inner-banner

मेट्रो मार्ग – १

मुंबई मेट्रो मार्ग – १ (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो प्रकल्प )

  • वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा मेट्रो प्रकल्प ११.४0 कि.मी. चा उन्न्त मार्ग आहे.
  • हा प्रकल्प पूर्व व पश्चिम उपनगरांचा भाग पश्चिम व मध्य रेल्वे यांना जोडला जाणार आहे.
  • उपनगरीय पश्चिम व मध्य रेल्वे सेवेच्या अनुक्रमे अंधेरी व घाटकोपर स्थानकावर अदलाबदल करण्याची सुविधा होईल.
  • वर्सोवा ते घाटकोपर या प्रवासाचा कालावधी ७१ मिनिटांवरुन कमी होऊन २१ मिनिटावर येईल.
  • एम.आय.डी.सी., सीप्स् व इतर परिसरात असलेल्या उद्योजकांना या मेट्रो प्रकल्पामुळे वाहतुक सेवेची व्यवस्था होईल.
67
1 मार्गाची लांबी 11.40km (उन्न्त)
2 एकूण स्थानके 12
3 फलाटाची लांबी 135 मि. (6 डब्बे)
4 कार डेपो ङि.एन.नगर
5 डब्याची लांबी 22 मि.
6 कमाल वेळ 80 प्रति तास
7 सरासरी वेळ 35 प्रति तास
8 बैठक व्यवस्था डब्यांच्या समांतर
9 4 डब्यांची गाडी 6 डब्यांची गाडी 1178 प्रवासी 1792 प्रवासी
10 प्रवासी संख्येचा आगाऊ अंदाज 2021- 6.65 लाख प्रति दिन (PHPDT - 23,321) 2031- 8.83 लाख प्रति दिन (PHPDT - 30,491)
11 डब्याचा दर्जा वातानुकूलित
12 प्रवाशी भाडे वसुली व्यवस्था संगणकीय व स्वयंचलित
13 अदलाबदल सोय
  1. पश्चिम रेल्वे : अंधेरी
  2. मध्य रेल्वे : घाटकोपर
  3. मेट्रो लाईन – 2 : डि. एन. नगर
  4. मेट्रो लाईन – 3: मरोळ नाका
68
प्रकल्पाची माहिती
प्रकल्पाचे नांव वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर (संपूर्णत: उन्न्त)
स्वरुप सार्वजनिक खाजगी सहभागाने
प्रकल्प अंमलबजावणी संस्था मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड
विशेष उद्दीष्ट् वाहन (SPV) महाराष्ट्र शासनाने हा मेट्रो प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण रिलायन्स् एनर्जी लिमिटेड व व्हेवोलिया ट्रान्सपोर्ट फ्रान्स् यांच्या संयुक्त् विद्यमाने मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड या विशेष उद्दीष्ट् वाहन (SPV) ची स्थापना करण्यात आली.
प्रकल्पाची एकूण किंमत रु. 2356 कोटी
व्यवहार्यता तफावत निधी रु. 650 कोटी
बांधकाम कालावधी 2007-2012 (सवलत करारनाम्यानुसार)

स्थानके (वर्सोवा ते घाटकोपर) :-

प्रकल्पाची माहिती
अनु.क्र. स्थानकाचे नांव
1 वर्सोवा
2 डी.एन.नगर
3 आझाद नगर
4 अंधेरी
5 पश्चिम द्रुतगती मार्ग
6 चकाला
7 विमानतळ रस्ता
8 मरोळ नाका
9 साकीनाका
10 असल्फा रोड
11 जागृती नगर
12 घाटकोपर
69

मेट्रो प्रकल्पाचे बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले असून अनुसंधान अभिकल्प आणि मानक संघटन (RDSO) आणि रेल्वे यांच्याकडून प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या मान्यतेचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्प् प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्य्क असलेले सुरक्षिततेचे प्रमाणपत्र रेल्वे सुरक्षा आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर प्रकल्प जनतेसाठी सुरु करण्यात येईल.metro 1

70
Loading content ...