प्रस्तावना
अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर आणि परिसर अधिसूचित क्षेत्रासाठी विकास योजना :
अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर आणि परिसर अधिसूचित क्षेत्रामध्ये अंबरनाथ नगर परिषद, कुळगांव-बदलापूर नगर परिषद आणि ठाणे व रायगड जिल्हयातील 56 गावांचा समावेश आहे. या अधिसूचित क्षेत्रासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण "विशेष नियोजन प्राधिकरण" आहे. सदर अधिसूचित क्षेत्रासाठी प्रारुप विकास योजना तयार करुन महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 च्या तरतूदीनुसार कार्यवाही करुन शासनास एप्रिल, 2004 मध्ये मंजूरीसाठी सादर केली. शासनाने दिनांक 25 जुलै, 2005 च्या अधिसूचनेनुसार सदर विकास योजनेस अधिनियमातील कलम 31 अन्वये मंजूरी प्रदान केली व काही भाग इ. पी. च्या स्वरुपात पुन्हा प्रसिध्द केला. शासनाने दि. 11 ऑगस्ट्, 2008 च्या अधिसूचनेनुसार सदर इ.पी. ला अधिनियमातील कलम 31 अन्वये मंजूरी दिली आहे. तथापि, सदर इ.पी. नकाशाची प्रमाणित प्रत शासनाकडून अद्याप प्राधिकरणास प्राप्त् व्हावयाची आहे. शासनाकडून तसेच इतर कार्यालयांकडून प्राप्त् होणाऱ्या प्रकरणांवर संबंधितांस अहवाल पाठविण्याची कार्यवाही चालू आहे.
अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर आणि परिसर अधिसूचित क्षेत्र हे मंजूर विकास योजनेच्या अहवालामधील प्रकरण 20 मधील शासनमान्य् प्रस्तावानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रामधून वगळणेबाबत प्राधिकरणाने दिनांक 27 जानेवारी, 2009 च्या पत्रान्वये शासनास विनंती केली आहे. त्यावर शासनाचे आदेश प्राप्त् व्हावयाचे आहेत.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 37(1) नुसार या अधिसूचित क्षेत्रासाठीच्या मंजूर विकास योजनेमध्ये शासनाच्या निर्देशानुसार करावयाच्या फेरबदलाबाबत पुढील एका प्रकरणी शासनास फेरबदल प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी सादर करण्यात आला आहे.
अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर आणि परिसर अधिसूचित क्षेत्राच्या मंजूर विकास योजनेमधील मौ.कोहोज-खुंटवली, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील "हाल्याचा पाडा" यामधील सि.स.नं.4965 ते 4968, 7014 ते 7045 या जमिनी "गावठाण" क्षेत्रामध्ये समाविष्ट् करणेबाबतचा महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 37(1) अन्वये शासनाच्या निर्देशानुसार करावयाचा नियोजित फेरबदल प्रस्ताव दिनांक 20 नोव्हेंबर, 2012 च्या पत्रान्वये शासनास अंतिम मंजूरीसाठी सादर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 37(1) नुसार पुढील 03 प्रकरणांमध्ये मंजूर विकास योजनेमध्ये करावयाच्या फेरबदल प्रस्तावांवरील कार्यवाहीचा अहवाल पुढीलप्रमाणे आहे.
या अधिसूचित क्षेत्रामध्ये एप्रिल, 2012 ते मार्च, 2013 अखेर रु. 0.05 कोटी इतका विकास आकार जमा झालेला आहे.
- अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर आणि परिसर अधिसूचित क्षेत्राच्या मंजूर विकास योजनेमधील मौ.बेलवली, ता. अंबरनाथ येथील स.नं. 69, हि.नं. 2/2 ही जमीन आरक्षण क्र. 5 (पब्लिक ऑफिस व स्टाफ क्वार्टर्स) व 6 (ट्रक टर्मिनस) मधून वगळणेबाबत शासनाने आदेश क्र. मुमंस/टीपीएस-1206/2097/प्र.क्र.564/08/नवि-12, दिनांक 13 मे, 2009 व त्यावरील दिनांक 28 ऑक्टोबर, 2009 च्या शुध्दीपत्रकान्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 37(1) नुसार फेरबदलाच्या कार्यवाहीबाबत निर्देश दिलेले होते. त्यानुसार मंजूर विकास योजनेतील सदर फेरबदलाच्या प्रस्तावाची बाब टिप्पणी प्राधिकरणाच्या 126 व्या बैठकीमध्ये सादर केली होती. प्राधिकरणाच्या सदर बैठकीमध्ये या विषयावर विचारविमर्श करण्याचे लांबणीवर टाकण्यात आले. प्राधिकरणाच्या दिनांक 26 ऑगस्ट्, 2010 रोजी झालेल्या 127 व्या बैठकीमध्ये सदर बाब टिप्पणीचा समावेश करण्यात आला नाही. त्यानंतर दिनांक 18 जानेवारी, 2011 रोजी झालेल्या प्राधिकरणाच्या 128 व्या बैठकीत सदर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. प्राधिकरणाच्या सदर बैठकीमध्ये हा विषय विचारार्थ घेण्यात आला नाही. सदर फेरबदल प्रस्ताव प्राधिकरणाच्या 129 व्या बैठकीमध्ये पुन्हा सादर केला होता. प्राधिकरणाच्या सदर बैठकीमध्ये या विषयावर विचारविमर्श करण्याचे लांबणीवर टाकण्यात आले. शासनाच्या दि. 14 ऑक्टोबर, 2011 च्या पत्राच्या अनुषंगाने सदर फेरबदल प्रस्तावाबाबतचा अहवाल दि. 07 मे, 2012 च्या पत्रान्वये शासनास सादर करण्यात आला आहे. त्यावरील शासनाच्या पुढील निर्देशानुसार सदर फेरबदल प्रस्तावावर पुढील वैधानिक कार्यवाही करण्यात येईल.
- अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर आणि परिसर अधिसूचित क्षेत्राच्या मंजूर विकास योजनेमधील मौ. कात्रप येथील सं.नं. 74, 75, 81 83 (भाग) व 84(भाग) या जमिनी ना विकास परिमंडळामधून वगळून रहिवास परिमंडळात समाविष्ट् करणेबाबत शासनाने आदेश क्र. टीपीएस 1208/8/प्रं.क्र.208/09/नवि-12, दि. 4 फेब्रुवारी, 2010 अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 37(1) नुसार फेरबदलाच्या कार्यवाहीबाबत सुधारीत निर्देश दिलेले आहेत. प्राधिकरणाच्या दि. 26 ऑगस्ट्, 2010 रोजी झालेल्या 127 व्या बैठकीमध्ये सदर बाब टिप्पणीचा समावेश करण्यात आला नाही. त्यानंतर दि. 18 जानेवारी, 2011 रोजी झालेल्या प्राधिकरणाच्या 128 व्या बैठकीत सदर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. प्राधिकरणाच्या 129 व्या बैठकीत पुन्हा सादर केला होता. प्राधिकरणाच्या सदर बैठकीमध्ये या विषयावर विचारविमर्श करण्योच लांबणीवर टाकण्यात आले. शासनाच्या दि. 14 ऑक्टोबर, 2011 च्या पत्राच्या अनुषंगाने सदर फेरबदल प्रस्तावाबाबतचा अहवाल प्राधिकरणाने दिनांक 14.03.2012 व्या पत्रान्वये शासनास सादर केला आहे. त्यावरील शासनाच्या पुढील निदेशानुसार सदर फेरबदल प्रस्तावावर पुढील वैधानिक कार्यवाही करण्यात येईल.
- मौ. बेलवली येथील स.नं.8, हि.नं.1/1/3 पैकी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आरक्षणात समाविष्ट् असलेली जमीन आरक्षणातून वगळण्याबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 37 अन्वये फेरबलाची कार्यवाही करुन प्रस्ताव शासनास सादर करणेबाबत शासनाने दि. 11 ऑगस्ट्, 2008 च्या पत्रान्वये प्राधिकरणास निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार महानगर आयुक्त् यांच्या मान्यतेने सदर फेरबदलासंबंधीची नोटीस दि. 6 नोव्हेंबर, 2008 च्या शासन राजपत्रात प्रसिध्द केली. प्राप्त् सूचना / हरकतीवर दि. 6 मार्च, 2009 रोजी प्रमुख, नगर व क्षेत्र नियोजन विभाग यांचेसमोर सुनावणी झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीच्या जमिनींची तालुका निरिक्षक भूमि अभिलेख यांचे कार्यालयाकडून अधिकृत मोजणी करुन घेऊन मोजणी नकाशा प्राधिकरणास सादर करण्यात येईल असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्यांच्या दि. 13 मार्च, 2009 व दि. 23 सप्टेंबर, 2009 च्या पत्रान्वये कळविले आहे. सदर मोजणी नकाशे त्वरीत प्राधिकरणास उपलब्ध् करुन देणेबाबत प्राधिकरणाने दि. 23 डिसेंबर, 2009, दि. 27 सप्टेंबर, 2010 व दि. 29 नोव्हेंबर, 2010 च्या पत्रान्वये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास कळविले आहे. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दि. 11 जानेवारी, 2011 च्या पत्रान्वये तालुका निरिक्षक भूमी अभिलेख यांचेकडून प्राप्त् झालेला सदर जमिनींचा मोजणी नकाशा या कार्यालयास सादर केला. सदर मोजणी नकाशावरील क्षेत्रफळ व 7/12 वरील क्षेत्रफळ यांचा मेळ बसत नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मालकी असणाऱ्या सदर जमिनीचे 7/12 वरील अचूक क्षेत्रफळ दर्शविणारा मोजणी नकाशा सादर करण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दि. 13 एप्रिल, 2011 च्या पत्रान्वये कळविले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालकीची मौ. बेलवली येथील स.नं.8, हि.नं. 1/1/3 पैकी क्षेत्र 0-04-0 आर.पो.ख. 0-03-0 एकूण 0-07-0 या जमिनीवर श्री. संतोष श्रीनिवास तालपत्तूर व श्री. पद्मश्री श्रीनिवास तालपत्तूर यांचेकडून सिमेंटचे खांब उभारुन कुंपण घालण्यात येत असल्याचे उप विभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प् पथक, कुळगांव-बदलापूर यांनी दि. 04 ऑक्टोबर, 2011 च्या पत्रान्वये कळविले आहे. त्या अनुषंगाने प्राधिकरणाने दि. 13 ऑक्टोबर, 2011 च्या पत्रान्वये सदर जमिनीवरील बांधकामाबाबत कुळगांव बदलापूर नगरपरिषदेला अहवाल सादर करणेबाबत कळविले आहे. सदरचा अहवाल कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेकडून अद्याप प्राप्त् व्हावयाचा आहे. नगरपरिषदेकडून अहवाल प्राप्त् होताच सदर फेरबदलासंबंधीचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर शासनास सादर करण्याची कार्यवाही करण्यात येईल.