inner-banner

ठाणे आणि बोरीवली दरम्यान ट्विन ट्युब रोड बोगदा

कामाचे नाव :- महाराष्ट्र राज्यातील ठाणे आणि बोरीवली दरम्यान ट्विन ट्युब रोड बोगदा, अप्रोच रोड आणि इतर नागरी कामांची रचना आणि बांधकाम.

पार्श्वभुमी:

 • ठाणे ते पश्चिम उपनगर मुंबई दरम्यानचा प्रवास आणि पूर्वेकडील प्रवेश कमी करण्याच्या दृष्टिने, ठाणे शहरातील टिकुजीनी वाडी ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली अशा सहापदरी (3+3 मार्गिकेचे 2 बोगदे) भुयारी मार्गाचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्याच्या प्रस्तावास दिनांक 23 सप्टेंबर 2015 रोजी झालेल्या महामंडळाच्या संचालक मंडळाच्या 150 व्या बैठकीत मान्यता दिली होती.
 • दि. 30.11.2015 रोजी झालेल्या पायाभूत सुविधांबाबतच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला या प्रकल्पासाठी अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून घोषित केले आणि निर्देश दिले.
 • सदर प्रकल्पाचा सविस्तर सुसाध्यता अहवाल व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणेसाठी महामंडळामार्फत तज्ञ सल्लागार म्हणून मे. ऐइकॉम ऐशिया कंपनी लिमिटेड यांची दिनांक 11.04.2016 रोजी नेमणूक करण्यात आली आहे.
 • शासनाने दिनांक 07 जुलै, 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये या प्रकल्पाची मालकी व अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे असेल असे आदेशित केले . म.रा.र.वि. महामंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार सदर प्रकल्पाची सद्य:स्थिती दर्शक टिप्पणी, सल्लागार नेमणुक व सल्लागाराच्या कामाचा वाव, सल्लागाराच्या देयकबाबतीची माहिती, निविदा इत्यादी बाबींच्या पुढील कार्यवाहीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे दिनांक 21 ऑगस्ट, 2020 पासून सदर प्रकल्प हस्तांतरीत करण्यात आला आहे.

प्रकल्पाचा वाव:

 • ठाणे घोडबंदर रोड (एसएच-42) हा मुख्य दुवा रस्ता आहे, जो एक पूर्व पश्चिम लिंक आहे . व एनएच -3 आणि एनएच -8 दरम्यान मोठया प्रमाणात व्यावसायिक रहदारी आणते. ठाणे ते बोरीवली या लांबीतील अंतर घोडबंदर मार्गे 23 कि.मी आहे. ठाणे ते बोरीवली लांबीतील अंतर पार करण्यासाठी सद्य:स्थितीत सकाळी व संध्याकाळी वर्दळीच्या वेळी (peak hours) अंदाजे 1 ते दीड तास वेळ लागतो, इतर वेळी किमान 1 तास वेळ लागतो.
 • ठाणे ते बोरिवली दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अंतर्गत जुळ्या ट्यूब tube लेन बोगद्याचे बांधकाम प्रस्तावित आहे. जेणेकरुन ठाणे ते बोरीवली हा प्रवास 12 किमी. ने कमी होईल.
 • बोगद्याचा भाग हा संरक्षित वन क्षेत्रातून जात असल्याने बोगद्याच्या खोदकामासाठी कोणते तंत्रज्ञान वापरणे योग्य होईल याकरीता National Institute of Rock Mechanics यांच्या मार्फत अभिप्राय मागविला असता त्यांनी संरक्षित वनक्षेत्र असल्यामुळे Tunnel Boring Machine च्या सहाय्याने बोगद्याचे खोदकाम करण्याचे सुचविले आहे.
 • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) सादर केलेल्या आराखडा मसुद्याच्या तपशीलवार प्रकल्प अहवालाची छाननी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे केली असुन मा.महानगर आयुक्तांच्या निर्देशानुसार प्रकल्पासाठी पर्यावरणीय प्रभाव समस्या (Environmental Impact Study) आणि वाहतूक अभ्यास करण्याची शिफारस प्राधिकरणाने सल्लागाराला करण्यात केली आहे. त्यामुळे प्राधिकरणाने पुन्हा नव्याने या मार्गाचा बृहत आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतलेला नसुन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) प्राधिकरणास सादर केलेल्या आराखड्याची छाननी करुन त्यानुसार प्राधिकरणामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.
 • दरम्यानच्या काळात मुंबई महानगर महापालिकेने गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या डिझाइन आणि उभारणीकरीता कंत्राटदार नेमणुकीसाठी ई-निविदा काढण्यात आली आहे. प्रस्तावित गोरेगाव- मुलुंड लिंक रोड (GMLR) आणि ठाणे ते बोरिवली प्रस्तावित ट्विन ट्यूब, 3+3 लेन हायवे बोगदा एकमेकांशी स्पर्धा करत असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) सल्लागाराला प्रस्तावित ट्विन ट्यूब, 3+3 लेन हायवे बोगदा (3 + 3 ट्विन ट्यूब बोगदा) आणि वाहतूक विश्लेषणाची व्यवहार्यता (Feasibility) तपासण्याचे निर्देश दिले आहेत.
 • तद्नंतर, नंतर प्राधिकरणाने केलेल्या अभ्यासाप्रमाणे ठाणे बोरिवली 2+2 लेन कॅरेजवेसह बोगद्याचा V/C (Volume / Capacity) गुणोत्तर 0.63 आहे आणि LOS (Level of Service) C आहे. ट्विन ट्यूबचे बांधकाम, ठाणे शहरातील टिकुजिनीवाडी ते मुंबईतील बोरिवली दरम्यान 2+2 लेन कॅरेजवेसह सन 2027 ते 2031 पर्यंत प्रथम दर्शनी सुयेाग्य होत असल्याचे अभ्यासातून दिसून येत आहे. याबाबत सल्लागार अभ्यास करीत आहे.
 • प्रस्तावित 2 +2 मर्गिका बोगद्याची ठळक माहिती खालीलप्रमाणे :
  • एकूण लांबी - 11.80 कि.मी. (बोगद्याची एकूण लांबी 10.25 कि.मी. व जोडरस्तयाची लांबी 1.55 कि.मी. आहे.)
  • बोगद्याचा व्यास : 12.2 मी (2 मार्गिकेचा असे 2 बोगदे.)
  • प्रत्येक 300 मी. येथे आंतरजोड मार्गिका ( cross connection ) असते.
  •  अग्निशमन यंत्र, पाण्याची नाळी, धुरांचे डिटेक्टर, प्रकाशित प्रतिबिंब (LED Light sign boards) योग्य ठिकाणी स्थापित केले जातील.
 • या प्रस्तावित नवीन कनेक्टिव्हिटीमधील वाहतुकीचे अंदाजे प्रमाण 50,000 पी.सी.यू आहे.
 • या प्रमाणे भूसंपादन करीता क्षेत्र हे एकूण 49.48 हेक्टर इतके आहे. यापैकी अंदाजे 37.63 हेक्टर शासकीय वन क्षेत्र व 11.91 हेक्टर खाजगी जमीन इतके आहे.
 • या मार्गीकेच्या 11.8 कि.मी. लांबीपैकी 4.43 कि.मी. लांबी ही ठाणे जिल्ह्यातुन व 7.4 कि.मी लांबी ही बोरीवली जिल्ह्यातून प्रस्तावित आहे. एकूण 6 गावांपैकी 3 (चितळसर मानपाडा-ठाणे, माजिवाडा- ठाणे व मागाठाणे- बोरीवली) गावांमध्ये संयुक्त मोजणी ही थेट खरेदी पध्दतीने करण्याचे प्रस्तावित आहे. उर्वरित 03 गावे म्हणजेच (बोरीवाडे, चेणे आणि येउर-ठाणे) शासकीय वनक्षेत्रातून जात आहेत.

प्रकल्पाची सद्य:स्थिती :

 • केंद्रीय पर्यावरण व वन विभागाच्या दि. 01 डिसेंबर, 2009 च्या सुधारित अधिसुचनेनुसार पर्यावरण ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी प्रस्ताव पर्यावरण व वनविभागाकडे सादर केला होता. दिनांक 15.04.2019 च्या पत्रान्वये प्रधान सचिव पर्यावरण विभागाने सदर प्रकल्पासाठी पर्यावरण ना-हरकत दाखल्याची आवश्यकता नसल्याचे कळविले आहे.
 • वन विभाग व नॅशनल बोर्डऑफ वाईल्ड लाईफची (NBWL) परवानगी नियमावलीनुसार ना हरकत प्रमाणपत्र मिळविणेसाठी प्रस्ताव मंजुरीकरीता दिनांक 17 जुलै, 2020 रेाजी सादर करण्यात आला आहे. 60.०359 हेक्टर क्षेत्रफळाच्या प्रकल्पातील नुकसान भरपाई वनीकरण (CA) जमीन (गट नं. 495)) ही उमरावती, हुलांब्री, औरंगाबाद येथील जमिन दिनांक ऑक्टोबर 2020 रोजी औरंगाबादच्या डी.एफ.ओ.कडे हस्तांतरीत करण्यात आली आहे.
 • सदर प्रकल्पासाठी खाजगी जागेचा भुसंपादनाचा प्रस्ताव प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आला असुन, भुसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे. गाव – चितळसर - मानपाडा, व माजिवडे जि. ठाणे याची संयुक्त मोजणी पूर्ण करण्यात आली असुन पुढील कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
 • प्रकल्पाचा अंदाजित बांधकाम खर्च रॉयल्टी वगळुन एकूण ₹. 16600.40 कोटी (भुसंपादनासह) असून सदर अंदाजित किंमतीस प्राधिकरणाने दिनांक 10 मार्च, 2023 रोजी झालेल्या प्राधिकरणाच्या 154 व्या बैठकीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. सल्लागाराने सादर केलेल्या प्राथमिक सुसाध्यता अहवालानुसार सदर प्रकल्पाची अंमलबजावणी ईपीसी (EPC) या तत्त्वावर करण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली असुन प्रकल्पाचे बांधकाम एकूण 3 पॅकेजमध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 2 स्थापत्य कामाची पॅकेज (CIVIL WORKS)असून 1 पॅकेज सुनियोजित वाहतुक प्रणाली, वायुविजन इ. (INTELLIGENT TRANSPORT SYSTEM, VENTILATION ETC.) या कामाचे पॅकेज आहे.
 • दिनांक 04 मे, 2023 रोजी झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या 275व्या बैठकीत पॅकेज-1: साखळी क्र. 0+00 ते साखळी क्र.5+750 बोरीवली - (लघुत्तम देकार -₹7178 कोटी) पॅकेज-2: साखळी क्र.5+750 ते साखळी क्र.11 + 84 ठाणे (लघुत्तम देकार ₹5879 कोटी) याकरीता M/S MEGHA ENGINEERING & INFRASTRUCTURES LTD (MEIL) यांचा लघुत्तम देकार (INCLUDING PROVISIONAL SUM BUT EXCLUDING GST) स्विकारण्यास कार्यकारी समितीने मान्यता दिली आहे.
 • प्रकल्पाचे बांधकाम पुढील पाच वर्षात पुर्ण करण्याचे नियोजन आहे.

प्रकल्पातील अडचणी –

 • वन्यजीव (WILDLIFE) व वन (FOREST) विभागाकडून मंजूरी तसेच भुसंपादन