मुंबई पारबंदर प्रकल्प
मुंबई बेटाला मुख्य भुमीस (नवी मुंबई बाजूस) रेल्वे मार्गाने जोडण्याच्या उद्देशाने प्राधिकरणाने प्रभादेवी ते शिवडी तसेच पुढे नवी मुंबईच्या बाजूस पनवेल- पेण रेल्वे लाईनला सध्या कार्यरत आणि प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाच्या योग्य मार्ग बदल स्थानकाने जोडण्यासाठी मुंबई पार-बंदर मेट्रो मार्गाचे नियोजन केले आहे. या प्रकल्पाचे फायदे खालील प्रमाणे आहेत.
- मुंबई पारबंदर मेट्रो रेल्वे ही मुख्यभूमी (नवी मुंबई परिसर) ची सुधारणा होण्यास मदत करेल.
- मुंबई पारबंदर मेट्रो रेल्वे मुख्य भुमीवर ने-आण करण्यासाठी तसेच भविष्यात प्रवाशांच्या गरजा पूर्ण करेल.
- मुंबई पारबंदर मेट्रो रेल्वे ही इतर वाहतुकी व्यवस्थेवरचा वाढता ताण कमी होईल.
- प्रवाशांच्या वेळेची आणि इंधनाची बचत.
- लांबीचे विवरण (एकूण लांबी – 49.60 कि.मी.
टप्पा 1 – (सिध्दीविनायक-धुतम)
भुयारी मार्ग : 39.85 कि.मी
मुख्य सागारी सेतु : 16.160 कि.मी
उन्न्त मार्ग : 5.675 कि.मी.
जमिनीवर : 2.080 कि.मी
टप्पा 2 – (धुतम-दुश्मी )
पूर्णपणे जमिनीवर : 27.90 कि.मी.
- मेट्रो स्थानकाचे विवरण (एकूण स्थानके - 20)
टप्पा 1 – (सिध्दीविनायक-धुतम)
भुयारी मार्ग : 04
मुख्य सागारी सेतु : 01
उन्न्त मार्ग : 02
जमिनीवर : 01
टप्पा 2 – (धुतम-दुश्मी )
पूर्णपणे जमिनीवर : 12
- डेपो / देखभाल सुविधा :
डेपोचे स्थान जागा
धुतम 46.35 हेक्ट्र
दुश्मी 13.34 हेक्ट्र
प्रस्तावित मुंबई पारबंदर मेट्रो मार्गाचा प्रस्तावित आराखडा खालीलप्रमाणे आहे.
मुंबई पारबंदर मेट्रो मार्गासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल माहे ऑगस्ट 2010 मध्ये पूर्ण झाला आहे.