मुंबई मोनोरेल प्रकल्प
मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमची फीडर सेवा म्हणून मोनोरेल सुरू करण्याचा निर्णय प्राधिकरणाने सप्टेंबर 2008 मध्ये घेतला होता. चेंबूर – वडाळा – संत गाडगे महाराज चौक हा २० किमी लांबीचा कॉरिडॉर हा केवळ मुंबईचाच नाही तर भारतातील पहिला मोनोरेल प्रकल्प आहे.
MMRDA ने मे. RITES हे तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी तसेच बोली प्रक्रिया व्यवस्थापनात सहाय्य प्रदान करण्यासाठी सल्लागार म्हणून निवडले. प्रकल्पासाठी टेक्नो – आर्थिक आणि आर्थिक व्यवहार्यता अभ्यास हा मे. RITES आणि ट्रामवे कायद्यांतर्गत प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारने दिनांक 4 नोव्हेंबर 2008 रोजी अधिसूचना प्रकाशित केली होती. जागतिक निविदे द्वारे मी. लार्सन ॲण्ड टुब्रो आणि स्कोमी इंजिनिअरिंग, बीएचडी मलेशिया (एलटीएसई) हे या प्रकल्पाचे कंत्राटदार म्हणून निवडले गेले. या प्रकल्पाचा खर्च रु. 2,460 कोटी. (कर वगळता) आणि दोन टप्प्यांत हा प्रकल्प विभागण्यात आला आहे. वडाळा ते चेंबूर दरम्यान पहिला टप्पा 8.8 किलोमीटर तर दुसरा टप्पा वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा आहे.
तसेच m/s. एलटीएसईचा (LTSE) मोनोरेल प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. 29 डिसेंबर 2018 रोजी सार्वजनिक हितासाठी मु.म.प्र.वि.प्रा. ने कंत्राट समाप्त करून सर्व कामकाज हाती घेतले. आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक (11.20 किमी) 4 मार्च 2019 रोजी 17 स्टेशनची संपूर्ण लाईन लोकांसाठी खुली करण्यात आली.
- कॉरिडॉरची लांबी:
- टप्पा I (वडाळा-चेंबूर) - 8.80 किमी
- दुसरा टप्पा (संत गाडगे महाराज चौक-वडाळा) - 11.20 कि.मी.
- प्रकल्प खर्च कर वगळून - रु. 2460 कोटी
- प्रारंभ तारीख - 14 नोव्हेंबर, 2008
- डिझाईन हेडवे - 3 मिनिटे
- ट्रेनची रचना - 4 कार
- प्रवासी क्षमता - कमाल ५६२ प्रवासी
- डिझाइन गती - 80 किमी प्रतितास
- अनुसूचित वेग - 31 किमी प्रतितास
- ऑपरेशनचे तास - 05.00 तास ते 24.00 तास
- प्रवासाची वेळ:
- पहिला टप्पा – 22 मिनिटे
- दुसरा टप्पा – 32 मिनिटे
- स्थानकांची संख्या - 17 स्थानके
मोनोरेल प्रति तास सुमारे 20,000 प्रवाशांची वाहतूक करते आणि दररोज 1.5 ते 2 लाख प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता आहे. उपनगरीय रेल्वेने किंवा मेट्रोरेलने जोडलेले नसलेले शहराचे अनेक भाग मोनोरेल जोडते. याशिवाय, मोनोरेल वडाळा, करी रोड आणि चेंबूर येथील उपनगरीय रेल्वे प्रणालीशी जोडली गेली आहे. मोनोरेल ही एक कार्यक्षम फीडर ट्रान्झिट सिस्टीम असून प्रवाशांना फायदा होईल आणि ती कार्यक्षम, सुरक्षित, वातानुकूलित, आरामदायी आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक प्रदान करेल.
मोनोरेल फेज - I (वडाळा - चेंबूर) 02 फेब्रुवारी 2014 पासून लोकांसाठी खुला झाला. फेज - II (वडाळा - संत गाडगे महाराज चौक) 04 मार्च 2019 पासून लोकांसाठी खुला झाला.
सध्या मुंबई मोनोरेल चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक पासून लोकांसाठी परिवहन सेवा चालवत आहे आणि एकूण 20 KM कॉरिडॉरची लांबी आहे. सध्या मोनोरेल सेवा हि १५ मी. च्या अंतरावर धावत आहे.