inner-banner

झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण कक्ष

श्री भूषण चौधरी,   Deputy Director of Town Planning (D.D.T.P.)

श्री भूषण चौधरी,
उप संचालक नगर रचना (उ. सं. न. र.)

मुंबई महानगर प्रदेश विकास अधिनियम, 1974 मधील कलम 17(3) मध्ये सुधारणा केल्याप्रमाणे महानगर आयुक्त, मुंमप्रविप्रा यांना मुंबई महानगर प्रदेश अधिनियमातील कलम 17(1) अन्वये प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याकरीता "झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण" म्हणून मान्यता देण्यात आली. कलम 17(3) अन्वये महानगर आयुक्त, मुंमप्रविप्रा यांना झोपडपट्टी पुनर्वस्न प्राधिकरणाचे अधिकार प्रदान करण्यात आले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम, 1966 अन्वये असलेले अधिकारही महानगर आयुक्त यांना प्रदान करण्यात आले. त्यामुळे महानगर आयुक्त, मुंमप्रविप्रा हे "डिम्ड एसआरए" आहेत

झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रस्तावांची छाननी करणे तसेच विकास नियंत्रण नियमावलीच्या तरतुदीनुसार आणि झोपडपट्टी पुनवर्सन मार्गदर्शक तत्वांच्या आधारे पुढील परवानग्या देण्याचे कार्य प्राधिकरणात स्थापन करण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागामार्फत करण्यात येते. सदर योजने अंतर्गत काही अपवादात्म्क स्थित झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सोडता बहुतांशी प्राधिकरणाने प्रकल्पग्रस्तांसाठी खाजगी व मोकळया भुखंडावर झो.पु. योजना मंजूर केल्या आहेत. सदर सदनिका हया खाजगी विकासकामार्फत जमिन व बांधकाम विकास हस्तांतरण हक्क (टिडीआर) या तत्वावर बांधण्यात येतात. त्यामुळे सदर पुनर्वसन सदनिका प्राधिकरणास विनाशुल्क प्राप्त होतात.

संघटनात्मक तक्ता झोपडपट्टी पुनर्वसन विभाग

  • झोपडपट्टी पुनर्वसन प्रस्तावाची छाननी व मान्यता, संमत्ती पत्र (LOI) आराखडे व इमारतींचे नकाशे प्रदान करणे, काम सुरु करण्याचा दाखला व भोगवटी प्रमाणपत्र (OC) देणे.
  • हस्तांतरणीय विकास अधिकार (TDR) चे अनुमोदान करणे. 

  • झोपडपट्टी पुनर्वसन योजना जेथे राबविण्यात आल्या आहेत तेथे वेगवेगळया सामाजिक सुविधांचे नियोजन करणे. 

  • बांधकामाचा दर्जा व त्यानुसार इमारतींचे बाहय स्वरुप तसेच गळती रोधक साधनांचा वापर इत्यादींबाबत वास्तू विशारदांना सुचना देणे. अभिहस्तांतरण व विकासक आणि मुं.म.प्र.वि.प्राधिकरण यांच्यातील संमतीपत्राची नोंदणी. 
  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील संबंधीत इतर विभागांबरोबर पत्र व्यवहार. 
  • झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या जागांना भेट देणे. 
  • आवश्यक असेल तेव्हा कोर्टात उपस्थित राहणे व ॲफिडेव्हीट करणे. 
  • माहितीच्या अधिकाराखाली आलेल्या अर्जांना उत्तर पाठविणे. 
  • एस. आर. योजनांचा विकास डीसीपीआर - २०३४ च्या नियमन क्रमांक ३३(१०) नुसार केला जातो. 

  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात झोपडपट्टी पुनर्वसन कक्षाची स्थापना होण्यापूर्वी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमधून प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुमारे ३१,९०० सदनिका बांधल्या होत्या. 

  • २००३ मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात एसआरए सेलची स्थापना झाल्यापासून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या (पीएपी) पुनर्वसनासाठी एकूण २२२ पुनर्वसन इमारती बांधल्या आहेत ज्यामध्ये एकूण ३४,९६६ सदनिका आहेत. 

  • झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मंजूर केलेल्या एकूण १८ पुनर्वसन इमारतीत प्रकल्पग्रस्त व्यक्तींसाठी एकूण ५,८४६ सदनिकाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. 

  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाउंड येथे ४१० बेडच्या रुग्णालय इमारतीचे बांधकाम पूर्ण केले असून बृहन्मुंबई महानगरपालिकेला सदर सुविधा इमारत सुपूर्द करण्यात आले आहे. 

  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मंजूर केलेल्या शाळा, पोलिस स्टेशन, प्रसूतिगृह, रुग्णालय इत्यादी सुविधा इमारतीचे बांधकाम पूर्ण करून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे सुपूर्द केल्या आहेत.