inner-banner

नगररचना विभाग

Pradeep-M-Yadav

श्री. प्रदीप एम.यादव
प्रमुख
नगररचना विभाग

एकात्मिक शहरी नियोजनामध्ये नगर रचना या महत्वाच्या घटकाचा सहभाग वाढविण्याकरिता व नगर रचनेचे महत्व लक्षात घेऊन प्राधिकरणाद्वारे दिनांक 28 मे, 2021 व दिनांक 10 मार्च 2021 रोजीच्या कार्यालयीन आदेशान्वये नगर रचना हा स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला आहे.

नगर रचना विभागाकडे सध्या खालील प्रमाणे कामे सुरु आहेत :-

  1. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक - मुख्य लँड कॉरिडॉर ( Main Land Corridor)
  2. वांद्रे आर्ट डिस्ट्रिक्ट - कलानगर (निविदा प्रक्रिया) वगळून कामकाज.
  3. मिठी नदीच्या पात्राचे शुशोभीकरण व विकासाबाबतचे कामकाज.
  4. पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग व बीकेसी सायकल ट्रॅक बाबतचे कामकाज.
  5. बांद्रा कुर्ला संकुल नूतनीकरण

Urban DEV org chart

1.मुंबई पारबंदर जोड रस्ता (एमटीएचएल) - मुख्य लँड कॉरिडॉर :

प्राधिकरणाद्वारे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा प्रकल्प (एकूण लांबी 21.80 कि.मी.) 3 सिव्हिल पॅकेजेस व पॅकेज 4 इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम (आयटीएस) च्या अंतर्गत राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पाचे नवी मुंबई कडील राईट ऑफ वे (ROW) गव्हाण, जासई आणि चीर्ले या गावातील काही भागांनी बाधित होत आहे. MTHL- Main Land Corridor मधील क्षेत्र 108.43 हेक्टर असून MTHL पुलाची लांबी 120 मीटर व रुंदी 30.00 मीटर आहे. सदर ROW च्या क्षेत्रामध्ये MTHL- Main Land Corridor या प्रकल्पाकरिता संकल्पनात्मक Master Plan तयार करण्याचे कार्य सुरु आहे. सदर प्रकल्प हा दोन विकासाच्या घटकांमार्फत विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. हिरवळ असलेले घटक व विकास करता येणारे घटक ज्या मध्ये हिरवळ घटकाचे प्राबल्य मुख्य असणार आहे.

Visionary Plan for MTHL-Main Land Corridor

2.मिठी नदीच्या किनाऱ्याचे विकास :

प्राधिकरणाद्वारे मिठी नदी च्या किनाऱ्याचे विकास करण्याबाबत चे काम सुरु आहे. सदर प्रकल्प पर्यटनाच्या दृष्टीकोनातून राबविण्याचे प्रस्तावित आहे. सदर प्रकल्पामार्फत समुद्रकिनारा व मिठी नदीचा किनारा समाकलित करून मुंबई शहराकरिता शहरीपातळीवर सार्वजनिक ठिकाण तयार करण्याचे प्रस्तावित आहे. सीएसटी पूल ते माहीम कॉजवे, सुमारे 6 किमी लांबीच्या मार्गाचा संकलनात्मक मास्टर प्लान तयार करण्याचे कार्य सुरु आहे. मिठी नदीच्या काठावर हा प्रकल्प एक महत्वपूर्ण सार्वजनिक ठिकाण असेल सदर नदीच्या किनाऱ्याचे विकास करतांना शहराच्या सर्व भागातील लोक आकर्षित होतील असा या प्रकल्पाचा हेतू आहे. नदी व समुद्रकिनाऱ्याचे मनोरंजन करिता वापर व नदी किनाऱ्याला पुनरुज्जीवित करणे, करमणुकीच्या दृष्टीकोनातून वापर होणे तसेच, बीकेसी व्यावसायिक केंद्राला व शहराच्या इतर रस्त्यांना नदीच्या किनाऱ्यापर्यंत पादचारी वाट/ रस्ते व सायकलिंग करिता प्रयोजन करणे आणि सध्या जागेवर असलेल्या कांदळवनांचे संरक्षण करणे इत्यादी धोरणे या प्रकल्पामध्ये योजिली आहेत.

Visionary Plan for the Mithi Riverfront Development

3.वांद्रे आर्ट डिस्ट्रिक्ट - कलानगर प्रस्ताव :

कलानगर जंक्शन हा शहराचा एक महत्त्वाचा नोड आहे, कारण तेथे विद्यमान आणि प्रस्तावित उड्डाणपूले , प्रस्तावित एलिव्हेटेड मेट्रो मार्ग, सायन धारावी पूल आणि या जंक्शनमधून जाणारे इतर विविध प्रमुख ट्रन्झिट कॉरिडॉर आहेत. कलानगर नोडच्या भोवती हे उड्डाणपूल आयकॉनिक स्ट्रक्चर्स म्हणून बांधले जाणार आहेत व अश्या नगर रचना हस्तक्षेपामुळे मुंबई शहराची नवीन ओळख निर्माण होईल. कलानगर नोड सुधारणा प्रकल्पाचा हेतू हा रेखीय सार्वजनिक उद्याने, उड्डाणपुलांच्या खाली सार्वजनिक प्लाझा आणि रहदारी बेटांवरील आयलँड प्लाझा व आयकॉनिक पूल बांधण्याचा आहे. या सर्व प्रकल्पाने कलानगर जंक्शनची प्रतिमा उंच होण्यास मदत होईल.

Kalanagar Proposals

4.पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग नूतनीकरण :

दशकभरापासून आणि सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीच्या आजारामुळे, मुंबई शहरात खासगी वाहनांच्या मालकीहक्काची संख्या वाढत असून, त्यामुळे वाहतूक आणि प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत आहे. मुंबईत सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांमध्ये सायकलिंगच्या पायाभूत सुविधांचा अभाव आहे. अशा प्रकारे, मुंबई अंतर्गत सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सायकलिंग अधिक सुरक्षित आणि अधिक आकर्षक बनविण्यासाठी, सर्वसमावेशक नियोजन आणि डिझाइन तयार करणे आवश्यक आहे. युरोपातील अनेक शहरांमध्ये पूर्ण झालेल्या सायकलिंगचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य साध्य केलेले दिसून येते त्यानुसारच मुंबईसाठी सायकलिंग-समावेशक प्लॅनिंग आणि रचना करणे आवश्यक आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग हे मुंबईचे मुख्य रस्ते आहेत व लाखो लोक त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी वापरतात. या महामार्गाच्या कडेला सायकल ट्रॅक विकसित करण्याचे प्राधिकरणाचे उद्दीष्ट आहे. बहुउपयोगी जागा, ग्रीन बफर एरिया आणि सायकल स्टँडसह महामार्गाच्या दोन्ही बाजूस चांगल्या प्रकारे डिझाइन केलेले वेगळे दोन मार्ग सायकल ट्रॅक प्रधीकार्नामार्फत विकसित केले जाणार आहेत.

Cycle Track_1
Cycle Track_2

5.वांद्रे कुर्ला संकुलाचे नूतनीकरण :

वांद्रे कुर्ला संकुलात सार्वजनिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्राधिकरणाने सदर संकुलात नगर रचना अनुषंगाने नवीन नूतनीकरण प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. या प्रकल्पात संकुलामधील वाहतूक बेटे, विभाजक (मिडियन्स), जंक्शन, सार्वजनिक मोकळ्या जागा, सॉफ्ट वर्ज इत्यादी सुधारणांचा समावेश असेल, ज्यामुळे संपूर्ण संकुलाची प्रतिमा उंचावण्यास मदत होईल.