भूमी व मिळकत
अजिंक्य पडवळ
प्रमुख,
भूमी आणि मिळकत शाखा
प्राधिकरणाच्या प्रकल्पासाठी भूसंपादन तसेच प्राधिकरणाच्या सर्व जमिनी मालमत्ता इत्यादी विषयक असणारी कार्ये व कर्तेव्ये.
- प्राधिकरणाच्या सर्व प्रकल्पांसाठीचे आवश्यक जमिनीचे भूसंपादन करणे.
- शासनाच्या विविध कार्यालयासोबत भूमी विषयक कार्यासाठी समन्वये राखणे.
- प्राधिकरणाच्या वितरीत जमिनी संदर्भात भाडेपट्टा करार, भाडेपट्टा विलेख करणे व संबंधित करारामधील तरतूदीनुसार अनुज्ञय असलेल्या परवानगी / ना-हरकत देणे.
- प्राधिकरणाच्या जमिनीचे तात्पुरत्या वापरासाठी वितरण करणे जसे प्रदर्शन, आर.एम.सी., कास्टींग यार्ड, साईड ऑफिस, गोडाऊन इत्यादी.
- जमिनीची मोजणी, ताबा घेणे, मालमत्तेचे संरक्षण करणे इत्यादी.
- प्राधिकरणाच्या ताब्यातील जमिनीच्या संरक्षणासाठी सुरक्षासंस्थेची नेमणूक करणे.
- प्राधिकरणाच्या विशेष नियोजन क्षेत्रामध्ये नगर व क्षेत्र नियोजन विभागामार्फत अनधिकृत बांधकामाबाबतची महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम-1966 अंतर्गत पुर्ण केलेल्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष निष्कासनाची कामे.
- प्रकल्पामधील बाधित अतिक्रमणांचे निष्कासन.
- एमएमआरडीएच्या जमीन आणि इस्टेटच्या संरक्षणासाठी एजन्सीची नियुक्ती.
Sr. No. | Title | Download | View Image |
---|---|---|---|
1 | एमएमआरडीएच्या जमीन आणि इस्टेटच्या संरक्षणासाठी एजन्सीची नियुक्ती. | ![]() |
- |
2 | वाटप केलेल्या जमिनीच्या लीज डीडची अंमलबजावणी, कराराच्या तरतुदींनुसार लीज/पट्टेदार डीड आणि परवानगी एनओसी मंजूर करणे. | ![]() |
- |
3 | (i) प्रदर्शन परवानगी | ![]() |
- |
4 | (ii) चित्रपट चित्रीकरण परवानगी | ![]() |
- |
5 | (iii) "जमीन विक्री नियमावली १९७७" | ![]() |
- |
प्राधिकरणातील सर्व प्रकल्पाबाबतचे समन्व्य, भूसंपादन, बाधित अतिक्रमणचे निष्कासन व प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जमिनीचे हस्तांतरण, जमिनीची मोजणी, जमिनीचे सिमांकन करणे, भूसंपादनासाठी बाधित जमीन मालक व जमिनीचा ताबा घेणेबाबत संवाद / समन्व्य राखणे इत्यादी.