inner-banner

निर्मल एम.एम.आर. अभियान

Nirmal MMR Abhiyan

केंद्र शासनाने उघडयावर शौचास बसण्याच्या प्रथेचे उच्चाटन करण्याचे निर्धारीत केले आहे. तसेच राज्य् शासनाने क्र. एम.एस.एस.-1000 एस.क्र.241/पी.क्र.पी.पी.41, मंत्रालय, मुंबई, दिनांक 30 ऑगस्ट्, 2001 च्या शासन निर्णयान्वये बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील इतर महानगरपालिका / नगरपालिका क्षेत्रामध्ये वस्ती स्वच्छतागृहे बांधणे व त्यातील सुविधांची देखभाल-दुरुस्ती करण्याबाबतचे धोरण ठरविले आहे.

केंद्र व राज्य् शासनाच्या धोरणाचा सखोल अभ्यास करुन निर्मल मुंबई महानगर प्रदेश स्वच्छता अभियान हा महत्वपूर्ण लोकाभिमूख कार्यक्रम अशासकीय संस्थांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य् संस्था यांच्या संपूर्ण मार्गदर्शन व नियंत्रणाखाली तसेच लोकसहभागातून रबिविण्याचा निर्णय प्राधिकरणाच्या दिनांक 28 सप्टेंबर, 2007 च्या बैठकीत घेण्यात आला.

निर्मल एम. एम.आर. अभियानात खालील संस्थांच्या महत्वापूर्ण भूमिका आहेत

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 100 टक्के अनुदान देण्यात आले. स्थानिक स्वराज्य् संस्थांना निधी उपलब्ध् करुन देणे व निधीचा योग्य वापर यांचे नियोजन व संनियंत्रण यासाठी निर्मल एम.एम.आर. अभियान हा कक्ष प्राधिकरणांतर्गत स्थापन करण्यात आला.

स्थानिक स्वराज्य् संस्था :- महानगरपालिका/नगरपरिषदा यांच्या नियंत्रणाखाली वस्ती स्वच्छतागृहे असून, त्यामुळे त्यांचे संपूर्ण नियोजन करणे, कामाचे कार्यादेश देणे, बांधकामाचे साहित्य्, बांधकामाचा दर्जा, मोजमाप पुस्तिकेमध्ये नोंदी घेणे तसेच त्याप्रमाणे अशासकीय संस्थांना देयके अदा करणे, वस्ती स्वच्छतागृहांसाठी लागणारी जागा, पाणी, वीज पुरवठा करणे, सामुहिक अधिष्ठीत संस्थांची नेमणूक करणे इत्यादीची जबाबदारी महानगरपालिका / नगरपरिषदांची आहे. तसेच स्थानिक स्वराज्य् संस्थांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास अपेक्षित सर्व अहवाल देणे आवश्यक आहे.

अशासकीय संस्था :- वस्ती स्वच्छतागृहांतील सुविधांचे नियोजन आराखडा तयार करणे तसेच लोकसहभाग मिळविणे, प्रचार-प्रसिध्दी, आरेग्य् शिक्षण, प्रशिक्षण व सामूहिक अधिष्ठीत संस्थांची नोंदणी इत्यांदींबाबतची सर्व जबाबदारी अशासकीय संस्थांची राहील.

सामूहिक अधिष्ठीत संस्था :- निर्मल एम.एम.आर अभियानांतर्गत बांधण्यात आलेले वस्ती स्वच्छतागृहे चालविणे व देखभाल-दुरुस्ती ही सामुहिक अधिष्ठीत संस्थांमार्फत केली जाते म्हणून या शौचालयांना वस्ती स्वच्छतागृहे असे संबोधिले जाते. ज्याठिकाणी सामुहिक अधिष्ठीत संस्था नेमण्यात आलेल्या नाहीत अशा वस्ती स्वच्छतागृहांची देखभाल-दुरुस्ती संबंधीत स्थानिक स्वराज्य् संस्थांमार्फत केली जाते.

Nirmal MMR Abhiyan

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन वर्षात 25466 जागांच्या 1283 जागा तयार करून झोपडपट्टीतील लोकांच्या ताब्यात दिल्या आहेत. एक टॉयलेट सीट साधारणपणे 40 लोक वापरतात म्हणजे दररोज सुमारे 1,00,000 लोक या टॉयलेटचा वापर करतात. या टॉयलेट ब्लॉकमध्ये पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे आणि विशेषतः महिलांसाठी स्नानगृह उपलब्ध आहेत. या सामुदायिक टॉयलेट ब्लॉक्समध्ये स्वतंत्र विद्युत आणि पाण्याचा पुरवठा केला जातो. स्वच्छतागृहाची चोवीस तास स्वच्छता व देखभाल, केअर टेकरसाठी निवासी निवासाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास 1200 लोकांना रोजगार मिळाला आहे.

Nirmal MMR Abhiyan

मुंबई महानगर प्रदेशातील बृहन्मुंबई महानगरपालिका व नवी मुंबई महानगरपालिका वगळून इतर 6 महानगरपालिका व 9 नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रांमध्ये अंदाजित रु. 300 कोटी इतक्या रक्कमेची 24,000 शौचकुपे बांधण्याचे ठरविले.

Nirmal MMR Abhiyan
Sr. No. Name of ULB Actual Target Target Achieved
Sites Seats Sites Seats
1 ठाणे 362 7128 362 7128
2 कल्याण-डोंबिवली 192 3931 192 3931
3 मीरा-भाईंदर 152 3216 152 3216
4 उल्हासनगर 163 3275 163 3275
5 भिवंडी-निजामपूर 207 4551 206 4533
6 अंबरनाथ 72 1414 71 1398
7 कुळगाव-बदलापूर 27 256 27 256
8 वसई 10 138 10 138
9 नवघर माणिकपूर 7 115 7 115
10 नालासोपारा 6 58 6 58
11 विरार 7 108 7 108
12 कर्जत 22 240 22 240
13 खोपोली 27 592 27 592
14 माथेरान 5 83 3 48
15 पनवेल 9 84 9 84
16 उरण 2 12 1 6
17 पेन 17 325 17 325
18 अलिबाग 1 15 1 15
एकूण 1288 25541 1283 25466
Loading content ...