आयकॉनिक वरळी
सुमारे 6.40 हेक्टर क्षेत्रफळाच्या वरळी डेअरीच्या जमिनी, ज्यांचे मालकी हक्क दुग्धविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे आहेत.
वरळी डेअरीच्या जमिनीवर आयकॉनिक (Iconic) प्रकल्प राबवून महसूल उत्पन्न करणे, ज्यामुळे मुंबई शहरात रोजगार निर्मिती होईल व आर्थिक विकासाला चालना मिळेल. मुं.म.वि.प्राधिकरणातर्फे या महसुलाचा वापर महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येईल.
ठळक वैशिष्ट्ये
- क्षेत्रफळ – 6.40 हेक्टर
- मंजूर जमीन वापर – काही भाग डेअरी, काही भाग शासकीय कर्मचारी निवास, काही भाग पुनर्वसन व पुनप्रस्थापना.
- मालकी – मदर डेअरी; सध्या रिक्त व अनुपयोगी.
- प्रस्तावित जमीन वापर – मिश्र जमीन वापर.
- मुंबई कोस्टल रोड प्रकल्प, वरळी -वांद्रे सागर सेतू व इतर महत्त्वाच्या प्रकल्पांना संलग्न.
मुं.म.वि.प्राधिकरणाच्या 155 व्या प्राधिकरण बैठकीत दिनांक 12/12/2023 रोजी वरील प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.
दिनांक 30/01/2024 व 02/01/2024 रोजी मुं.म.वि. प्राधिकरणातर्फे राज्य शासनास विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक करणे व वरळी डेअरीची जमीन हस्तांतरित करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.
मुं.म.वि. प्राधिकरणातर्फे वरळी डेअरीची जमीन आयकॉनिक प्रकल्प म्हणून विकसित करणे व चालू प्रकल्पांसाठी संसाधन संकलन करणे याबाबतचा मानस आहे.