inner-banner

मेट्रो मार्ग - ६

मेट्रो मार्ग 6: स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी

  • मेट्रो मार्ग-6, स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी (EEH) दरम्यान बृहन्मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुविधा प्रदान करण्यासाठी प्रस्तावित आहे.
  • सदर मेट्रो मार्ग 15.31 किमी लांबीचा आहे आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी (EEH) जोगेश्वरी, WEH, पवईमधून जाणारा आहे.
  • हा मार्ग पूर्णपणे उन्नत आहे आणि वेस्टर्न एक्सप्रेस आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडणी प्रदान करणारा आहे.
  • या मार्गामुळे मार्ग 2अ चे आदर्श नगर, मार्ग-7 चे JVLR स्टेशन, मार्ग-3 चे आरे डेपो स्टेशन आणि मार्ग-4 चे गांधीनगर स्टेशन अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंतरबद्दल सुविधा मिळेल .
  • सदर मेट्रो मार्गामध्ये 13 स्थानके आहेत आणि बहुतांश संरेखन जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या मध्यभागातून जात आहे.
  • इतर मेट्रो मार्गांप्रमाणेच यात एकात्मिक तिकीट प्रणाली, लिफ्ट्स, एस्केलेटर आणि पायऱ्यांच्या सुविधा यासोबतच दिव्यांगांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुधारित फूटपाथची सुविधा प्रदान करण्यात येणार आहे.
  • अतिरिक्त वाहतूक सुविधा प्रदान करण्यासाठी S.S.नगर ते महाकाली दरम्यान 4.750Km (अंदाजे) पैकी 2.58Km चा मेट्रो मार्ग व रोड फ्लायओव्हर देखील एकत्रितपणे त्याच सिंगल पिअरवर रस्त्याच्या मध्यभागी बृहन्मुंबईच्या सहकार्याने बांधला जाईल.
  • या मेट्रो मार्गाच्या बांधकामादरम्यान कोणत्याही महत्त्वाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील किंवा पुरातत्वाच्या दृष्टीने महत्त्वाच्या क्षेत्रावर थेट परिणाम होणार नाही.
  • अंधेरी ते (पूर्व द्रुतगती महामार्ग) EEH दरम्यान 30-45 मिनिटांच्या प्रवासी वेळेची बचत हा मुख्य फायदा आहे.

मेट्रो मार्ग – 6 (स्वामी समर्थ नगर – विक्रोळी)

तपशील
मार्गाची लांबी 15.31 कि.मी. (उन्नत)
एकूण स्थानके 13 (सर्व उन्नत)
उन्नत / भुयारी मार्ग पूर्णपणे उन्नत
कार डेपो कांजूरमार्ग (15.02 हेक्टर)
मेट्रो स्थानके 1. स्वामी समर्थ नगर    2. आदर्श नगर
3. जोगेश्वरी (प)    4. जेव्हीएलआर
5. श्याम नगर    6. महाकाली काव
7. सिप्झ व्हिलेज    8. साकी विहार रोड
9. रामबाग   10. पवई लेक
11. आयआयटी, पवई    12. कांजुरमार्ग (प)
13. विक्रोळी (ई.ई.एच)
स्थानके जोडणी 1. मेट्रो मार्ग 2अ इनफिनीटी मॉल येथे
2. मेट्रो मार्ग 7 जेव्हीएलआर येथे
3. मेट्रो मार्ग 3 आरे कॉलनी येथे
4. मेट्रो मार्ग 4 कांजूरमार्ग पश्चिम येथे
5. उपनगरीय रेल्वे क्रासींग - पश्चिम रेल्वे जोगेश्वरी येथे
मध्य रेल्वे कांजुरमार्ग येथे
प्रकल्प पूर्णत्वाची किंमत रु 6,716 कोटी
रायडरशिप वर्ष 2031- 7.69 लाख/दिवस (PHPDT – 29,658)
दैनंदिन प्रवासी संख्या वर्ष 2031 – 7.69 लाख/प्रतिदिवस
रेल्वेचे डबे रुंदी :3.20 मी.
उंची : 3.9 मी.
लांबी : 21.84 मी.

मेट्रो मार्ग – 6 स्थापत्य कामांकरीता ङि.एम.आर.सी कडून तीन भागात विभागणी :-

पॅकेज कंत्राटदाराचे नाव मार्गिका जागा लांबी कि.मी स्थानके क्र. प्रकल्प सुरु / पूर्ण होण्याची तारीख मंजूर निविदा रक्कम रु. कोटी
बीसी-03 मे. जे. कुमार सीटीआरजी (जेव्ही) स्वामी समर्थ नगर स्थानक ते महाकाली स्थानक (वगळून) 6.080 5 07.08.2018/
31.03.2024
867.75
बीसी-02 आर मे. एमबीझेड- ईआयआयएल (जेव्ही) महाकाली स्थानकसह ते पवई लेक स्थानकसह 4.329 5 05.09.2018/ 31.03.2024 372.22
बीसी-01 आर 1 मे. जे. कुमार इंन्फ्राप्रोजेक्ट लि. पवई लेक स्थानक (वगळून) ते विक्रोळी (ईईएच) 4.904 3 13.02.2019/ 31.03.2024 444.98

मेट्रो मार्गिका 6 प्रकल्प स्थापत्य कामे ऑक्टोबर-2024 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.

मेट्रो मार्गिका 6 पूर्ण (स्थापत्य + प्रणाली) एप्रिल 2026 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.