सद्यस्थिती
प्रादेशिक योजना 2016-36.
मुंबई महानगर प्रदेशाची तिसरी प्रादेशिक योजना 2016-36 म. प्रा. व न. र. अधिनियम, 1966 च्या कलम 16 अन्वये जनतेकडून सूचना व हरकती मागविण्याकरिता प्रसिद्ध केली. अशा सूचना / हरकती सादर करण्याची अंतिम तारीख दि. 02 एप्रिल 2016 होती.
प्राप्त सूचना व हरकती आणि नियोजन उपसमितीच्या अहवालाच्या आधारे प्राधिकरणाने म. प्रा. व न. र. अधिनियम, 1966 च्या सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून सुधारित प्रारूप प्रादेशिक योजना दि. 30 ऑक्टोबर, 2017 रोजी मुंबई महानगर नियोजन समितीकडे मान्यतेसाठी आणि पुढे शासनास मंजुरीसाठी सादर करण्याकरिता सादर केली. नियोजन समितीने त्यांस योग्य त्या बदलांसह मान्यता दिली व महाराष्ट्र शासनास मंजुरीसाठी सादर केली. शासनाने, त्यांच्या दि.07 ऑगस्ट, 2019 रोजीच्या अधिसूचनेनुसार प्रादेशिक योजना 2016-36 चा एक भाग असलेल्या माथेरान पर्यावरनदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राशी संबंधित क्षेत्रीय योजना मंजूर केली आहे.