inner-banner

मेट्रो मार्ग -२अ

मुंबई मेट्रो मार्ग २अ (दहिसर - डी एन नगर )

  • दहिसर ते डी एन नगर पर्यंत मेट्रो मार्ग 2अ हा 18.6 किमी लांबीचा असून एकूण 17 उन्नत स्थानकांचा समावेश आहे.
  • सदर मार्गाने मेट्रो मार्ग 1 (घाटकोपर ते वर्सोवा), सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्ग 2ब (डी एन नगर ते मंडळे) आणि मेट्रो मार्ग 7 (अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व)) आणि मेट्रो मार्ग 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) यांच्यात परस्पर संपर्क साधला जाईल.
  • चारकोप/मालवणी येथे गाड्यांच्या देखभालीसाठी 16.4 हेक्टर जागेवर डेपो बांधण्यात आला आहे आणि 29 जानेवारी 2021 रोजी मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदर डेपोचे उद्घाटन करण्यात आले.
  • या प्रकल्पामुळे मुंबईतील दहिसर (पू) ते डी एन नगर या सर्वात व्यस्त मार्गावरील (नवीन लिंक रोड) वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
  • दहिसर आणि डी एन नगर येथील उपनगरीय रेल्वे प्रणाली आणि एमआरटी प्रणालीसह सुगम आणि कार्यक्षम आदानप्रदान सुलभ करेल.
  • सदर मार्ग पश्चिम, मध्य मुंबई आणि उत्तर उपनगरी मुंबई दरम्यान जोडणी प्रदान करेल.
  • सदर मार्ग मुंबईतील व्यावसायिक आणि महत्त्वाच्या भौगोलिक ठिकाणांवर रेल आधारित प्रवेश प्रदान करेल.
  • सध्याच्या प्रवासाची वेळ रस्त्याच्या परिस्थितीनुसार 50% ते 75% पर्यंत कमी करेल.
86
प्रकल्प वैशिष्ट्ये
मार्गाची लांबी 18.6 कि.मी. (उन्नत)
मार्गाचा रंग पिवळा
एकूण स्थानके 17(सर्व उन्नत)
  1. दहिसर (पू), 2. आनंद नगर, 3. कांदरपाडा, 4. मंडपेश्वर-आय सी कॉलनी, 5. एकसर, 6.बोरीवली (प), 7. पहाडी एकसर, 8. कांदिवली (प), 9. डहाणूकरवाडी, 10. वळनई, 11. मालाड (प), 12. लोअर मालाड, 13. पहाडी गोरगाव,14. गोरेगाव (प) , 15. ओशिवरा, 16. लोअर ओशिवरा, 17. अंधेरी (प)
देखभाल दुरुस्ती डेपो मालवणी (चारकोप) (16.4 हेक्टर)
स्थानके जोडणी
  1. दहिसर (मेट्रो मार्ग 7)
  2. जेव्हिएलआर (मेट्रो मार्ग 6)
  3. डि.एन. नगर (मेट्रो मार्ग 1)
प्रकल्प पुर्णत्वाची किंमत रु.6,410 कोटी
दैनंदिन प्रवासी संख्या:  
2031 दैनंदिन प्रवासी - 6.09 लाख (प्रतिदिन प्रतितास 15565)
87
  • टप्पा 1 (दहिसर- डहाणूकरवाडी)–

9.8 किमी, 9 स्थानकांसह (दहिसर (पू), आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर-आय सी कॉलनी, एकसर, बोरीवली (प), पहाडी एकसर, कांदिवली (प), डहाणूकरवाडी) 2 एप्रिल 2022 रोजी कार्यान्वित झाला.

  • टप्पा 2 (डहाणूकरवाडी - डी एन नगर) –

8.8 किमी, 8 स्थानकांसह (वळनई, मालाड (प), लोअर मालाड, पहाडी गोरगाव, गोरेगाव (प), ओशिवरा, लोअर ओशिवरा, अंधेरी (प)) 19 जानेवारी 2023 पासून कार्यान्वित झाला आहे.

88
Metro-Line 2A-Key-Map

 

89
Loading content ...
×

Rate Your Experience