वाढ केंद्र
-
नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 25 सप्टेंबर, 2025 रोजीच्या अधिसूचना क्र.टिपीबी-4321/प्र.क्र.130/2021/नवि-11 अन्वये मुंबई महानगर प्रदेशाच्या अधिसूचित क्षेत्रामधील तालुका भिवंडी येथील मौजे खारबांव, मालोडी, पाये, पायेगाव, खरडी, पालीवली, फिरंगपाडा, गाणे, ब्राम्हणगाव व तालुका वसई येथील मौजे नागले अशा एकूण 10 गावांच्या (सुमारे 58.52 चौ.कि.मी.) क्षेत्रामध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी खारबांव इन्टीग्रेटेड बिझनेस पार्क विकसीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
सदर अधिसूचनेअन्वये उक्त क्षेत्रास म.प्रा. व न.र. अधिनियम, 1966 च्या कलम 40(1) ‘Kharbav Integrated Business Park Notified Area’ असे घोषित करण्यात आले आहे व कलम 40(1)(क) अन्वये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ (Special Planning Authority - SPA) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.



