inner-banner

मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प

article

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून जागतिक दर्जाचे व्यापार व उद्योग केंद्र म्हणून देशाच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचे महत्व् व स्थान अनन्यसाधारण आहे, तथापि, जागतिक दर्जाच्या पायाभूत नागरी सुविधांच्या अभावामुळे आणि मुंबई शहरातील वाढती गर्दी, वाहनांची वाढती संख्या व त्यामुळे सतत होणारी वाहतुकीची कोंडी इत्यादींचा शहराच्या प्रगतीवर तसेच एकूणच जनसामान्यांवर परिणाम होऊ लागला आहे. मुंबईतील वाहतुकीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने व रेल्वे मंत्रालयाने जागतिक बँकेच्या सहाय्याने एम.यु.टी.पी.हाती घेतला आहे.

सदर प्रकल्पाचा भर प्रामुख्याने रेल्वे वाहतुकीच्या सुधारणांवर आहे म्हणून मुंबई शहराच्या पायाभूत सुविधांची सद्याची तसेच मोठया प्रमाणात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण वाहतुकीतील सुधारणेसाठी शासन निर्णय क्र. एमयुआय 3403/प्र.क्र.65/नवि-10, दिनांक 01.11.2003 नुसार मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प्‍ हाती घेण्यात आला.

प्रकल्पाची उद्दीष्टे :

 1. कार्यक्षम व जलद वाहतुक वितरण आराखडा (Traffic dispersal model) तयार करणे.
 2. मुंबई दक्षिण रस्त्यांचा व पूर्व-पश्चिम जोडरस्त्याचा विकास व सुधारणा करणे.
 3. सार्वजनिक परिवहन सेवेसाठी स्वतंत्र मार्ग निर्माण करणे.
 4. पादचाऱ्यांकरिता सुरक्षित व सुलभ ये-जा करण्यासाठी पादचारी पूल, भुयारी मार्ग, पदपथ व रेल्वे स्थानक परिसर वाहतूक सुधारणा कार्यक्रम राबविणे.
 5. मुंबईमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळांना जोडणाऱ्या उच्च् क्षमतेच्या व जलद मार्गाची तरतूद करणे.
 6. मुंबईतील रेल्वे मार्गावर रेल ओव्ह्र ब्रीज बांधून लेव्ह्ल क्रॉसिंग बंद करणे.
 7. बस स्थानक/आगार निर्माण करणे आणि तेथे प्रवाशांकरिता सुविधांची निर्मिती करणे.

मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत प्रस्तावित प्रकल्प :

 1. डी.पी.रोडची सुधारणा / बांधकाम
 2. उन्न्त रस्ते
 3. उड्डाणपूल
 4. रेल्वे वरपूल
 5. पादचारी व वाहन भुयारी मार्ग
 6. स्कायवॉक
Loading content ...