inner-banner

माहिती तंत्रज्ञान

SC Desh Pande

श्री. हिमांशू शेखर

प्रणाली व्यवस्थापक,
माहिती तंत्रज्ञान कक्ष

मुं.म.प्र.वि. प्राधिकरणाने 28 जून 2010 रोजी नाविन्यपूर्ण ICT प्रकल्प सुलभ करण्यासाठी, मुं.म.प्र.वि.प्रा. अंतर्गत ICT पायाभूत सुविधांची खरेदी आणि देखभाल करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान कक्षाची स्थापना केली आहे.

उद्दिष्ट:

मुं.म.प्र.वि. प्राधिकरणाच्या माहिती व तंत्रज्ञान कक्षाचे उद्दिष्ट :

"मुं.म.प्र.वि.प्राधिकरणामधील प्रक्रियांचे अंतर्गत कार्यक्षमता, पारदर्शकता, सेवा वितरण आणि मानांकन सुधारण्यासाठी."

उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दोन टप्पे:

टप्पा-1: मुं.म.प्र.वि.प्रा. सेंट्रिक

  • सर्व्हर रूम, लॅन, हार्डवेअर
  • वेबसाइट, ई-टेंडरिंग
  • 500 एमबीपीएस इंटरनेट कनेक्टिव्हिटी
  • पेमेंट, एसएमएस आणि ईमेल गेटवे
  • स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन
  • एक्झिबिशन लँड मॉड्यूल
  • आर अँड आर डेटाबेस
  • व्हिडिओ कॉन्फरन्सिंग
  • ई-ऑफिस

टप्पा-2: सिटीझन सेंट्रिक

  • एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ERP)
  • एंटरप्राइझ वेब GIS
  • बिल्डिंग प्लॅन मंजूरी
  • प्रादेशिक माहिती प्रणाली

सध्याचे ई-गव्हर्नन्स उपक्रम:

अ) अंमलबजावणी आणि देखरेख

  • ERP प्रणाली
  • मेट्रो प्रकल्पांसाठी एकात्मिक डिजिटल वितरण
  • बिल्डिंग प्लॅन अप्रूव्हल सिस्टीम (BPAS)
  • SDWAN सायबर सिक्युरिटी / थ्रेट इंटेलिजन्स, नेटवर्क सिक्युरिटी
  • LAN आणि वायफाय प्रणाली अद्ययावत करणे
  • स्वयंचलित आयटी मालमत्ता व्यवस्थापन
  • वेबसाइट पुनर्रचना, सुधारणा, देखभाल आणि होस्टिंग
  • नेटवर्क फायरवॉल आणि लोड बॅलन्सर
  • हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर प्रोक्योरमेंट
  • IT सुविधा व्यवस्थापन सेवा (FMS)
  • ई-मेल, एसएमएस, पेमेंट गेटवे व डिजिटल स्वाक्षरीसह सेवा एकत्रीकरण
  • डॅशबोर्ड
  • ई-ऑफिस
  • इंटरनेट लीज्ड लाईन
  • PMC आणि डेटा विश्लेषण
  • इतर ई-गव्हर्नन्स उपक्रम (MITC, NIC, महाराष्ट्र सरकार सह)
  • विधी शाखेसाठी केस मॅनेजमेंट सिस्टम (CMS) व रिअल टाइम डॅशबोर्ड (RRD)
  • ई-लॉटरी प्रणालीद्वारे सामाजिक विकास कक्ष संगणकीकरण
  • RTS अंतर्गत ऑनलाईन सेवा देणारे पोर्टल

IT OC Marathi

 

विभागाची कार्ये

माहिती व तंत्रज्ञान कक्ष खालील सेवांची सुविधा देते:

  • हेल्पडेस्क सपोर्ट
  • IT मालमत्ता व्यवस्थापन
  • प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना तांत्रिक सहाय्य पुरविणे
  • नेटवर्क व्यवस्थापन आणि देखरेख
  • सर्व्हर देखभाल
  • आयटी नेटवर्क सुरक्षा, अँटीव्हायरस व्यवस्थापन आणि अनुपालन
  • एमएमआरडीएच्या कार्यालयातील आयटी इन्फ्राची देखभाल
  • कर्मचाऱ्यांमध्ये डिजिटल क्षमता निर्माण करण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करणे
  • प्राधिकरणातील सर्व अधिकाऱ्यांसाठी आयटी हार्डवेअर / सॉफ्टवेअरची खरेदी करणे
  • विविध विभागीय सॉफ्टवेअर अनुप्रयोगांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया जसे की:
    • एंटरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंग (ERP) अनुप्रयोग
    • लोकसेवा हक्क (RTS) अंतर्गत असलेल्या सेवा ऑनलाईन देण्यासाठी पोर्टल विकसित करणे
    • ई-लॉटरी प्रणालीद्वारे प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासह सामाजिक विकास कक्षाचे संगणकीकरण
    • विधी शाखेमध्ये केस मॅनेजमेंट सिस्टम (CMS) आणि रिअल टाइम रिपोर्टिंग डॅशबोर्ड (RRD)
    • व्यवसाय सुलभता (EODB) पोर्टल

1)  ई-सोडत प्रणालीद्वारे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह सामाजिक विकास कक्षाच्या संगणकीकरणासाठी संस्थेची नियुक्ती करणे.


संक्षिप्त वर्णन :

  • सर्वेक्षण एजन्सीद्वारे मूळ सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण (BSE अहवाल) तयार करणे.
  • BSE अहवालाचे मूल्यांकन करणे आणि शासनाच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक प्रभावित व्यक्तीची पात्रता निश्चित करणे.
  • विविध टप्प्यांमध्ये लॉटरीचे नियोजन व अंमलबजावणी करणे.
  • लॉटरीच्या निकालानुसार प्रभावित व्यक्तींना वाटपपत्रे व ताबापत्रे देणे.
  • सोसायटी नोंदणी, संघ नोंदणी.
  • वरील प्रक्रिया संबंधित विभागांचे अधिकारी त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका व जबाबदाऱ्यांसह पार पाडतील.

कराराचे तपशील :

  • प्रकल्प कराराची किंमत    :    ₹1,10,00,000/- (रुपये एक कोटी दहा लाख फक्त) जीएसटी वगळून.
  • प्रकल्प कंत्राटदार    :    मेसर्स निओसॉफ्ट टेक प्रायव्हेट लिमिटेड
  • करार प्रदान करण्याची दिनांक    :    15.10.2024
  • प्रकल्प कालावधी    :    3 महिने अंमलबजावणी व Go-Live नंतर 2 वर्षे तांत्रिक सहाय्य

2)   मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात ई-गव्हर्नन्स उपक्रमाचा भाग म्हणून बीस्पोक ईआरपी (Bespoke Enterprise Resource Planning) प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी एजन्सी (Agency) ची नियुक्ती करणे.


संक्षिप्त वर्णन :
ईआरपी अंमलबजावणीसाठी कल्पित मोड्यूल्स खालीलप्रमाणे आहेत :

  • प्रकल्प व्यवस्थापन
  • मानव संसाधन व्यवस्थापन आणि पे-रोल
  • वित्त, लेखा, लेखापरीक्षा, रोकड आणि गुंतवणूक व्यवस्थापन
  • बजेट आणि नियोजन व्यवस्थापन
  • जमीन आणि मालमत्ता व्यवस्थापन
  • कायदेशीर प्रकरण व्यवस्थापन
  • सेवा आणि करार व्यवस्थापन
  • मालमत्ता आणि साठा व्यवस्थापन
  • तक्रार निवारण व्यवस्थापन


कराराचे तपशील :

  • प्रकल्प कराराची किंमत    :    ₹47,40,88,333/- (रुपये सत्तेचाळीस कोटी चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे तेहतीस फक्त) जीएसटी वगळून.
  • प्रकल्प कंत्राटदार    :    मेसर्स चेन-सिस (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड व संयुक्त उपक्रमातील भागीदार संस्था नेटकॉन् टेक्नॉलॉजीज मर्या.
  • करार प्रदान करण्याची दिनांक    :    02.06.2025
  • प्रकल्प कालावधी    :    1 वर्ष अंमलबजावणी व Go-Live नंतर 2 वर्षे तांत्रिक सहाय्य

3)     मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी IDDP (इंटिग्रेटेड डिजिटल डिलिव्हरी प्लॅटफॉर्म) द्वारे पायाभूत प्रकल्पांचे निरीक्षण


बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (BIM) ही एक प्रक्रिया आहे, जी विविध साधने, तंत्रज्ञान आणि करारांद्वारे समर्थित असून प्रकल्पांचे किंवा स्थळांचे भौतिक व कार्यात्मक वैशिष्ट्यांचे डिजिटल स्वरूप निर्माण व व्यवस्थापित करण्यासाठी वापरली जाते.
इंटिग्रेटेड डिजिटल डिलिव्हरी प्लॅटफॉर्म (IDDP) ही मेट्रो व पायाभूत सुविधा प्रकल्पांचे व्यवस्थापन करण्यासाठी एक परिवर्तनशील पद्धत  आहे, जी पारंपरिक कार्यप्रणालींपेक्षा लक्षणीय सुधारणा देते. CDE, 5D BIM, GIS, ड्रोन तंत्रज्ञान, आणि ERP एकत्रिकरण या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून MMRDA ला अधिक कार्यक्षम डेटा व्यवस्थापन, सुधारित समन्वय व सहयोग, प्रकल्पाचे स्पष्ट दृश्यात्मक सादरीकरण, परिणामकारक निरीक्षण आणि डेटा-आधारित निर्णय घेणे शक्य होईल. IDDP मध्ये सविस्तर डिझाइन, संकल्पनात्मक डिझाइन, विश्लेषण, दस्तऐवजीकरण, उत्पादन, बांधकाम साखळी, देखभाल व संचालन (O&M), नूतनीकरण इत्यादींचा समावेश आहे. ही एक सर्वसमावेशक प्रणाली असून मुंबईतील मेट्रो व पायाभूत सुविधा प्रकल्प अधिक कार्यक्षमतेने, अचूकतेने आणि यशस्वीरित्या पूर्ण करण्यास मदत करेल.
प्रमुख घटक :

  • BIM (बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग) : पायाभूत  सुविधा प्रकल्पांचे भौतिक व कार्यात्मक वैशिष्ट्यांचे डिजिटल स्वरूप तयार व व्यवस्थापित करण्याची प्रक्रिया.
  • GIS एकत्रिकरण:
  • प्रकल्पाशी संबंधित जमीन, मालमत्ता आणि सुविधा यांची दृश्यात्मक आणि स्थान-खुणांकित (geo-tagged) माहिती
  • X, Y आणि Z अक्षांनुसार 3D मॉडेल तयार करण्याची क्षमता
  • प्रकल्प व्यवस्थापन व नागरी सेवांसाठी डॅशबोर्ड

सारांश

  • खर्च व्यवस्थापन : 3D मॉडेल व एकत्रिकृत अर्थसंकल्पीय डेटाद्वारे रिअल-टाइम आणि अचूक खर्चाचे अंदाज
  • वेळापत्रकाचे दृश्यीकरण (Schedule Visualization) : 5D BIM मुळे भौतिक प्रगती आणि वेळापत्रक यांचा योग्य मेळ साधता येतो, ज्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होतो.
  • डेटा-आधारित निर्णय : संकल्पनेपासून देखभाल टप्प्यापर्यंत योग्य निर्णय घेण्यासाठी समृद्ध डेटासंच उपलब्ध
  • क्लॅश डिटेक्शन (Clash Detection) : रचनात्मक बदल झाल्यास त्याचे खर्च व वेळापत्रक यावर त्वरित अपडेट, ज्यामुळे संसाधनांचा प्रभावी वापर होतो.