कल्याण तालुक्यामधील प्रस्तावित ग्रोथ सेंटर
अ. मूळ आणि गरज : :
महाराष्ट्र शासनाने दि.9 ऑगस्ट, 2006 रोजीच्या अधिसूचनेद्वारे (दि.7 डिसेंबर, 2006 रोजी शासन राजपत्रात प्रकाशित) प्राधिकरणाची ची ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील 27 गावांसाठी ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्ती केली होती. प्राधिकरणाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 अंतर्गत विहित केलेली सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, अधिनियमाच्या कलम 30(1) च्या तरतुदी अंतर्गत दि.14 डिसेंबर, 2012 रोजी प्रारुप विकास आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला होता. शासनाने अधिसूचना क्र. TPS-1212/1697/CRक्र.101/13/UD-12, दि.11 मार्च, 2015 (दि.13 मार्च, 2015 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रकाशित) द्वारे सदर क्षेत्राचा विकास आराखडा भागश: मंजूर केला होता. उक्त अधिनियमाच्या कलम 31 नुसार शासनाने अधिसूचना क्र. TPS-1216/CR क्र.240/16/UD-12, दि.09 मे, 2017 आणि त्यानंतरच्या दि.13 जून, 2017 रोजीच्या शुद्धीपत्राकान्वये, तसेच दि.03 जून, 2017 रोजीच्या अधिसूचनेन्वये सदर अधिसूचित क्षेत्रासाठी (EP-24 आणि EP 125 वगळता) विकास योजनेच्या वगळलेल्या भागाला (EP) मंजूरी दिली आहे.
मुंबई महानगर प्रदेश (MMR) च्या प्रारूप प्रादेशिक योजनेमध्ये चार विकास केंद्र सूचित करण्यात आले होते. सदर विकास केंद्रे हे एकत्रित संकुल असेल ज्यामध्ये कार्यालयीन रोजगार, संशोधन आणि विकास, शैक्षणिक आणि मनोरंजनाच्या सुविधा यांना गृह निर्माण व पायाभुत सुविधांसह वाव मिळेल असे परिकल्पीत केले आहे. सदर विकास केंद्रे ही रेल्वे तसेच रस्त्यांचे जाळे याद्वारे जोडले जाईल अशा ठिकाणी प्रस्तावित करण्यात आले आहेत.
कल्याण विकास केंद्र हे मुंबई महानगर प्रदेशाच्या (MMR) प्रारुप प्रादेशिक योजनेमध्ये सुचित करण्यात आलेल्या चार प्रस्तावित विकास केंद्रापैकी एक आहे. त्यानुसार शासनाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या यादीनुसार आणि मा. मुख्यमंत्री यांची वॉर रुम बैठकीच्या इतीवृत्तानुसार ज्यामध्ये कल्याण येथील प्रस्तावित विकास केंद्रचा समावेश केला असून, प्राधिकरणाने मुंबई येथील वांद्रे-कुर्ला संकुलाच्या (BKC) धरतीवर, कल्याण विकास केंद्र विकसित करण्यासाठी सुमारे एक 1089 हे. इतके क्षेत्र सुचित केले आहे. सदर विकास केंद्राद्वारे रोजगारांच्या संधी निर्माण करणे, उत्तम पायाभूत सुविधा तयार करणे, ठाणे, कल्याण व डोंबिवली या उपनगरांशी जोडणे असे परिकल्पीत करण्यात आले आहे.
प्राधिकरणाने दि.26.08.2015 रोजी झालेल्या 138 व्या बैठकीतील ठराव क्र. 1346 अन्वये कल्याण तालुक्यात सदर विकास केंद्र (क्षेत्र अंदाजे 1089 हे.) नगर नियोजन योजना (TPS) द्वारे विकसित करण्याकरीता तत्वत: मान्यता दिली आहे.
ब. विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नियुक्ती:
महाराष्ट्र शासनाने अधिसूचना क्र. TPS.1215/941/CR-42/15/UD-12, दि. 30 एप्रिल, 2016 रोजीच्या अधिसूचने अन्वये कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील 27 गावांच्या अधिसूचीत क्षेत्रामधील मौ. भोपर (भागश:), संदप, उसरघर (भागश:), घारिवली (भागश:), मानगाव (भागश:), हेदुटणे (भागश:), कोळे, काटई (भागश:), निळजे (भागश:), घेसर (भागश:), या दहा गावांमधील सुमारे 1089 हे. इतक्या क्षेत्राच्या प्रस्तावित कल्याण विकास केंद्र अधिसुचित क्षेत्रासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती कायम ठेवली आहे.
1.जमीनीचे क्षेत्रफळ: प्रस्तावित विकास केंद्रमध्ये मौ. भोपर (भागश:), संदप, उसरघर (भागश:), घारिवली (भागश:), मानगाव (भागश:), हेदुटणे (भागश:), कोळे, काटई (भागश:), निळजे (भागश:), घेसर (भागश:) या गावांचा एकत्रित अंदाजे 1089 हे. क्षेत्राचा समावेश आहे.
2.स्थान: प्रस्तावित विकास केंद्र हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट असून, ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या जवळ आहे. सदर प्रस्तावित विकास केंद्रामध्ये मुख्यत: जमिनी ह्या रिकाम्या असून ज्यामध्ये विकासाची क्षमता आहे.
3.जोडणी: प्रस्तावित विकास केंद्र हे चांगल्या रस्त्यांनी जोडले आहे. राज्य महामार्ग 40 आणि राज्य महामार्ग 43 (बदलापूर पाइपलाईन रस्ता) हे सदर विकास केंद्रातून जात आहेत. तसेच, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFC) आणि मल्टीमॉडल कॉरिडॉर (MMC- अलिबाग ते विरार) विकास केंद्रामधून जात आहेत. प्रस्तावित मल्टीमॉडल कॉरिडॉरचे जंक्शन देखील विकास केंद्राच्या आत प्रस्तावित आहेत. तसेच, निळजे रेल्वे स्टेशन हे प्रस्तावित विकास केंद्रच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
योजना सुरु आहे.
- प्रस्तावित विकास केंद्रमधील विकास परवानग्या:
कोणीही व्यक्ती ज्यांना विकास करावयाचा आहे आणि इमारतीच्या कोणत्याही ठिकाणी बांधणे, पुर्नबांधणे किंवा बदल करावयाचा आहे, त्यांनी विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रातील विकास परवानगीसाठीच्या हस्तपुस्तिकामध्ये देण्यात आलेल्या नमुन्यामध्ये सर्व आवश्यक कागदपत्रे, बॉन्डस्, अंन्डर टेकिंग, ना हरकत दाखला, नकाशा इत्यादीसह प्राधिकरणाकडे अर्ज करावयाचा आहे. प्राधिकरणामार्फत सदर प्रस्तावांची लागू असलेल्या विकास नियंत्रण नियमावली आणि इतर लागू असलेले नियम/विनियम व कायदे नुसार छाननी करण्यात येते. सर्व बाबींची परीपुर्तता केल्यानंतर प्राधिकरण विकास परवानगी मंजूर करते अथवा नाकारते (लिखित स्वरुपात कारण देऊन नाकारण्यात येते.) सदर अधिसूचित क्षेत्रामध्ये प्राधिकरणामार्फत आतापर्यंत एकूण 24 इतक्या विकास परवानगी जारी केल्या आहेत.
१. 'प्रस्तावित ग्रोथ सेंटर' च्या सूचना/सूचना/नकाशे यांची यादी :
Sr.No. | Title | Download/View | View Image |
---|---|---|---|
1 | काटई, सांडप, उसरघर आणि हेदुटणे ता. गावातील MMC साठी भूसंपादनाबाबत SDO, कल्याण दिनांक १४/१२/२०१९ ची अधिसूचना. कल्याण जि. ठाणे. | (1.49 MB) | - |
2 | सूचना w.r.t. कल्याण ग्रोथ सेंटरच्या क्षेत्रासाठी नगर नियोजन योजना तयार करण्यासाठी एमआर आणि टीपी कायदा, १९६६ अंतर्गत घोषणा. | (7.42 MB) | - |
3 | सूचना w.r.t. कल्याण ग्रोथ सेंटरचे उर्वरित क्षेत्र नगररचना योजना क्रमांक १ (टीपीएस क्रमांक १) मध्ये समाविष्ट करण्याच्या इराद्याची घोषणा | (7.4 MB) | - |
4 | MR&TP कायदा, १९६६ च्या कलम ६० अन्वये कल्याण ग्रोथ सेंटर (KGC) मध्ये स्थित नगर नियोजन योजना क्रमांक १ साठी इरादा जाहीर करण्याची सूचना नगर नियोजन योजना क्रमांक १ ची सीमा दर्शविणाऱ्या योजनेसह | (2.92 MB) | - |
5 | कल्याण ग्रोथ सेंटर- ग्रोथ सेंटर अंतर्गत १० गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती करण्याबाबत अधिसूचना (सूचना दि. ३०-०४-२०१६)) | (92.37 KB) | - |
6 | कल्याण ग्रोथ सेंटर - प्रस्तावित कल्याण ग्रोथ सेंटरची सीमा दर्शविणारी योजना ज्यासाठी एमएमआरडीए विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ठेवली आहे. |
२. ३१ (दि. ०९/०५/२०१७) नुसार मंजूर केलेल्या सूचना/सूचना/नकाशे/डीसीआरची यादी (मंजूर वगळलेला भाग):
Sr.No. | Title | Download/View | View Image |
---|---|---|---|
1 | २७ गावांचे अधिसूचित क्षेत्राचे मंजूर विकास नियंत्रण नियमन | (29.05 MB) | - |
३.सूचना/सूचना/नकाशे/DCR मंजूर/प्रकाशित ३१ (दि. ११/०३/२०१५) ची यादी :
Sr.No. | Title | Download/View | View Image |
---|---|---|---|
1 | ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तहसीलमधील २७ गवांची (२७ गावे DP EP सूचना) | (316.28 KB) | - |
2 | ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील २७ गवांची (२७ गावे डीपी एसएम (DP SM) अधिसूचना) | (197.21 KB) | - |
3 | कल्याण आणि अंबरनाथ तहसीलच्या अधिसूचित क्षेत्राच्या २७ गावांसाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). MR&TP कायदा १९६६ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (एकत्रित नकाशा) | ||
4 | कल्याण आणि अंबरनाथ तहसीलच्या अधिसूचित क्षेत्राच्या २७ गावांसाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). MR&TP कायदा १९६६ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १०.१M) | ||
5 | कल्याण आणि अंबरनाथ तहसीलच्या अधिसूचित क्षेत्राच्या २७ गावांसाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). MR&TP कायदा १९६६ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १०.२M) | ||
6 | कल्याण आणि अंबरनाथ तहसीलच्या अधिसूचित क्षेत्राच्या २७ गावांसाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). MR&TP कायदा १९६६ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १०.३M) | ||
7 | कल्याण आणि अंबरनाथ तहसीलच्या अधिसूचित क्षेत्राच्या २७ गावांसाठी विकास आराखडा (वगळलेला भाग). MR&TP कायदा १९६६ च्या कलम ३१ अंतर्गत प्रकाशित (नकाशा १०.४M) | ||
8 | एमआर अँड टीपी कायदा १९६६ च्या कलम ३१ अंतर्गत कल्याण आणि अंबरनाथ तहसीलच्या अधिसूचित क्षेत्रातील २७ गावांसाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून) (एकत्रित नकाशा) | ||
9 | एमआर आणि टीपी कायदा १९६६ च्या कलम ३१ अंतर्गत कल्याण आणि अंबरनाथ तहसीलच्या अधिसूचित क्षेत्रातील २७ गावांसाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून) (नकाशा १०.१M) | ||
10 | एमआर आणि टीपी कायदा १९६६ च्या कलम ३१ अंतर्गत कल्याण आणि अंबरनाथ तहसीलच्या अधिसूचित क्षेत्रातील २७ गावांसाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून) (नकाशा १०.२M) | ||
11 | एमआर अँड टीपी कायदा १९६६ च्या कलम ३१ अंतर्गत कल्याण आणि अंबरनाथ तहसीलच्या अधिसूचित क्षेत्रातील २७ गावांसाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून) (नकाशा १०.३M) | ||
12 | एमआर अँड टीपी कायदा १९६६ च्या कलम ३१ अंतर्गत कल्याण आणि अंबरनाथ तहसीलच्या अधिसूचित क्षेत्रातील २७ गावांसाठी मंजूर विकास आराखडा (वगळलेला भाग वगळून) (नकाशा १०.४M) | ||
13 | एमआर आणि टीपी कायदा १९६६ (विकास नियंत्रण नियमावली (DCR)) च्या कलम ३१ अंतर्गत कल्याण आणि अंबरनाथ तहसीलच्या अधिसूचित क्षेत्राच्या २७ गावांसाठी विकास नियंत्रण नियमावली. |
4. २८(४) (दि. १२/१२/२०१२) नुसार प्रकाशित सूचना/नकाशे/DCR ची यादी ::
Sr.No. | Title | Download/View | View Image |
---|---|---|---|
1 | ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांच्या अधिसूचित क्षेत्रांच्या (फेरफारांची यादी) | (157.75 KB) | - |
2 | ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांचे अधिसूचित क्षेत्र (मसुदा विकास नियंत्रण नियमावली (DCR) | ||
3 | ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांचे अधिसूचित क्षेत्र (मसुदा विकास नियंत्रण नियमावली (DCR) | (5.71 MB) | - |
5.२६ (दि. २१/१२/२०११) नुसार प्रकाशित सूचना/सूचना/नकाशे/DCR/अहवालांची यादी:
Sr.No. | Title | Download/View | View Image |
---|---|---|---|
1 | ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांची (सूचना) | (15.53 KB) | - |
2 | ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांचा (प्रस्तावित जमीन वापर नकाशा) | (15.53 KB) | - |
3 | ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांचा (प्रस्तावित जमीन वापर नकाशा क्षेत्र - १) | ||
4 | ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांचा (प्रस्तावित जमीन वापर नकाशा क्षेत्र - २) | ||
5 | ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांचा (प्रस्तावित जमीन वापर नकाशा क्षेत्र - ३) | ||
6 | ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांचा (प्रस्तावित जमीन वापर नकाशा क्षेत्र - ४) | ||
7 | ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांची (विकास नियंत्रण नियमावली (DCR)) | (2.43 MB) | - |
8 | ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांचा (प्रारुप विकास आराखड्याचा अहवाल) | (6.34 MB) | - |
प्राधिकरणाने दि. 15 जानेवारी, 2019 रोजी कल्याण विकास केंद्रमध्ये स्थित सुमारे 906 हे. क्षेत्रासाठी नगर रचना परियोजनेसाठी उद्देश घोषित केला आहे व त्याकरीता संपूर्ण विकास केंद्र क्षेत्राचे ड्रोन सर्वेक्षणाचे काम दि. 15 मार्च, 2019 ते दि. 22 मार्च, 2019 दरम्यान पूर्ण केले होते. सदर क्षेत्रासाठी नगर रचना परियोजना तयार केल्यानंतर शासनाकडे मंजूरीसाठी सादर होणे अपेक्षित होते. परंतु सदर परियोजना तयार करण्यासाठीचा वैधानिक कार्यवाही करिता अवधी लागणार होता. त्यामुळे सदर नगर रचना परियोजना तयार करुन प्रसिध्द करण्यासाठी वाढीव मुदत मिळणेकरिता प्राधिकरणाने शासनाकडे विनंती केली आहे.
दरम्यान शासनाने आपल्या दि.19 ऑगस्ट, 2020 रोजीच्या पत्रान्वये प्राधिकरणाने कल्याण विकास केंद्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून त्यांचे कर्तव्य हे विकास प्रस्तावांना मंजूरी देण्यासाठी व इतर कायदेशिर कार्ये करण्यासाठी शासनाचे पुढील आदेश पारीत होईपर्यंत सुरु ठेवण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील 27 गावांसाठीच्या मंजूर विकास आराखड्यानुसार व एकत्रिकृत विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावली (UDCPR) च्या तरतुदीनुसार कल्याण विकास केंद्रामध्ये प्राधिकरणामार्फत विकास परवानग्यांना मंजूरी देण्यात येत आहे.