inner-banner

मेट्रो मार्ग - ७

मेट्रो मार्ग 7 (अंधेरी पूर्व - दहिसर पूर्व )

  • अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो मार्ग 7 हा 16.5 किमी लांबीचा असून एकूण 13 उन्नत स्थानके आहेत.
  • मेट्रो मार्ग 7 द्वारे पश्चिम द्रुतगती महामार्ग, मेट्रो मार्ग 1 (घाटकोपर ते वर्सोवा), सध्या सुरू असलेली मेट्रो मार्ग 2अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो मार्ग 6 ((स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) दरम्यान परस्पर संपर्क साधण्यात येईल.
  • या प्रकल्पामुळे अंधेरी, जेव्हीएलआर आणि दहिसर येथील उपनगरीय रेल्वे प्रणाली आणि एमआरटी प्रणाली सहजतेने आणि कार्यक्षम देवाणघेवाण सुलभपणे होईल.
  • हा प्रकल्प मध्य मुंबई आणि उत्तर उपनगरी मुंबई दरम्यान जोडणी प्रदान करेल.
  • हा प्रकल्प मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए), सीप्ज़, नॅशनल पार्क आणि इतर व्यावसायिक आणि महत्वाच्या भौगोलिक ठिकाणी रेल्वे आधारित प्रवेश प्रदान करेल.
  • हा प्रकल्प सध्याच्या प्रवासाची वेळ रस्त्याच्या परिस्थितीनुसार 50% ते 75% पर्यंत कमी करेल.
प्रकल्प वैशिष्ट्ये
मार्गाची लांबी 16.5 कि.मी. (उन्नत)
मार्गाचा रंग लाल
एकूण स्थानके 13 (सर्व उन्नत)
  1. गुंदवली, 2. मोगरा, 3. जोगेश्वरी (पूर्व), 4. गोरेगाव (पूर्व), 5.आरे, 6. दिंडोशी, 7. कुरार, 8.आकुर्ली, 9. पोईसर, 10. मागाठाणे, 11. देवीपाडा, 12. राष्ट्रीय उद्यान, 13. ओवरीपाडा
उन्नत/भूमिगत पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या बाजूने उन्नत
मेट्रो स्थानके जोडणी
  1. अंधेरी (पश्चिम दृतगती मार्ग - मेट्रो मार्ग 1)
  2. दहिसर (मेट्रो मार्ग 2अ)
  3. जेव्हिएलआर (मेट्रो मार्ग 6)
प्रकल्प पुर्णत्वाची किंमत रु. 6,208 कोटी
दैनंदिन प्रवासी संख्या  
2031 दैनंदिन प्रवासी - 6.7 लाख (प्रतिदिन प्रतितास 18,584)

Updates as on 17 th April 2023

  • टप्पा 1 (आरे- दहिसर)

10.7 किमी, 9 स्थानकांसह(आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान, ओवरीपाडा) 2 एप्रिल 2022 रोजी कार्यान्वित झाला.

  • टप्पा 2 (आरे-अंधेरी)

5.8 किमी, 4 स्थानकांसह (गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी (पूर्व), गोरेगाव (पूर्व)) 19 जानेवारी 2023 पासून कार्यान्वित झाला आहे.

नकाशा

 

Loading content ...