अभियांत्रिकी विभाग

श्री. धनंजय मधुकर चामलवार
प्रमुख अभियांत्रिकी,
अभियांत्रिकी विभाग
वाहतुकीची कोंडी, वाहतुकीचे सुरळीत नियोजन, उत्तम पायाभूत सुविधा तसेच मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुक तसेच दळणवळण सुधारणेच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलेले आहेत. अभियांत्रिकी विभागामार्फत मुंबई महानगर प्रदेशामध्ये अनेक नागरी पायाभुत सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने खालील प्रकल्प राबविण्यात येत आहेत :
- विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील पायाभूत सुविधा विकसीत करण्यासाठी एम.यु.आय.पी. प्रकल्प राबविला आहे. मुंबई महानगरात मुंबई प्राधिकरण क्षेत्रातून रोज लाखो नागरीक कामा निमित्त येत असतात. त्यांना मुंबईतील नागरी सुविधांचा लाभ घेता यावा या दृष्टिने मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाचा विस्तार मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेरील प्राधिकरण क्षेत्रात करणे गरजेचे आहे, ज्यायोगे भविष्यात वाहतूकीची कोंडी दुर होण्यास मदत होणार आहे. तसेच उपनगरीय परिक्षेत्राचा विकास होण्या व औद्योगिक भरभराटी होऊन रोजगारांच्या नवनवीन संधी उपनगरीय परिक्षेत्रात उपलब्ध होऊन बृहन्मुंबईच्या पायाभूत सुविधांवर पडणारा अतिरिक्त भार कमी करण्यास्तव मदत होणार आहे. मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाचा या प्रदेशांमध्ये ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, कर्जत, खालापूर, पनवेल, वसई-विरार आणि मिरा-भाईंदर रस्ते, उड्डाणपूल करीता सुमारे रु. 1493.26 कोटी इतक्या अंदाजित खर्चाच्या कामांस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत दिनांक 24 डिसेंबर, 2007 रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. विस्तारीत एम.यु.आय.पी. प्रकल्पात 3 खाडी पुल बांधणे, 2 रेल्वे उड्डाणपूल बांधणे, 9 उड्डाणपूल बांधणे व 131.50 कि.मी. रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करणे अशा कामांचा समावेश आहे. त्यापैकी 61.00 कि.मी. रस्त्याचे काम व पनवेल, वाघबिळ, मानपाडा व पातलीपाडा येथील उड्डाणपूलांची कामे पुर्ण झाली आहेत. वसई रेल्वे उड्डाणपूल, शिळ महापे, कापुरबावडी व नायगांव - जुचंद्र रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल ही कामे प्रगतीत आहेत. यातील काही कामे ठाणे महानगरपालिका व म.रा.र.वि. महामंडळाकडे प्राधिकरणाकडून निधी उपलब्ध करुन देऊन त्यांच्यामार्फत कार्यन्वित करण्यात येत आहेत. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर प्रदेशातील धार्मिक स्थळे / पर्यटन स्थळे / औद्योगिक क्षेत्र / शैक्षणिक क्षेत्रास जोडणा-या, अंदाजित किंमत रु. 1113.35 कोटी किंमतीच्या महत्वाच्या अतिरिक्त कामांस, विस्तारीत एम.यु.आय.पी. अंतर्गत दि. 8 सप्टेंबर, 2011 रोजी मान्यता प्रदान केली आहे. त्यामध्ये 05 उड्डाणपूल बांधणे व 145.12 कि.मी. रस्त्यांचे रुंदीकरण व सुधारणा करण्याचा समावेश आहे. रस्त्यांच्या सुधारणांपैकी 50 कि.मी. रस्त्यांचे काम पुर्ण झाले असून वंजारपट्टी येथील उड्डाणपूल व रस्त्यांची उर्वरीत कामे मार्च, 2014 तर माणकोली व राजणोली या उड्डाणपूलांची कामे डिसेंबर, 2015 पर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन आहे. शिळफाटा - कल्याण फाटा व मुंब्रा बायपास जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या कामांचे सविस्तर अंदाजपत्रके तयार करणेचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई महानगर पद्रेश विकास प्राधिकरणाच्या दि. 27/06/2014 रोजी झालेल्या 134 व्या बैठकीमध्ये रु. 3628.51 कोटी रकमेची एकुण 17 कामे मंजुर झाले असून त्यामध्ये 132.99 कि.मी. रस्त्यांची कामे, 32 पुलांचे कामे व 3 बोगदे या कामांचा समावेश आहे. सदर कामापैकी 8 कामांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. उर्वरीत कामे भूसंपादन व पर्यावरणाबाबतची प्रक्रिया पुर्ण करुन हाती घेण्यात येतील..
- विरार ते अलिबाग – बहुउद्देशिय वाहतूक मार्गिका (Multi Modal Corridor) – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने विरार ते अलिबाग या 140 कि.मी. लांबीच्या बहुउद्देशिय वाहतूक मार्गिकेचे नियोजन केले आहे.
- मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प - मुंबईची वाढती लोकसख्या तसेच त्यात भविष्यात होणारी वाढ लक्षात घेता बृहन्मुंबईतील रस्त्यांचे सुधारीकरण तसेच वाहतुकीचे नियमन सुरळीतपणे होण्याच्या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने पावले उचलण्याच्या दृष्टीने मुंबई नागरी पायाभुत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
- मुंबई पारबंदर प्रकल्प – प्रस्तावित मुंबई पारबंदर प्रकल्पामुळे मुंबई बेटावरील वाहतूक कोंडी कमी होऊन मुंबई बेट ते मुख्य् भूमी (नवी मुंबई) दरम्यान वेगवान वाहतुक शक्य् होईल व त्यामुळे मुख्य् भूमीवरील नवी मुंबई व आसपासच्या प्रदेशाचा विकास होईल.
- पूर्व मुक्त मार्ग – "पूर्व मुक्त मार्ग" हा 16.6 कि.मी. लांबीचा शहराच्या पूर्वेकडील भागाला जोडणारा एक जलद मार्ग असून त्याद्वारे पूर्व उपनगरे व दक्षिण मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. यामध्ये 9.29 कि.मी. लांबीच्या उन्न्त मार्गाची बांधकाम (देशातील सर्वात जास्त् लांबीचा दुसऱ्या क्रमांकाचा उन्न्त मार्ग), अनेक उड्डाण पूल, रेल्वे ओलांडणी पूल आणि 500 मी. लांबीचे दोन बोगदे समाविष्ट् आहेत.
Loading content ...
Loading content ...
Loading content ...
Loading content ...