वित्त व लेखा
श्री. अंकुश आर.नवले
वित्तीय सल्लागार
वित्त व लेखा विभाग
वित्त व लेखा विभागाची मुख्य् कामे खालीलप्रमाणे आहेत -
- वार्षिक अंदाजपत्रक व वार्षिक लेखे तयार करणे.
- सर्व आर्थिक प्रकरणांमध्ये सल्ला देणे.
- मुं.म.प्र.वि.प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांचे देयक व लेख्यांचे नोंदीकरण.
- देयक व लेख्यांचे अंतर्गत लेखा परीक्षण
- मुं.म.प्र.वि.प्राधिकरणाच्या निधीचे व्यवस्थापन.
- कर्मचाऱ्यांचे वेतन व भविष्य् निर्वाह निधी.
प्राधिकरणाच्या दिनांक 10.03.2023 रोजी झालेल्या 154 बैठकीत सन 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी बजेट रु. 23689.77 कोटी आणि खर्च 28704.18 कोटी इतक्या रक्कमेच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात मान्यता देण्यात यावी.
वार्षिक अंदाजपत्रक व वार्षिक लेखे तयार करणे
दरवर्षीप्रमाणे वार्षिक कार्य कार्यक्रम व अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक याबाबत विभाग प्रमुखांशी सल्ला मसलत करुन प्रस्ताव तयार केला जातो व तद्नंतर त्यावरील टिप्पणी प्रस्ताव प्राधिकरणापुढे मंजूरीसाठी ठेवला जातो. तिमाही आणि वार्षिक तपासणी करताना आर्थिक अंदाजपत्रक आणि प्रत्यक्ष खर्च यांची तुलना केली जाते. अंदाजपत्रकासंदर्भात शासन व इतर विभागाशी पत्रव्यवहार करणे.
सर्व आर्थिक प्रकरणांमध्ये सल्ला देणे
आथ्रिक प्रस्ताव / टेंडर दस्त्ऐवज / प्रकल्प् मूल्यांकनाची पडताळणी करणे. तसेच भूमी अधिमूल्य् निविदा दस्तऐवजांची तपासणी करणे.
मुं.म.प्र.वि.प्राधिकरणाच्या विविध प्रकल्पांचे देयक व लेख्यांचे नोंदणीकरण
प्राधिकरणाने विविध महत्वाचे व प्रतिष्ठित प्रकल्प् जसे मुंबई महानगर परिवहन प्रकल्प्, मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प, मिठी नदी विकास, मोनो व मेट्रो रेल्वे, वडाळा भारवाहक तळ विकास इ. प्रकल्प राबविण्यास घेतले आहेत. संबंधित प्रकल्पाची देयके तसेच कागदपत्रे नस्तीची पडताळणीची कामे, करार, डी.एस.आर. व सार्वजनिक बांधकाम नियमानुसार केली जातात.
प्राधिकरणाचे वार्षिक लेखे जसे अविशिष्ट् विकास निधी, मुंफिरता निधी, मुंबई नागरी विकास प्रकल्प-फिरता निधी लेखे लेखा पुस्तकाच्या आधारे तयार करण्यात येतात. वार्षिक लेख्याचा मसुदा त्यासोबत बाब टिप्पणी तयार करण्यात येऊन मुं.म.प्र.वि.प्राधिकरण (वित्तीय) विनियम 1/976 च्या नियम 13 (फ) अन्वये प्राधिकरणाचे वार्षिक लेखे प्रत्येक वर्षी मंजूरी/स्विकृती करीता प्राधिकरणाच्या बैठकीत सादर करण्यात येतात. प्राधिकरणाच्या बैठकीच्या मंजूरी/स्विकृती नंतर महालेखाकार (लेखा परिक्षण) यांच्याकडून लेखा परिक्षण करण्यात येते.
देयक व लेख्यांचे अंतर्गत लेखा परीक्षण
वित्त् व लेखा विभागात अंतर्गत लेखा परीक्षण शाखा असून ती रोख पुस्तिका देयके यांची दैनंदिन पडताळणी इतर वित्तीय प्रस्तावांची छाननी करण्याचे कार्य करते. त्याचप्रमाणे सदर शाखा दरवर्षी प्राधिकरणाचे त्रेमासिक व वार्षिक लेखे तपासणे व महालेखाकार कार्यालय या कार्यालयातर्फे घेण्यात येणाऱ्या लेखा परीक्षणाची व्यवस्था करते. महालेखाकार कार्यालयाच्या लेखापरिक्षण अहवालाचे अनुपाल व पाठपुरावा करते. प्राधिकरणाच्या त्रिमाही लेखे / भविष्य् निर्वाह निधी यांचे लेखापरीक्षण करुन या संबंधीचा अहवाल मुख्य् लेखा अधिकारी व वित्तीय सल्लागार यांना सादर करणे, वार्षिक लेखापरीक्षा कार्यक्रम / लेखापरिक्षणाचे प्रगती पत्रक सादर करणे, जड वस्तुंचे सत्यापन करणे, सेवा पुस्तिकाचे लेखा परिक्षण तसेच जमा-खर्च, तेरिज पत्रक, ताळेबंद यांची 100% तपासणी करणे, कर्मचाऱ्यांचे पगार व इतर देणी यांची तिमाही तपासणी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या अंतिम रक्कमांची तपासणी इ. कामे अंतर्गत लेखा परीक्षण शाखे तर्फे केले जाते.
मुं.म.प्र.वि.प्राधिकरणाच्या निधीचे व्यवस्थापन
प्राधिकरणास प्रतिष्ठीत अशा बांद्रा-कुर्ला संकुल, वडाळा ट्रक टर्मिनल व इतर अनुसूचित क्षेत्र यांच्या विकासासाठी नियुक्ती केली आहे. येथील जमिनीच्या विक्रीतून उभारलेला निधी संपूर्ण मुंबईमध्ये पायाभूत विकासासाठी आर्थिक मदत करण्यासाठी उपयोगात आणला जात आहे. सदर निधी विविध प्रकल्पांना उपयोगासाठी येईपर्यंत त्या निधीची वित्त् व लेखा विभागामार्फत राज्य् शासनाने आखलेल्या प्रचलित मार्गदश्रक तत्वानुसार गुंतवणूक केली जाते.
कर्मचारी यांच्या वेतन, भत्ते व भविष्य् निर्वाह निधी
भ.नि.नि. लेखे / गुंतवणूक यांची देखभाल, भ.नि.नि. कर्जा संबंधीचे प्रक्रियन, भ.नि.नि. यांचे मासिक / तिमाही लेखे, ताळेबंद तयार करणे, जून अखेरीस भ.नि.नि. ची विवरणपत्रे वितरीत करणे, कर्मचारी यांची मासिक वेतन / थकबाकी देयके काढणे, वेतन देयक नेांदवही तसेच पुरवणी नोंदवही तयार करणे व देखभाल करणे, तसेच वेतन संदर्भातील सर्व इतर कामे, वसुल खाती यांची देखभाल व पडताळणी तसेच संदर्भिय पत्रव्यवहार, कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र नस्ती देखभाल करणे व वेळेवर वैधानिक वजावटीच्या रक्कमा प्रदान करणे, आयकर, व्यावसायिक कर यांचे विवरणपत्रे भरणे व इतर वैधानिक विवरणपत्रे भरणे इ. कामे करण्यात येतात.