inner-banner

सर्वसमावेशक वाहतूक अभ्यास

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व परिवहन व्यवस्थेची कार्यक्षमता, गुणवत्ता आणि सक्षमीकरण करण्यासाठी मुं.म.प्र.वि.प्रा. (MMRDA) ने मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP) अंतर्गत आणि जागतिक बँकेच्या तांत्रिक सहाय्याने वर्ष 2008 मध्ये वर्ष 2031 पर्यंत सर्व परिवहन साधने समावेशक सर्वंकष परिवहन अभ्यास (Comprehensive Transportation Study) आणि व्यवसाय आराखडा (Business Plan) तयार केला.

सर्वंकष परिवहन व अभ्यास व त्यासाठीचा व्यवसाय आराखडा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर गेल्या दशकात महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर परिवहन आणि जमीन वापर (Landuse) यात सुधारणा झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने वडाळा येथील नवीन जमीन वापर, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रस्तावित सुधारणा, मेट्रो रेल्वे आणि मोनो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी आणि त्यांचे कार्यान्वयन, प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ (NMIA), नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र (नैना), जेएनपीटी येथे प्रस्तावित विशेष आणि आर्थिक क्षेत्र (SEZ), कल्याण आणि भिवंडी परिसरात 27 आणि 51 गावांचा विकास आराखडा आणि सदर गावांमध्ये सुचित क्षेत्राचा समावेश, प्रस्तावित जलवाहतूक प्रकल्प इत्यादीचा प्रामुख्याने समावेश आहे.

सर्वंकष परिवहन अभ्यास 2008 मध्ये केलेल्या शिफारशी आणि मागिल दशकात पायाभूत सुविधांमध्ये झालेले अनपेक्षित बदल यांचा परिणाम लक्षात घेऊन सर्वंकष परिवहन अभ्यास अद्यावत करण्याकरीता प्राधिकरणाने M/s. Lea Associates South Asia Pvt. Ltd, New Delhi व Lea International Ltd. Canda (संयुक्त उपक्रम) यांना माहे दिनांक 29 मे, 2017 रोजी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. सदर अभ्यासामध्ये महानगर प्रदेशासाठी क्षितिज वर्ष 2041 (दीर्घकालीन) आणि 2031 (मध्यकालीन) साठी परिवहन तसेच वाहतूक विषयक पायाभूत सुविधांची शिफारस करण्यात आले आहे. सद्यस्थितीस सल्लागारामार्फत सदर अभ्यासाचा अंतिम अहवाल प्राधिकरणास सादर करण्यात आला असून, प्राधिकरणाने दिनांक 16 नोव्हेंबर, 2021 रोजी प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये सदर अभ्यासाचा अंतिम अहवालास मान्यता दिली आहे.

सदर अभ्यासामध्ये मुंबई महानगर प्रदेशासाठी क्षितिज वर्ष 2041 पर्यंत खालीलप्रमाणे :-

  • 487 कि.मी. चे मेट्रोचे जाळे
  • 232 कि.मी. चे नवीन उपनगरीय रेल्वेचे जाळे
  • 1090 कि.मी. चे महामार्ग
  • 560 कि.मी.च स्वतंत्र बस मार्गिका /जलद बस वाहतुक सेवा प्रणाली
  • 4 शहरीय बस टर्मिनल
  • 13 शहरांतर्गत बस टर्मिनल
  • 5 इंटरसिटी रेल टर्मिनल
  • 7 मल्टी मॉडल हब (बहु-वाहतुक केंद्र)
  • 5 मेजर ट्रक टर्मिनल
  • 14 मिनी ट्रक टर्मिनल आणि 24 प्रवासी जल वाहतुक टर्मिनल

विविध शिफारसींचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे मुंबई महानगर प्रदेशाच्या परिवहन आणि वाहतुक व्यवस्थेमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल. तसेच सदर अभ्यासामध्ये वरील शिफारशींची 2041 पर्यत अंमलबजावणी करण्याकरीता एकूण अंदाजित 5.01 लाख करोड रुपयांची गुंतवणुकीची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Map1map2