inner-banner

मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज ) आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्र (सी एस एम आय ए एन ए)

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी असून याद्वारे भारत ४१ आंतरराष्ट्रीयव ४० राष्ट्रीयगन्तव्यांशी जोडले गेले आहे. या क्षेत्रामधील जमिनी या भारतीय विमानपत्तन प्राधिकरणयांच्या मालकीच्या असून त्या भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टप्रा.लि. यांना एप्रिल, 2006 मध्ये झालेल्या भाडेपट्टा करारानुसार 30 वर्षांकरिता हस्तांतरीत केल्या आहेत. सदर करार हा पुढील 30 वर्षांकरीता वाढविता येऊ शकतो.भारतीय विमानतळ प्राधिकरण व मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टप्रा.लि. यांच्यामध्ये एप्रिल, 2006 मध्ये झालेल्या ऑपरेशन, मेंटेनन्स व डेव्हलपमेंट करारानुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टप्रा.लि. यांनी सदर क्षेत्रामधील नियोजन, विकसन, बांधकाम व देखभाल करावयाची आहे.

शासनाने त्यांच्या दिनांक 14 मे, 2009 रोजीच्या अधिसूचनेद्वारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सुमारे 802.03 हे. क्षेत्रफळाच्या मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्राकरीता विशेष नियोजन प्रधिकरण म्हणून नेमणूक केली आहे. शासनाने त्यांच्या दिनांक 17 मे, 2013 रोजीच्या अधिसूचनेद्वारे मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्राचा अंतरिमविकास आराखडा (झोपडयांखालील क्षेत्रवगळता - 125.03 हे.) मंजूर केला आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टप्रा.लि. हे भाडेपट्टेदार या नात्याने मंजूर अंतरीम विकास आराखडयानुसार मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्रामधील पायाभूत सुविधा, वैमानिक सुविधा व इतर सुविधांचा विकास करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्रामधील शहरस्तरावरील पायाभूत सुविधा जसे पेय जलवाहिनी, नाले, विदयुतसेवा, सांडपाणी इत्यादी सोईंचे विकसन/देखरेख मुंबई महानगरपालिकेने करावयाचे आहे. मुंबई महानगर प्रदेशविकास प्राधिकरण हे सदर अधिसूचित क्षेत्राकरिता विशेष नियोजन प्राधिकरण या नात्याने सदर क्षेत्रामधील कार्यरत प्रकल्पांना मंजूरी व इतर बांधकाम परवानग्या देत असते. या व्यतिरिक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे विमानतळाच्या सभोवतालच्या क्षेत्रात विविध मेट्रो मार्गिकांचे विकसन करीत आहे ज्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांची देखील सोय होईल.

List of Maps

Mumbai(Chhatrapati Shivaji) International Airport Notified Area
Sr.No. Title Download/View
1 Mumbai (Chhatrapati Shivaji) International Airport Notified Area (CSIANA)-Notification (53.17 KB)
2 Mumbai (Chhatrapati Shivaji) International Airport Notified Area (CSIANA)-Proposed Land use Plan (4.12 MB)
3 EP Sanctioned Notification – 3rd March 2014. (5.58 MB)
4 CSMIANA – Notification with respect to Modification to DCR no. 33 – 6th March 2015 (60.54 KB)
5 Appointment of MMRDA as SPA – CSMIANA- 14th May 2009. (2.81 MB)
6 CSMIANA DP sanctions Government Notification – 17th May 2013. (380.5 KB)
7 Map of Interim Development Plan sanctioned by Government. (2.41 MB)
8 Modified DCR of CSMIANA (11.77 MB)
9 Executive Summary from DP Report of CSMIANA. (510.52 KB)