सूचना
हन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विशेष नियोजन क्षेत्रात (वांद्रे-कुर्ला संकुल, ओशिवरा जिल्हा केंद्र, वडाळा अधिसूचित क्षेत्र, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदूमिल येथील भव्य स्मारक आणि मेट्रो विशेष नियोजन क्षेत्र) बांधकाम प्रस्ताव सादर करण्यासाठी आणि त्यांच्या मंजुरीसाठी दिनांक १ फेब्रुवारी २०२५ पासून ऑनलाईन प्रणाली लागू करण्यात येत आहे. हीच सुविधा प्राधिकरणाच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागात प्राप्त झालेल्या प्रस्तावांसाठी देखील लागू करण्यात येत आहे. ऑनलाईन विकास प्रस्ताव सादर करण्याची लिंक खालीलप्रमाणे आहे.