विधी शाखा
श्रीमती योगिता अ. परळकर
सह प्रकल्प संचालक (विधी)
विधी शाखा
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत विधी शाखा हे स्वतंत्र विभाग आहे. विधी शाखेमार्फत प्राधिकरणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयासह विविध न्यायालये, न्यायाधिकरण इत्यादींमध्ये दाखल केलेल्या सर्व खटल्यांमध्ये प्राधिकरणाचा बचाव करणे व प्राधिकरणाच्यावतीने विविध न्यायालये, न्यायाधिकरण इत्यादींमध्ये कायदेशीर कार्यवाही सुरू करण्याची प्राथमिक जबाबदारी विधि शाखेची आहे. तथापि, न्यायालयीन सर्व खटल्यांवर समन्वय साधने, पर्यवेक्षण आणि नियंत्रण करण्याचे कर्तव्य विधि शाखेमार्फत पार पाडण्यात येते. तसेच प्राधिकरणाविरोधात विविध न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांचा अहवाल मा. अतिरिक्त महानगर आयुक्त-II, यांना सादर करण्यात येतो.
- प्राधिकरणाविरोधात विविध न्यायालयात दाखल प्रकरणांशी संबंधित टिप्पणी तयार करणे.
- पॅनलवरील वकिलांना मुं.म.प्र.वि.प्राधिकरणाच्यावतीने बचाव करण्यासाठी प्रकरण सोपविणे आणि व्यावसायिक फी व इतर खर्च मंजूर करणे.
- याचिकेमधील मा.न्यायालयाचे आदेश /अहवाल/ सूचना इ. संबंधित विभागांना अंमलबजावणीकरिता पाठविणे.
- प्रतिज्ञापत्रे, लेखी निवेदन, उत्तरे इ. वकील व संबंधित विभागाकडे मसूद्यांसाठी पाठपुरावा करणे.
- संबंधित विभागांना विधी विषयक अभिप्राय व सल्ला देणे.
- सर्व प्रकारच्या कराराची तपासणी, लीजडीड, कन्व्हेन्सडीड आणि सामंजस्यकरार (एम.ओ.यू.) संबंधित कागदपत्रे तपासणी करणे व अभिप्राय देणे.
- माहिती अधिकार अधिनियम, 2005 अन्वये कार्ये पार पाडणे.
- प्राधिकरणाविरोधात विविध न्यायालयात दाखल प्रकरणांचा अहवाल मा. महानगर आयुक्त, मा.अति. महानगर आयुक्त, मा. सह महानगर आयुक्त तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना सादर करणे.