बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक
1) प्रकल्पाचे नाव | महापौर निवासस्थानाच्या परिसरात मा. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे बांधकाम करणे. टप्पा-1 अंतर्गत प्रवेशव्दार इमारत, प्रशासकीय इमारत, इंटरप्रिटेशन इमारतीचे बांधकाम करणे व महापौर निवासस्थान इमारतीचा सांस्कृतिक ठेवा जतन करुन या इमारतीचे संग्रहालयामध्ये रुपांतरीत करणे तसेच सभोवतालच्या परीसराचे सुशोभिकरण करणे इत्यादी. टप्पा-2 हार्डवेअर आणि सहाय्यभूत सेवा, तंत्रज्ञान, लेझरशो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/ गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्चूअल रियालटी, ऑडिओ व्हिजुअल आणि तांत्रिक घटक इत्यादी. |
2) शासन स्तरावर प्रशासकीय मान्यता | नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन निर्णय क्र. एमआरडी-2018/प्र.क्र. 147/नवि-7, दि. 16 मार्च, 2021 ₹. 400 कोटी (टप्पा 1 - ₹. 250 कोटी व टप्पा 2- ₹. 150 कोटी) |
3) प्राधिकरणाची प्रशासकीय मान्यता | दि. 16 नोव्हेंबर, 2021 रोजी संपन्न झालेल्या प्राधिकरणाच्या 151 बैठकीत बाब क्र. 13 व ठराव क्र. 1572 अन्वये टप्पा -1 व टप्पा-2 च्या एकत्रित कामास ₹.400 कोटी इतकी प्रशासकीय मान्यता प्रदान झालेली आहे. |
4) सन 2023-2024 अर्थसंकल्पीय तरतूद | प्राधिकरणाच्या सन 2022-23 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये सदर प्रकल्पासाठी ₹. 242.37 कोटी इतक्या रक्कमेची तरतुद करण्यात आलेली आहे. |
5) टप्पा-1 साठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार व कार्यारंभ आदेश दिनांक | मे.आभा नरेन लांबा असोसिएट्स, (कार्यारंभ आदेश दि. 21/07/2020) |
6) टप्पा- 1 साठी सल्लागार निविदा फी व रक्कम | निविदा रक्कम सापेक्ष 3.50%, ₹. 6.47 कोटी |
7)टप्पा- 1 कामाची निविदा रक्कम | EPC निविदा – ₹. 184.87 कोटी |
8)टप्पा-1 कंत्राटदार, कार्यारंभ आदेश दिनांक व देकार निविदेनुसार काम पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक | टाटा प्रोजेक्ट्स लि. (कार्यारंभ आदेश दि. 24/03/2021) निविदा देकार – ₹. 180.99 कोटी |
9) कामाचा कालावधी | 14 महिने (दि. 23/05/2022) |
10) टप्पा-1 करीता प्रथम मुदतवाढ | दि. 31/03/2023 रोजी पर्यंत प्रथम मुदतवाढ देण्यात आलेली असून, मुदतवाढीचा कालावधी संपुष्टात आलेला असल्याने, प्राधिकरणामार्फत द्वितीय मुदतवाढीच्या प्रस्तावाची कार्यवाही प्रगतीत आहे. |
11) अंतर्भुत कामे /strong> |
टप्पा -1 अंतर्गत करण्यात येणारी कामे:- • इंटरप्रिटेशन सेंटर (Interpretation Centre) बांधणे. |
12) प्रकल्पाची सद्य:स्थिती | टप्पा-1 • महापौर निवासस्थान इमारतीचे वारसा संवर्धन व जतन करण्यांतर्गत जुने छत पूर्णपणे काढण्यात येऊन, नवीन छताचे नुतनीकरणाचे काम पूर्ण. अंतर्गत सजावटीचे काम प्रगतीत. महापौर निवासस्थान इमारतीचे 71.40% काम पूर्ण. • इंटरप्रिटेशन सेंटरच्या तळघराच्या दोन थरातील राफ्टचे आरसीसी काम पूर्ण तसेच प्लाझा स्तराचे आरसीसी स्लॅबचे काम पूर्ण. आधारभिंतीचे आरसीसी काम पूर्ण. इंटरप्रिटेशन सेंटरचे 76.00% काम पूर्ण. • प्रवेशद्वार इमारतीचे तळघराचा प्रथम व द्वितीय स्तराचे आरसीसी स्लॅबचे काम पूर्ण. प्रवेशद्वार इमारतीचे एकूण 75.50 % काम पूर्ण. • प्रशासकीय इमारतीचे आरसीसी बांधकाम, वीट बांधकाम, गिलावा काम पूर्ण व अंतर्गत सजावटीचे काम पूर्ण. प्रशासकीय इमारतीचे 99.00% काम पूर्ण. टप्पा 2 • माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली असून, कंत्राटदार नेमणूकीची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. |
13) प्रकल्पावरील दि. 4 जून, 2023 रोजी पर्यंतचा खर्च | प्रकल्पावर एकूण खर्च ₹.159.19 कोटी इतका झालेला असून, यामध्ये इमारतीच्या वैधानिक परवानगी खर्च, सल्लगाराची देयक शुल्क, कंत्राटदाराच्या कामावरील देयक खर्च व बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाकडील खर्चाची प्रतिपूर्ती इत्यादींचा समावेश आहे. |
14) प्रकल्पाची प्रगती | For Phase – I Work 1) भौतिक प्रगती – 82.00% 2) आर्थिक प्रगती – 78.29% |