inner-banner

भाडे तत्वावरील घरे योजना

Rental Housing Project

भाडे तत्वावरील घरे योजना महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण धोरण 2007 च्या आधारे महाराष्ट्र शासनाने खाजगी क्षेत्राच्या सहभागातून भाडे तत्वावरील घरे योजना सुरु केली आहे. महाराष्ट्र शासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची भाडे तत्वावरील घरे योजनेसाठी प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून नेमणूक केलेली आहे. सदर योजनेमध्ये खाजगी विकासकांना प्रोत्साहनपर (Incentive) चटई क्षेत्र निदेशांक देण्यात येतो त्याबदल्यात 160 चौ.फूट तळपृष्ठाची घरे व त्याच्याशी संलग्न जमीन ही मुं.म.प्र.वि.प्रा. ला मोफत देण्यात येईल जी नंतर पात्र ठरणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील लोकांना देण्यात येतील. भाडे तत्वावरील घरे योजना नवी मुंबई व माथेरान नगरपालिका क्षेत्राव्यतिरिक्त मुंबई महानगर प्रदेशातील नागरीकरण क्षेत्रात सर्व ठिकाणी सन 2008 पासून मुं.म.प्र.वि.प्रा. मार्फत राबविण्यात येते. भाडे तत्वावरील घरे प्रकल्पांना मुं.म.प्र.वि.प्रा. तर्फे लोकेशन क्लिअरन्स देण्यात येते व संबंधित नियोजन प्राधिकरणातर्फे बांधकाम परवानगी देण्यात येते. सध्या ठाणे, मिरा-भाईंदर व कल्याण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात व रायगड जिल्हयातील पनवेल तालुका क्षेत्रात भाडे तत्वावरील घरांचे प्रकल्प चालू आहेत.

Rental Housing Project

सरकारी अधिसूचनेमध्ये विकासकांना अतिरिक्त फ्लोअर स्पेस इंडेक्स (FSI) देण्याची आणि 1१६०/३२० चौरस मीटरच्या चटई क्षेत्रफळाची मोफत घरे मिळण्याची तरतूद आहे. वाढीव एफएसआय च्या बदल्यात विकासकांकडून शुल्क देखील घेतलि गेली आहे.

Rental Housing Project

MMRDA ने 44 रेंटल हाऊसिंग प्रस्तावांना स्थान मंजुरी दिली आहे जे 40441 RHU तयार करतील. 44 पैकी 33 रेंटल हाऊसिंग योजना महापालिका क्षेत्रात आहेत तर १९ रेंटल हाऊसिंग योजना MMR च्या U१ U२ भागात आहेत. वर्तकनगर, ठाणे येथे १,४४८ RHU आणि महाजनवाडी, मीरा भाईंदर, ६३२ RHU चा समावेश असलेला भाड्याचा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण झाला आहे आणि त्या सदनिका अनुक्रमे ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

Rental Housing Project

योजनेची दिनांक 31.05.2014 पर्यंतची स्थिती :

मुं.म.प्र.वि.प्रा.ने भाडे तत्वावरील घरांच्या ५३ प्रकल्पांना लोकेशन क्लिअरन्स दिलेले आहे. ज्याद्वारे १६० चौ.फूट तळपृष्ठ क्षेत्राची सुमारे १,०६,००० भाडे तत्वावरील घरे तयार होणे अपेक्षित आहे. यापैकी ३२ प्रकल्पांच्या बांधकामांना सुरुवात झालेली असून त्याद्वारे सुमारे ५७,००० भाडे तत्वावरील घरे उपलब्ध होऊ शकतील. आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत भाडे तत्वावरील घरे योजनेतंर्गत वर्तकनगर येथे स्थित असलेला प्रकल्प पूर्ण झालेला असून शासनाच्या सुचनेनुसार प्राधिकरणाने सदर प्रकल्पातील इमारती ठाणे महानगरपालिकेस हस्तांतरीत केलेल्या आहेत. तसेच, मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील अन्य एक प्रकल्प पूर्ण झालेला असून सदर प्रकल्पातील सदनिकांचा ताबा मिरा भाईंदर महानगरपालिकेने घ्यावा असे प्राधिकरणाने मिरा भाईंदर महानगरपालिकेस कळविले आहे. याशिवाय, अन्य काही भाडे तत्वावरील घरे प्रकल्पांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

भाडे तत्वावरील घरे योजनेअंतर्गत मुंबई महानगरप्रदेशातील महानगरपालिका क्षेत्रात स्थित असलेल्या प्रकल्पांतून प्राप्त होणाऱ्या एकूण सदनिकांपैकी सर्वसाधारणपणे ५०% पर्यंत सदनिका प्राधान्याने संक्रमण निवासस्थान म्हणून वापरण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्तांच्या ताब्यात देण्याबाबत शासनाने दिनांक २२.०८.२०१३ रोजीच्या पत्रान्वये प्राधिकरणास कळविले आहे. तसेच दिनांक २१.०२.२०१४ रोजीच्या शासन अधिसूचनेमध्ये भाडे तत्वावरील घरे योजनेअंतर्गत मुंबई महानगर प्रदेशातील महानगरपालिकेतर क्षेत्रात स्थित असलेल्या भाडे तत्वावरील घरे योजनेतून उपलब्ध होणाऱ्या सदनिकांपैकी ५०% सदनिका गिरणी कामगार व शासनाने निश्चित केलेल्या लोकांच्या इतर गटांना मालकी तत्वावर वाटपासाठी राखून ठेवण्याबाबत उल्लेख आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील पालिका क्षेत्रामधील भाडे तत्वावरील घरे योजनेचे परवडणारी घरे योजनेमध्ये रुपांतर करण्याबाबत हेतू महाराष्ट्र शासनाच्या दिनांक ३०.११.२०१३ रोजीच्या सूचनेमध्ये प्रसिध्द करण्यात आला. त्याचबरोबर मुंबई महानगर प्रदेशातील पालिकेतर क्षेत्रामध्ये भाडे तत्वावरील घरे योजना खंडित करण्याबाबतचा हेतू शासनाच्या दि. २४.०२.२०१४ रोजीच्या सूचनेद्वारे जाहिर करण्यात आला. सदर दोन्ही सुचनांबाबत सूचना व हरकती मागविण्यात आलेल्या असून त्याबाबतच्या अंतिम अधिसूचना प्रसिध्द होणे बाकी आहे.

Loading content ...