सामाजिक विकास कक्ष
श्री.उद्धव घुगे
प्रमुख
सामाजिक विकास कक्ष
सामाजिक विकास कक्षातर्फे प्राधिकरणाच्या महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याकरीता आवश्य्क जमीन मोकळी करुन देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन व पुर्नवसाहत करण्याची तसेच त्यासाठी पुरक सामाजिक घटकासंबंधीची कार्य हाती घेण्यात येतात. सामाजिक विकास कक्षातर्फे पार पाडण्यात येणारी मुख्य् कार्ये पुढीलप्रमाणे आहेत :-
- प्राधिकरणाच्या प्रकल्पामध्ये बाधित तसेच होस्ट् कम्युनिटी मधील निवासी व अनिवासी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे, सामाजिक मत्यांचे (Assest) पुर्नस्थापना करणे आणि प्रकल्पग्रस्तांच्या संस्थांना सामाजिक सुविधा उपलब्ध् करुन देणे.
- विविध पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी आवश्य्क जमिनीचे संपादन करणे.
- प्रकल्पांच्या जागा मोकळया करण्यासाठी प्राधिकरणाच्या प्रकल्प् अंमलबजावणी विभागाशी समन्व्य साधणे. स्थलांतरीत केलेल्या प्रकल्पग्रस्तांना सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच गृहनिर्माण संस्थांच्या संघामध्ये संघटीत करणे आणि प्रकल्पग्रस्तांनी व त्यांच्या संघटनाशी सामायिक मत्तांचे (ॲसेटस्) व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करणे अशा प्रकारची पुनर्वसोत्त्र कार्ये.
- पुर्नवसाहत इमारतींची एक वेळची दुरुस्ती तसेच वसाहतीमधील पायाभूत सुविधांचे एक वेळची श्रेणीवाढ करण्याकरीता प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी विभागाशी समन्व्य साधणे.
- सदनिकांचा साठा प्राप्त करण्यासाठी प्राधिकरणाच्या एस.आर.ए. कक्षासोबत आणि मिळकत व्यवस्थापन कार्याकरीता भूमी व मिळकत कक्षाशी समन्व्य साधणे, प्रकल्पग्रस्तांच्या, विशेषत: दुर्बल कुटुंबांच्या, उपजिवीका सहाय्य् साधांकरीता कार्य संघटीत करणे आणि पुर्नवसाहत वसाहतीमधील आरोग्य् व शिक्षण क्षेत्रातील सुविधा उपलब्ध् करुन देण्याच्या कार्यात मदत करणे.
- प्रकल्पग्रस्तांचे सर्वेक्षण, समाजिक परिणाम मुल्यांकन अभ्यास आणि पुर्नवसाहताचे मुल्यमापान या संबंधीची कार्ये.
- इतर संस्थांच्या प्रकल्पाग्रस्तांचे पुर्नवसन करण्यासाठी अशा संस्थांनासदनिका वितरीत करणे.
प्राधिकरणाच्या इतर विभागांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांचे आणि कार्याचे नियोजन व अंमलबजावणीमध्ये अशा प्रकारे पुरक ठरणारी कार्ये सामाजिक विकास कक्षाद्वारे करण्यात येतात.