inner-banner

रायगड पेण ग्रोथ सेंटर प्रकल्प

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) तर्फे प्रादेशिक संतुलित विकास, आर्थिक वृद्धी व जागतिक दर्जाचे शहरी पायाभूत सुविधा उभारणीच्या उद्देशाने ग्रोथ सेंटर उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या दृष्टीकोनातून MMRDA आणि  मे. Orange Smart City Infrastructure Pvt. Ltd. (OSCIPL) यांच्यामध्ये मार्च 2023 मध्ये संयुक्त उद्यम करार (Joint Venture Agreement - JVA) करण्यात आला असून त्याअंतर्गत विशेष उद्देश वाहन (SPV) म्हणून रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड (RPGCL) स्थापन करण्यात आले आहे. सदर प्रकल्पाद्वारे शाश्वत, स्वयंपूर्ण आणि संतुलित शहरी केंद्र विकसित करून प्रादेशिक विकासास चालना देणे, आर्थिक वृद्धी साध्य करणे व जागतिक दर्जाचे पायाभूत सुविधा निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे. 

 

ठळक वैशिष्ट्ये 

स्थान: पेण तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र 

प्रकल्प क्षेत्रफळ: 1217.71 एकर 

कनेक्टिव्हिटी: मुंबई–अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे मार्ग तसेच विरार–अलिबाग बहुविध मार्गिका (Multi-Modal Corridor).  

जवळील रेल्वे स्थानके: हमरापूर व पेण. 

जवळील ठिकाणे: पनवेलपासून 25 कि.मी., नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 30 कि.मी., पेणपासून  5 कि.मी., तसेच जवळच जेएनपीटी, करंजा व JSW धरमतर बंदरे आहेत. 

रायगड पेण ग्रोथ सेंटर हे भारतातील पहिले ग्रीनफिल्ड शाश्वत ग्रोथ सेंटर म्हणून विकसित होत असून, विकासाचे प्रमुख घटक पुढीलप्रमाणे आहेत : 

आरोग्य व कल्याण: अत्याधुनिक रुग्णालये व आरोग्य सुविधा. 

ज्ञान व शिक्षण: विद्यापीठे, शाळा व संशोधन केंद्रे. 

निवास व व्यावसायिक केंद्रे: निवासी वसाहती, कार्यालयीन संकुले, मॉल्स व किरकोळ बाजारपेठा. 

संस्कृती व मनोरंजन: नाट्यगृहे, सांस्कृतिक केंद्रे व मनोरंजन सुविधा. 

लॉजिस्टिक्स व गोदाम व्यवस्था: एकात्मिक लॉजिस्टिक व पुरवठा साखळी केंद्रे. 

तंत्रज्ञान व वित्तीय सेवा: आयटी पार्क्स, फिनटेक हब्स व मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर. 

 

  • विशेष उद्देश वाहन (SPV) – रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड (RPGCL) मार्च 2023 मध्ये स्थापन करण्यात आले आहे. 
  • संचालक मंडळाच्या बैठकींद्वारे जमिनीचे हस्तांतरण, नियमपालन, शासनमान्यता व प्रकल्प व्यवस्थापन यासंदर्भातील निर्णय नियमित घेतले जात आहेत. 
  • जमिनींचे हस्तांतरण रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड (RPGCL) च्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.