मी
काळू पाणीपुरवठा प्रकल्प टप्प्याटप्प्याने विकसित केला जाणार आहे, म्हणजे काळू नदीवर धरण बांधणे आणि त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या 1140 द.ल.ली. प्रतिदिन पाणी साठ्यावर आधारित प्रादेशिक पाणीपुरवठा योजना लागू करणे. काळू धरणाचे बांधकाम कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्यामार्फत ठेव काम म्हणून केले जात आहे आणि धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मार्फत केले जाईल. या प्रकल्पाच्या खर्चासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.
धरणाचे बांधकाम दि. 02/03/2012 पासून मा. उच्च न्यायालय यांच्या आदेशान्वये स्थगिती आहे.