inner-banner

प्रकल्पाची माहिती

1)कामाचे नाव:-    पुर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन, घाटकोपर (पूर्व) येथे वाहतुक सुधारणा प्रकल्प राबविणेबाबत. 

प्रस्तावना: 
सांताक्रुझ चेंबूर जोड रस्ता आणि पूर्व मुक्त मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या काही भागातून ठाण्याकडे जाणारी वाहतूक घाटकोपर येथील छेडा नगर जंक्शनवर आल्यामुळे तेथे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. सदर समस्या सोडवण्यासाठी प्राधिकरणामार्फत  छेडा नगर जंक्शनच्या सुधारणेचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे.
1.    प्रकल्पांची वैशिष्टये :
भाग (अ): अस्तित्वातील उड्डाणपुलाशेजारी सायन ते ठाणे या मार्गाच्या दिशेने उड्डाणपुल
         :  लांबी  :680  मी.   रुंदी : 12 मी. (तीन पदरी)
भाग (ब): मानखुर्द ते ठाणे दिशेकडे उड्डाणपुल
                                                 :  लांबी  :1235 मी. रुंदी : 8.5 मी. (2 पदरी) {दुसऱ्या पातळीवर} 
भाग (क) : छेडानगर ते एस.सी.एल.आर ला जोडणारा उन्नत मार्ग बांधणे.
  : लांबी  : 638 मी. रुंदी : 8.5 मी. (2 पदरी)
भाग (ड) : पूर्व द्रुतगती महामार्गावर कामराज नगर येथे भुयारी मार्ग
        :  लांबी :510 मी. रुंदी : 37.2 मी. (2+2 पदरी)
2.    प्रकल्पाची किंमत:-
     रु. 223.85 कोटी
3.    सद्यस्थिती प्रगती : काम पूर्ण झाले असून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे.

4.    स्थळ:
छेडानगर जंक्शन, घाटकोपर पूर्व 

  •     काम पूर्ण होण्याचा दिनांक :एप्रिल, 2025

प्रकल्पाचे महत्त्व:

  •     छेडा नगर जंक्शन येथे पूर्व द्रुतगती महामार्गावर सिग्नल मुक्त प्रवास.
  •     प्रवास वेळेत 25 ते 30 मिनिटे बचत
  •     या प्रकल्पामुळे इंधनाची बचत होईल.

2)  NH-4 (old) ते कटाई नाका पर्यंत उन्नत मार्गाचे बांधकाम करणे


प्रकल्पाची माहिती: 

  •     प्रकल्पाची एकूण लांबी: 6.71 किमी.
  •     रुंदी: 45 मीटर (दोन्ही बाजूंनी सेवा रस्त्यासह 3+3 लेन).
  •     व्हायाडक्टची लांबी: 6158.719  मीटर.
  •     रॅम्पची लांबी: 1579 मीटर.
  •     प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी: 48 महिने
  •     दोष दायित्व कालावधी: 24 महिने
  •     प्रकल्प खर्च: 1981.17 कोटी
  •     सुरुवातीची तारीख: 11.10.2024
  •     प्रस्तावित पूर्णत्वाची तारीख: 10.10.2028
  •     कंत्राटदार: मे. अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड
  •     प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार: मे स्मेक इंटरनॅशनल प्रा. लि., इन अससोसिएशन.मे. सुई जेनेरिस इन्फ्राटेक प्रायव्हेट लि. 

प्रकल्पाची सद्यस्थिती :

  •     जमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया चालू आहे.
  •     DGPS सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
  •     टोपोग्राफिक सर्वेक्षण चालू आहे.
  •     भू–तांत्रिक तपासणी चालू आहे.
  •     कास्टिंग यार्ड विकास चालू आहे.
  •     किनारी नियमन क्षेत्र (CRZ) मंजुरी – 23 जून 2025 रोजी परीवेष पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केला आहे, महाराष्ट्र किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण (MCZMA) समिती 07 जुलै 2025 रोजी स्थापन करण्यात आली, MCZMA दिनदर्शिका 08 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली, MCZMA समितीची बैठक 14 जुलै 2025 रोजी झाली असून प्रस्ताव केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाला दिल्ली (MoEF Delhi) पाठविण्यास सहमत झाले आहे.
  •     वन मंजुरी – प्रतिपूर्तीक वनराई (Compensatory Afforestation) जमिनीचा अर्ज मु.म.प्र.वि.प्रा. कडे 20 मे 2025 रोजी सादर केला आहे, प्राधिकरणा मार्फत 10 जुलै 2025 रोजी कलेक्टर हिंगोली यांना सुमारे 3.5 हेक्टर जमिनेचे वाटप करण्यासाठी गाव कोंधूर, तालुका काळमनुरी, जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र येथे करण्यासाठी विनंती केली आहे.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:

  •     चढणे आणि उतरणे करीता दिवा-शिल रोड, कटाई नाका जंक्शन आणि बदलापूर-कल्याण रोड येथे रॅम्प प्रस्तावित आहेत.
  •     या प्रकल्पाचा मार्ग मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे संरेखन, केंद्रीय रेल्वेचे संरेखन आणि DFCC (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर) संरेखन ओलांडतो.

3) मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक

राज्य शासनाने दिनांक 19 मार्च, 2013 रोजी इंदू मिल क्र. 6, दादर येथील अंदाजे 4.84 हेक्टर जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली. तद्नंतरच्या दिनांक 20 एप्रिल, 2013 रोजीच्या आदेशान्वये सदर भव्य स्मारकाच्या विकासासंदर्भात प्राधिकरणाने पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या विहीत केल्या.   
स्मारकासाठी बृहत आराखडा तयार करण्यासाठी जागतिक स्वारस्य अभिव्यक्ती मागवून सल्लागार मे. शशी प्रभू आणि असोसिएट्स व मे. डिझाईन असोसिएट्स आय एन सी. यांची नियुक्ती करण्यात आली. दिनांक 11 ऑक्टोबर 2015 रोजी मा. पंतप्रधान महोदयांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. 
राज्य शासनाने दिनांक 14 मार्च, 2016 रोजीच्या निर्णयान्वये स्मारकाचा आराखडा अंतिम करण्यासाठी मा. मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यांची एकसदस्यीय समिती गठीत केली. सदर समितीने स्मारकाशी संबंधित व्यक्ती व संस्थांशी बैठक घेऊन सल्लागाराकडून आराखडा तयार करून घेतला व शासनास अहवाल सादर केला. त्यानुसार शासनाने दिनांक 13 एप्रिल, 2017 रोजी प्राधिकरणास संकल्पनात्मक आराखड्यास तत्त्वत: मान्यता दिली व त्याबाबतची पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले. दिनांक 25 मार्च, 2017 रोजी इंदू मिल जागेचा ताबा प्राधिकरणाने शासनाच्या वतीने घेतला.. 
प्राधिकरणाने स्मारकासाठी ₹600 कोटी इतका अंदाजित खर्च सुरूवातीला करून नंतर राज्य शासनाकडून वर्ग करण्यासाठी मान्यता दिली. तद्नंतर दिनांक 14 एप्रिल,2017 रोजी “रचना व बांधणे” तत्वावर निविदा मागविल्या गेल्या, सदर प्रक्रियेत एकच निविदा प्राप्त झाल्याने नियमाप्रमाणे फेर निविदा मागविण्यात आल्या. स्मारकासाठी वापरण्याचे लोह व स्ट्रक्चरल स्टीलमध्ये आय आय टी मुंबई यांचे सल्ल्यानुसार बदल केल्याने सुधारीत अंदाजपत्रकीय किंमत ₹622.40 कोटी झाली.
फेरनिविदेमध्ये मे. शापूरजी पालनजी आणि कं. लि. यांची निविदा पुनश्च: प्राप्त झाली.एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीने मे. शापुरजी पालनजी आणि कं. लि. यांची ₹709 कोटींची निविदा मंजूर केली. प्राधिकरणाच्या बैठकीत ₹763.05 कोटी रक्कमेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. संबंधित कंत्राटदारास कार्यारंभ आदेश दिनांक 9 फेब्रुवारी, 2018 रोजी देण्यात आला.
प्रकल्पात अंतर्भूत असलेल्या बांधकामाची वैशिष्टये : 

  •     प्रवेशाद्वार इमारतीमध्ये माहिती सेंटर, तिकीट घर, लॉकर रूम, प्रसाधनगृह, सुरक्षा काऊंटर, स्मरणिका कक्ष,    उपहारगृह व नियंत्रण कक्ष इत्यादी बाबीचा अंतर्भाव असेल. 
  •     स्मारकाची उंची 450 फुट (पदपीठ 100 फुट व पुतळ्याची उंची 350 फुट)
  •     प्रेक्षकगृह (आसन क्षमता 1000)
  •     संशोधन केंद्र, व्याख्यान वर्ग व ग्रंथालय
  •     ध्यानकेंद्र 
  •      तळघर वाहनतळ 1 व 2 (पार्कींग क्षमता 460 वाहने)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारकाच्या सुधारीत संकल्पनेचे सादरीकरण दिनांक 15 जानेवारी, 2020 रोजी मा. मंत्री मंडळासमोर करण्यात आले व त्यास मान्यता दिली. त्यानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील पुतळ्याची उंची वाढवून पादपीठ 30 मीटर (100 फूट) उंच व पुतळा 106.68 मीटर (350 फूट) उंच अशी एकूण 136.68 मीटर (450 फूट) उंची ठेवण्यास मान्यता देण्यात आली. सुधारीत संकल्पनेनुसार प्रकल्पाचा खर्च ₹763.05 कोटी वरून सुधारीत अंदाजित खर्च ₹ 1089.95 कोटी अपेक्षित आहे. 
महाराष्ट्र शासनाकडून सदर प्रकल्पाच्या पूर्ण संनियंत्रणासाठी मंत्रीमंडळ उपसमिती शासन निर्णय क्र. बैठक- 2020/प्र.क्र.40/बांधकामे दिनांक 09 मे, 2022 द्वारे गठीत करण्यात आली आहे. सदर उपसमितीचे अध्यक्ष मा. मंत्री (सामाजिक न्याय) असुन मा. मंत्री (नगरविकास) व मा. मंत्री (शालेय शिक्षण) हे सदस्य आहेत. 
सदर मंत्रिमंडळ उप-समितीची दिनांक 11 मे, 2022 रोजी पहिली आढावा बैठकप्रकल्पस्थळावर संपन्न झाली. मंत्रिमंडळ उप-समितीची दिनांक 19 मे, 2022 रोजी गाझियाबाद येथील श्री. राम सुतार यांच्या कार्यशाळेमधील 25 फूट प्रतिकृतिची पाहणी केली. पाहिणी दरम्यान मंत्रिमंडळ उप समितीच्या सदस्यांनी काही सूचना केल्या. सदर सूचना अंतर्भूत करून पुतळ्याची छायाचित्रे मंत्रिमंडळ उप समितीच्या दिनांक 15 जून, 2022 रोजीच्या तिसऱ्या आढावा बैठकीमध्ये सादर केली. पुतळा समितीचे सदस्य व सामाजिक न्याय वविशेष सहाय्य विभागाचे वरिष्ठअधिकारी यांनी दिनांक 7 सप्टेंबर, 2022 रोजी पुतळा प्रतिकृतीची पाहणी करुन काही किरकोळ बाबींच्या दुरुस्ती सुचवल्या. त्यानुसार पुतळ्याचे शिल्पकार यांनी सदर बाबतचे अनुपालन करुन पुतळा मान्यतेसाठी तयार ठेवलाहोता.
मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांच्या इंदू मिल येथील आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी व आढावा बैठक दिनांक 16 नोव्हेंबर, 2022 रोजी संपन्न झाली. मा. महानगर आयुक्त यांनी चर्चेदरम्यान पुतळा प्रतिकृतीस मान्यतेसाठीचा विषय मांडला. सदर विषयासाठी शासना मार्फत नविन समिती गठीत केली जाईल. ज्या समितीमध्ये आंबेडकर परिवारातील काही सदस्य व आंबेडकर चळवळीमधील व्यक्तींचा समावेश असेल. सदर समिती तयार केलेल्या पुतळा प्रतिकृतीला भेट देऊन त्याचा अहवाल/मान्यता शासनास सादर करतील व तद्नंतर शासन त्यास मान्यता देईलअसेनिर्देशदेण्यातआले. 
मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील सन्माननीय सदस्य, लोकप्रतिनिधी, तसेच आंबेडकर चळवळीमधील मान्यवर व्यक्ती व इतर यांच्या मान्यतेने पुतळा प्रतिकृती अंतिम करण्यासाठी दिनांक 06 एप्रिल, 2023 रोजी श्री. राम सुतार यांच्या गाझियाबाद, नवी दिल्ली येथे पाहणी दौऱ्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. 
सदर दौऱ्यामध्ये सर्व मान्यवरांमार्फत श्री. राम सुतार यांच्या गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथील कारखान्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 25 फुटांच्या (इंदू मिल स्मारकातील 350 फुट पुतळ्याची प्रतिकृती) पुतळा प्रतिकृतीची पाहणी करून सदर पुतळ्यास उपस्थित मान्यवरांनी अंतिम मान्यता देण्यात आली.
त्यानंतर, सदर प्रतिकृतीस शासनाने दिनांक 17 मे, 2023 रोजीच्या इतिवृत्त पत्रान्वये अंतिम मान्यता निर्गमित केली असून त्यानुसार प्राधिकरणाकडून प्रकल्पाच्या कंत्राटदारास सदरचे काम तातडीने हाती घेण्यासाठी सुचित करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन निर्णय क्र. बैठक 2021/प्र.क्र.15/बांधकामे, दिनांक 10 ऑगस्ट, 2023 रोजीच्या पत्रान्वये श्री. राम सुतार यांच्या शिल्पशाळेतील 25 फूट प्रतिकृतीच्या पुतळ्याच्या आधारावर 350 फुटी पुतळा तयार करण्यास या शासन निर्णयाद्वारे अंतिम मान्यता देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक 15 मे, 2022 रोजीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार संशोधन केंद्रातील ग्रंथालय व व्याख्यान वर्ग (4) मधील अंतर्गत वापरासंबधीत (Design brief) याबाबतच्या कामाची किंमत ढोबळ अंदाजित रक्कम ₹23.77 कोटी रक्कमेचा प्रस्ताव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनादिनांक 06 ऑक्टोबर, 2022 रोजी प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.
प्रकल्पासाठी सुधारीत संरचनेनुसार बांधकाम नकाशे तसेच आवश्यक असणाऱ्या विविध मंजुऱ्या प्राप्त करण्यात आल्या व स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत प्रकल्पातील सहाय्यभूत इमारतींचे 85% काम पूर्ण करण्यात आले आहे (स्ट्रक्चरल कामे पूर्ण झाली असून फिनिशिंग कामे प्रगतीपथावर आहेत) व स्मारकातील पादपीठाचेव पुतळ्याचे 28.5% काम पूर्ण करण्यात आले आहे व उर्वरीत कामे प्रगतीत आहेत. तसेचप्रकल्पाच्याआवारातीलबाहयविकास (External Development) कामे, लॅन्डस्केपिंगचीकामेइ. प्रगतीपथावरआहेत. 
प्रकल्पासाठी आजतागयत खर्च ₹531.47 कोटीखर्चझालाआहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सन 2025-26 साठी ₹500 कोटीआर्थिक तरतूद करण्यात आली आहे.    
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांचेकडून प्रकल्पाच्या खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून ₹548.71 कोटी प्राधिकरणास आजतागायत वर्ग करण्यात आले आहेत  

4) एमआयडीसी रस्त्याचे रुंदीकरण व बांधकाम – तळोजा एमआयडीसी रोड ते अंबरनाथ-काटई नाका रोड (भाग- 2)


प्रकल्प खर्च: ₹212.74  कोटी
प्रकल्प सुरू होण्याची तारीख: 31 जानेवारी 2024
प्रकल्पाची कालावधी: 24 महिने (पावसाळ्यासहीत)
अपेक्षित पूर्णता तारीख: जानेवारी 2026
प्रस्तावित संरचना:
अ) एकूण लांबी –  9.0550 किमी
ब) पुलाची रुंदी – 15 मीटर
प्रकल्पाची वैशिष्ट्ये:

  •    हा प्रकल्प रस्ता तळोजा एमआयडीसी रोड आणि अंबरनाथ-काटई नाका रोड यामधील आहे. हा भाग मुंबई महानगर प्रदेशाच्या पूर्वेकडील भागात येतो. तळोजा एमआयडीसी औद्योगिक पट्ट्याला जोडणारा हा रस्ता एक महत्त्वाचा प्रवेशमार्ग आहे. हा रस्ता शिळफाटा ते नावडेफाटा दरम्यान रा.म.-4 च्या समांतर धावतो.
  •     प्रकल्प रस्ता ठाणे जिल्ह्यात येतो. हा रस्ता खोणी गावापासून सुरू होतो आणि पनवेल तालुक्यातील निठळस गावाजवळ संपतो. सद्यस्थितीत या मार्गावर ग्रामीण लोकवस्ती आहे. प्राधिकरणाने या डी.पी. रस्त्याचे बांधकाम सीसी रस्त्यासह विकास योजनेच्या अंतर्गत करण्याचा निर्णय घेतला आहे.
  •     विकास योजनेनुसार, हा रस्ता तळोजा एमआयडीसी रोड आणि एनएच-4 हे दोन प्रमुख महामार्ग एकमेकांशी जोडतो, ज्यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होतो व तळोजा परिसरातील वाहतूक कोंडी कमी होते.

सद्यस्थिती:
1. भौतिक प्रगती - 25%
2. आर्थिक प्रगती - 20%
 

5) बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक      
 

प्रकल्पाची वैशिष्ट्ये:
टप्पा-1
    स्मारक रचना बांधकाम – 3 नवीन इमारतींचे बांधकाम आणि विद्यमान महापौर बंगला इमारतीचे जतन व पुनर्बांधणी.
    प्रकल्प खर्च – ₹180.99 कोटी
    एकूण क्षेत्रफळ – 1,28,011.72 चौ.फुट
    वारसास्थळ इमारत – महापौर बंगल्याचे क्षेत्रफळ – 7,088.90 चौ.फुट
तीन नव्या इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे:
1.    प्रवेश ब्लॉक (G + 2 बेसमेंट)

  •     क्षेत्रफळ: 33,354.49 चौ.फुट
  •     भुई मजला – मीटिंग रूम
  •     पहिला बेसमेंट – बहुउद्देशीय सभागृह (205 लोकांची क्षमता)
  •     दुसरा बेसमेंट – वाहनतळ (स्टॅक पार्किंग पद्धती – 27 गाड्यांसाठी)

2.    इंटरप्रिटेशन सेंटर (G + 1 बेसमेंट)

  •     क्षेत्रफळ: 16,467.53 चौ.फुट
  •     भुई मजला – ओपन प्लाझा व पाण्याचा तलाव
  •     बेसमेंट – गॅलरी विभाग

3.    प्रशासनिक इमारत (G)

  •     क्षेत्रफळ: 7,745.26 चौ.फुट
  •     यामध्ये बाळासाहेब ठाकरे ट्रस्ट कार्यालय, कॉन्फरन्स रूम, कॅफेटेरिया आणि भेट देणाऱ्यांसाठी विश्रांतीगृहे आहेत.
  •     लँडस्केप व हार्डस्केपिंग – क्षेत्रफळ: 1,01,525 चौ.फुट
  • महापौर बंगल्याच्या मागे व सर्व इमारतीभोवती विविध प्रकारच्या झाडे व झुडपांची लागवड करण्यात आली आहे.
  •     प्रकल्पामध्ये भूखंडाच्या मागील बाजूस ऍम्पीथिएटरची सोय आहे.
  •     प्रवेशद्वार व सुरक्षा प्रणालीसाठी ऑटोमेशन सिस्टम, बॅग स्कॅनर, तिकीट विक्री यंत्रणा इत्यादींचा समावेश.

टप्पा-2
    प्रस्तावित प्रकल्प खर्च
– ₹102.27 कोटी
    कामांचा समावेश:
1.    गॅलरी डिझाइनसाठी नागरी (सिव्हिल) कामे
2.    ICCC, व्हिडीओ वॉल, व्हिजिटर मॅनेजमेंट, NMS, IT कामे
3.    विद्युत कामे
4.    तंत्रज्ञान आधारित कामे
सध्यस्थिती:
    टप्पा-1 – पूर्ण झाले आहे.
    टप्पा-2 –
    भाग-1 – खरेदी, अंतर्गत कामे व IT कामांसाठी RFP सादर केले आहे. टेंडर उघडण्याची तारीख 3 वेळा वाढवण्यात आली असून, सध्याची तारीख 14 जुलै 2025 आहे.
    भाग-2 – विषयसामग्रीसाठीचा प्रस्ताव ANLA कडून सादर करण्यात आलेला आहे. MMRDA कडून टेंडर प्रसिद्ध करणे बाकी आहे.
अपेक्षित पूर्णता तारीख:
    टप्पा-1 – 25 डिसेंबर 2024 रोजी पूर्ण
    टप्पा-2 – टेंडर प्रक्रिया सुरू आहे
प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये:
टप्पा-1:

  •     वारसास्थळ असल्यामुळे संपूर्ण रचना भूमिगत ठेवण्यात आली आहे जेणेकरून महापौर बंगला सर्वदृष्टीने स्पष्ट दिसेल.
  •     समुद्रकाठील किनाऱ्यावर जुलै 2005 च्या अतिवृष्टीच्या घटनेपासून संरक्षणासाठी बफर टाकीचे बांधकाम.
  •     भूमिगत गॅलरीमध्ये काँक्रीट फिनिश व डबल वॉल संरचना देण्यात आलेली आहे.

टप्पा-2:

  •     प्रस्तावित संग्रहालय हे अत्यंत प्रेरणादायी आणि immersive अनुभव देणारे असेल.
  •     बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनदृष्टीला शोभणारी सौंदर्यपूर्ण आणि तंत्रज्ञानासह सुसंगत मांडणी असेल.
  •     संपूर्ण संग्रहालय / प्रदर्शन डिझाइनसाठी 70–80% तंत्रज्ञान हस्तक्षेप:
  •     LED स्क्रीन, व्हिडीओ वॉल्स, मीडिया सर्व्हर, टच पॅनल्स, सानुकूलित ऑडिओ स्पीकर्स व प्रणाली
  •     IT पायाभूत सुविधांचा समावेश:
  •     पूर्ण बॅकएंड IT सिस्टम – ड्युअल नेटवर्क, नेटवर्क सुरक्षा
  •     सॉफ्टवेअर लायसन्स, IBMS, अंतर्गत व बाह्य सुरक्षा
  •     BI टूल्ससह तिकीट प्रणाली, गर्दी निरीक्षण सोल्युशन्स
  •     कमांड आणि कंट्रोल रूमचे संपूर्ण डिझाईन व संचालन / देखभाल

मुख्य अडचणी:
टप्पा-1
    प्रकल्पाचे संपूर्ण हस्तांतरण
टप्पा-2
    टेंडर प्रक्रिया अद्याप प्रगतीपथावर आहे.

6) कामाचे नाव:    कापूरबावडी ते गायमुख पर्यंत घोडबंदर रोड, ठाणे मुख्य रस्त्यांचे सेवा रस्त्यांसह विलीनीकरण आणि उर्वरित रुंदीचे काँक्रिटीकरण करणे.


प्रस्तावना:
    ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर रोड (MH SH-42) हा पूर्व द्रुतगती महामार्गावरील माजिवडा जंक्शनपासून सुरू होतो आणि राष्ट्रीय महामार्ग-8 (मुंबई-अहमदाबाद महामार्ग) वर वर्सोवा (फाउंटन हॉटेल जवळ) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडला जातो. सदर घोडबंदर रस्त्याच्या आजूबाजूचा परिसर झपाट्याने विकसित होत आहे, ज्यामुळे या रस्त्यावर वाहनांची संख्याही वाढत आहे ज्यामुळे या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होते. तसेच सदर घोडबंदर रस्त्याचे दोन्ही बाजूचे सेवा रस्ते हे डांबरीकरणाचे असून तुलनेने कमी वापरात  येत आहेत. तसेच गायमुख ते जुना गायमुख जकात नाका पर्यंत, घोडबंदर रोडची रुंदी फक्त 20 मीटर आहे आणि 2+2 लेनचा कॉक्रीट रस्ता असून 1 किमीपर्यंतचा रस्ता वाहतूकीसाठी अडचण निर्माण होत आहे.
    सबब, कापूरबावडी (सा.क्र. 0+000 किमी) ते गायमुख (सा.क्र. 9+350 किमी) पर्यंतच्या मुख्य रस्त्यांचे सेवा रस्त्यांसह विलीनीकरण आणि उर्वरित रुंदीचे काँक्रिटीकरण करणे आवश्यक आहे. 
प्रकल्पांची वैशिष्टये :
1.    रस्त्याची लांबी- 10.36 कि.मी.
2.    रस्त्याची रुंदी- 6+ 6 लेन
3.    प्रकल्पाची किंमत- रु. 559 कोटी.

सदर प्रकल्प कामकाजाच्या दृष्टीने खालील 4 भागांमध्ये विभागणी केलेली आहे.

 

भाग साखळी क्रमांक. प्रकल्पाची किंमत. प्रकल्पाचे कंत्राटदार लांबी (कि.मी)
भाग-1 0+000 कि.मी. ते 3+022 कि.मी.(कापूरबावडी ते पाटलीपाडा उड्डाणपूल)97,28,78,010/- 97,28,78,010/- मे. आर.के. मधानी & कंपनी 6.044
भाग-2 3+022 कि.मी. ते 5+750 कि.मी.(पाटलीपाडा उड्डाणपूल ते हायपरसिटी मॉल) 98,52,53,990/- मे. देव इंजिनिअर्स 5.456
भाग-3 5+750 कि.मी. ते 8+290 कि.मी.(हायपरसिटी मॉल ते नागलाबंदर जंक्शन) 102,19,73,188/- मे. रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्टस लि. 5.08
भाग-4 8+290 कि.मी. ते 10+350 कि.मी.नागलाबंदर जंक्शन ते जुना जकात नाका) 97,18,49,858/- मे. बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. 4.12

सद्यस्थिती प्रगती : भौतिक प्रगती: 25%

स्थळ: कापूरबावडी, घोडबंदर रोड ठाणे
काम पूर्णत्वाचा कालावधी: 24 महिने 
प्रकल्पाचे महत्त्व:

  •     घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी
  •     या प्रकल्पामुळे इंधन आणि वेळेची बचत होईल.
  •     या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल.

7)प्रकल्पाचे नाव: कासरवडवली ते खारबांव खाडीपुलाचे संकल्पन व बांधकाम करणे.

    प्रकल्पाची माहिती: -

  •     कासरवडवली ते खारबांव खाडीपुलाचे संकल्पन व बांधकाम करणे या प्रकल्पाला दिनांक 05/03/2024 रोजी झालेल्या 156 व्या प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याची एकूण किंमत रु. 1884.36 कोटी आहे.
  •     प्रकल्पाची लांबी 3.93 किमी असून 6-लेन (3+3 लेन) आहे. तो ठाणे येथील कसारवाडवलीपासून सुरू होतो आणि ठाणे क्रीक, मल्टीमॉडल कॉरिडोर (MMC), डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, ठाणे क्रीक, मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, दिवा-वासई विद्यमान रेल्वे ओलांडून राज्य महामार्ग क्र. ४८ वर मिळतो. हा प्रकल्प बळकूम–गैमुख डीपी रोड (2+150) ला ओलांडतो आणि दोन उच्च-वेगाच्या मार्गांमधील (80 किमी प्रतितास) अखंड वाहतुकीसाठी IRC:92 (2017) प्रमाणे पूर्ण क्लोव्हरलीफ इंटरचेंज प्रस्तावित करण्यात आले आहे.
  •     सदर प्रकल्पासाठी दिनांक 11.10.2024 रोजी मेसर्स अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांना कंत्राटदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि मेसर्स एसएमईसी इंटरनॅशनल प्रा. लि., इन अससोसिएशन मेसर्स सुई जेनेरिस इन्फ्राटेक एलएलपी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) म्हणून दिनांक 11.10.2024 रोजी नियुक्त करण्यात आले आहे.

    प्रकल्पाची वैशिष्ट्ये:

  •     प्रकल्पाची लांबी: 3.93 किमी.
  •     सुपरस्ट्रक्चरची रुंदी = 40 मीटर (6 लेन आणि 3+3 लेन)
  •     स्पॅनची लांबी = 35 मीटर
  •     प्रस्तावित संरेखन ठाणे खाडी, मल्टीमॉडल कॉरिडॉर (एमएमसी), समर्पित फ्रेट कॉरिडॉर, ठाणे खाडी, मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल, दिवा-वसई रेल्वे ओलांडते आणि राज्य महामार्ग क्रमांक ४८ वर मिळते.
  •     काम पूर्ण करण्याचा कालावधी = 42 महिने (डिझाइन / पर्यावरणीय मंजुरीसाठी 12 महिने) + (बांधकामासाठी 30 महिने)
  •     दोष दायित्व कालावधी (DLP) = 24 महिने
  •     प्रकल्प खर्च: रु. 1884.36 कोटी

    सध्याची स्थिती:

  • भू-तांत्रिक तपासणी आणि प्राथमिक सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे. भूसंपादन, वन मंजुरी, किनारी नियमन क्षेत्र, महाराष्ट्र सागरी मंडळ आणि रेल्वे मंजुरी यांच्याकडून परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

8)विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत कल्याण विकास केंद्र प्रकल्पातील उसरघर- निळजे-घेसर, निळजे- कोळे- हेदूटणे, हेदूटणे- माणगाव-भोपर आणि उसरघर-घारीवली या गावांना जोडणाऱ्या चार रस्त्यांचे बांधकाम करणे. (भाग 1 ते 3) 

प्रकल्प खर्च: ₹326.61 कोटी
प्रकल्प सुरू होण्याची तारीख: 26/12/2022
प्रकल्प कालावधी: 24 महिने (पावसाळ्यासहीत)
अपेक्षित पूर्णता तारीख: 26/12/2026
प्रस्तावित संरचना:
अ) एकूण लांबी – 13.81 किमी
ब) रुंदी – 24 मीटर, 30 मीटर आणि45 मीटर
इतर वैशिष्ट्ये : हे चारही रस्ते कल्याण-शिळफाटा, बदलापूर-काटई पाइपलाइन रोड, मेट्रो-12 व विरार-अलिबाग कॉरिडॉर परिसरात येतात, जे 10 गावांमधील वाहतूक सुधारण्यात मदत करतील.

प्रकल्प वैशिष्ट्ये:

  •     राज्य शासनाने कल्याण व अंबरनाथ तालुक्यांतील 27 गावांसाठी विकास योजना मंजूर केली आहे, ज्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 1089 हेक्टर इतके आहे. यापैकी 10 गावांसाठी कल्याण ग्रोथ सेंटर अंतर्गत टाउन प्लॅनिंग जाहीर करण्यात आले आहे.
  •     या प्रस्तावित कामाअंतर्गत कल्याण ग्रोथ सेंटरमध्ये चार नवीन काँक्रीट डीपी रस्त्यांचे बांधकाम करण्यात येत आहे, जे अत्यंत महत्त्वाच्या जोडणीसाठी उपयुक्त ठरणार आहेत.
  •     हे प्रकल्प रस्ते डोंबिवली आणि दिवा भागाच्या जवळ असून, प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ठाणे स्थानकाजवळ आहेत. हे रस्ते डोंबिवली, अंबरनाथ, तळोजा आणि पनवेल एमआयडीसीशी जोडणी साधतील.

सद्यस्थिती:
. भौतिक प्रगती – 28%
. आर्थिक प्रगती – 30%
 

9) पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी, ठाणे येथे रेल्वे ओव्हर ब्रिजचे रुंदीकरण आणि बांधकाम करणे.

प्रस्तावना: 
    पूर्व द्रुतगती महामार्ग ठाणे शहरातून मुंबईकडे जाताना कोपरी येथील मध्य रेल्वेचा उड्डाणपूल ओलांडून जावे लागते. सदर उड्डाणपूल 2 +2 लेनचा असून पुलाच्या दोन्ही बाजूला पूर्व द्रुतगती महामार्गाचे 4+4 लेनचे रस्ते वाहतूकीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे रेल्वे पुलावरील मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्राधिकरणाने रेल्वे क्रॉसिंग पुलाचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे.
सदर प्रकल्पानुसार, कोपरी रेल्वे पुलाचे रुंदीकरणाचे काम दोन टप्प्यात करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात, विद्यमान पुलाच्या दोन्ही बाजूंना दोन पदरी पूल बांधण्यात आले असून नव्याने बांधलेल्या पुलांवरून वाहतूक वळवून नंतर दुसऱ्या टप्प्यात, विद्यमान पूल पाडण्यात आला आहे आणि त्या ठिकाणी नवीन 4 पदरी पूल बांधण्यात आला आहे. अशा प्रकारे, संपूर्ण पूल 4+4 पदरी बांधण्यात आला आहे.

प्रकल्पाची वैशिष्टये:
1.    रस्त्याची लांबी -796 मी.
2.    रस्त्याची रुंदी - 37.04 मी. (4+4 मार्गिका)
3.    प्रकल्पाची किंमत - रू. 258.76 कोटी
सद्य:स्थिती:
प्रकल्पाचे दोन्ही टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे.
स्थळ:
कोपरी, ठाणे

काम पूर्ण होण्याचा दिनांक:  03/07/2023

प्रकल्पाचे महत्त्व:

  •     पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी.
  •     विद्यमान रेल्वे पूल ओलांडण्यासाठी अंदाजे 30 मिनिटे वेळ आणि इंधनाची बचत.
  •     नौपाडा ते ज्ञानसाधना महाविद्यालय या मार्गावरुन एलबीएस मार्ग, वागळे इस्टेट भागात वाहनांसाठी भुयारी मार्ग बांधल्यानंतर वाहतूक सुलभ होईल.
  •     तीन हात नाका येथे रहदारी कमी
  •     भविष्यात आनंद नगर सबवेवर अतिरिक्त लेन प्रदान केले जाऊ शकतात.


10) मोटागाव–मानकोली रस्त्यावर प्रस्तावित उल्हास क्रीकवरील सहा मार्गीय पुलाचे बांधकाम करणे.

प्रकल्प खर्च: ₹223.25 कोटी
प्रकल्प सुरू होण्याची तारीख: 14/03/20216 
प्रकल्प कालावधी: 36 महिने (पावसाळ्यासहीत)
पूर्णता तारीख: 31/12/2023 
प्रस्तावित संरचना:
एकूण लांबी – 980 मीटर
रुंदी – 27 मीटर

प्रकल्प वैशिष्ट्ये:

  •     उल्हास क्रीकवर सहा मार्गीय पूल बांधण्यात आलेला आहे. हा पूल डोंबिवलीतील मोटागावला भिवंडीतील मानकोलीशी जोडतो, ज्यामुळे या परिसरातील आणि आसपासच्या भागांतील प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होतो आणि वाहतूक कोंडी कमी होते.
  •     ठाणे व भिवंडी ते कल्याण आणि डोंबिवली दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी होतो.
  •     या पुलामुळे NH-160 आणि NH-08 वरील वाहतूक प्रस्तावित कल्याण रिंग रोड–काटईनाका–बदलापूर–कर्जत मार्गे खोपोली (NH-04) कडे वळवली जाईल, ज्यामुळे मुंब्रा, शिळफाटा, कलांबोली व पनवेल या दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये वाहतूक जाणार नाही.
  • सद्यस्थिती:

    काम पूर्ण झाले असून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे.

11) माणकोली – मोटागाव जोडरस्त्याचे बांधकाम करणे.

प्रकल्प खर्च: ₹83.03 कोटी
प्रकल्प सुरू होण्याची तारीख: 13/09/2019 
प्रकल्प कालावधी: 18 महिने (पावसाळ्यासहीत)
पूर्णता तारीख: 31/12/2023 
प्रस्तावित संरचना:
रस्त्याची लांबी – 2890 मीटर
प्रकल्प वैशिष्ट्ये:

  •     एमएमएलआर (MMLR) प्रकल्पाची सुरुवात मानकोली गावापासून (NH3 च्या किमी 553.300 वर) होते आणि शेवट मोटागाव गावाजवळ होतो. हा रस्ता कल्याण-डोंबिवलीला भिवंडी व ठाणे मार्गे कमी अंतरातून जोडतो.
  •     डोंबिवली–भिवंडी–ठाणे या दरम्यानचा प्रवासाचा कालावधी सुमारे 15-20 मिनिटांनी कमी होईल.
  •     डोंबिवली, ठाणे आणि आसपासच्या शहरांतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा रस्ता महत्त्वाची भूमिका बजावेल.

सद्यस्थिती:
काम पूर्ण झाले आहे.

12) डोंबिवली एमआयडीसी निवासी क्षेत्रातील रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरण (EXT. MUIP अंतर्गत – KDMC क्षेत्रात)

प्रकल्प खर्च: ₹48.09 कोटी
प्रकल्प सुरू होण्याची तारीख: 15.07.2022
प्रकल्प कालावधी: 18 महिने (पावसाळ्यासह)
पूर्णता तारीख: 14.1.2024
प्रस्तावित संरचना:
रस्त्याची एकूण लांबी – 4859 मीटर
रुंदी – 15,18 मीटर, व 25 मीटर

प्रकल्प वैशिष्ट्ये:

  •     मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) डोंबिवली एमआयडीसी निवासी क्षेत्रामधील विकास योजनेतील रस्ते सिमेंट काँक्रीटच्या स्वरूपात बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
  •     यामुळे वाहतूक कोंडीमध्ये लक्षणीय घट होईल.
  •     डोंबिवली एमआयडीसी निवासी क्षेत्रातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
  •     डोंबिवली एमआयडीसी निवासी क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची कळ्याण-शिळ रोड व इतर प्रमुख रस्त्यांशी जोडणी सुधारली जाईल.

सद्यस्थिती:
काम पूर्ण झाले आहे.

13) तळोजा- एम.आय.डी.सी. ते एन एच-4 रस्त्याचे बांधकाम करणे.(भाग-1)

कामाची किंमत: ₹98.51 कोटी
प्रकल्पाची सुरुवात तारीख: 31-01-2024
प्रकल्पाची कालावधी: 24 महिने (पावसाळ्यासहीत)
प्रस्तावित पूर्णता तारीख: 22-09-2024
अपेक्षित पूर्णता तारीख (ईओटीनुसार): 18-08-2025
प्रस्तावित रचना:
a) एकूण लांबी – 3260 मीटर
b) रुंदी – 45 मीटर
प्रकल्प वैशिष्ट्ये:

  •     प्रस्तावित डीपी रोड NH-4 आणि तळोजा एमआयडीसी रोड यांच्यामधील भागात आहे, जो मुंबई महानगर प्रदेशाच्या (MMR) पूर्व भागात स्थित आहे. हा रस्ता डोंबिवली, बदलापूर व अंबरनाथ परिसराच्या जवळ असून, एकूणतः पूर्व-पश्चिम दिशा असलेला आहे. हा मार्ग ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत येतो.
  •     सदर रस्ता तळोजा एमआयडीसी रोडवरील उसाटणे गावापासून सुरू होऊन, सुधारित कामकाजाच्या व्याप्तीनुसार अंबरनाथ तालुक्यातील वाकळन गावापर्यंत जातो. सद्यस्थितीत प्रकल्प परिसरात ग्रामीण लोकवस्ती आहे.
  •     मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प (MUIP) अंतर्गत या डीपी रोडचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाचा उद्देश तळोजा एमआयडीसी रोडला मुंबई-पनवेल महामार्गाशी (रोहिंजन गावाजवळ) जोडणे आहे.
  •     सदर मार्गरेषा पूर्णतः नवीन असून, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि तळोजा एमआयडीसी रोड यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे.

सद्यस्थिती:
1.    भौतिक प्रगती – 32%
2.    आर्थिक प्रगती – 28%

14) प्रकल्पाचे नाव : कल्याण आणि मुरबाड रोड (पाम्स वॉटर रिसॉर्ट) ते बदलापूर रोड (जगदीश दुग्धालय) ते पुणे लिंक रोड दरम्यान वाळधुनी नदीच्या समांतर उभारण्यात येणाऱ्या उन्नत रस्त्याचे व स्लिप रोडसह कर्जत-कसारा रेल्वे मार्गावरून होणाऱ्या क्रॉसिंगसह डिझाइन व बांधकाम.


A) प्रकल्पाची माहिती:
उन्नत रस्ता (रॅम्प व आर्मसह) लांबी – 4.30 किमी
सेवा रस्ता लांबी (ROW – 24 मी.) – 1.90 किमी
रस्ता काम (ROW – 18 मी.) – 0.80 किमी
RCC. रिटेनिंग वॉल – 2.48 किमी
ROB ची संख्या : 02
जंक्शनची संख्या : 03 (भवानी चौक, जगदीश दुग्धालय व विठ्ठलवाडी)
लेन कॉन्फिगरेशन : चार लेन (2+2)

B) प्रकल्पाचे लाभ:
वाहतूक व प्रवासाचा वेळ 25 मिनिटांनी कमी होईल
कल्याण शहरासाठी पूर्व-पश्चिम दिशेतील चांगला संपर्क
वाहतुकीचा सुरळीत प्रवाह सुनिश्चित होईल
इंधन बचत होईल

C) प्रकल्प खर्च:
i) प्रशासकीय मंजुरीचा खर्च : रु. 642.98 कोटी
ii) कंत्राटी खर्च : रु. 474.10 कोटी
iii) कंत्राटदार : मे. अशोका बिल्डकॉन लि.
iv) तांत्रिक सल्लागार : लायन इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स प्रा. लि.

D) प्रारंभ दिनांक: 11 ऑक्टोबर 2024

E) निर्धारित पूर्णता दिनांक: 10 एप्रिल 2027

F) भौतिक प्रगती: 11.45%

G) आर्थिक प्रगती: 10.13%

H) प्रकल्पाची सध्याची स्थिती: 

  •     140 पैकी 101 पुष्टीकरण बोअर होल पूर्ण, 605 पैकी 129 पाइल पूर्ण, 140 पैकी 20 पाइल कॅप पूर्ण.
  • 194 पैकी 20 पियर्स  पूर्ण, 483 पैकी 13 गर्डर कास्टिंग पूर्ण.
  •     कर्जत आणि कसारा रेल्वे लाईनवरील ROB साठी रेल्वे कडून इन-प्रिन्सिपल GAD मंजुरी प्रक्रिया KDMC मार्फत प्रगतीपथावर सुरू आहे. 
  •     KDMC मार्फत भू-संपादन प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.  
  •     संबंधित युटिलिटी विभागांकडून युटिलिटी स्थलांतर प्रगतीपथावर आहे.

  
15)कामाचेनावः भारत डायमंड बोर्‍स कंपनी, युनिव्हर्सिटी ते वाकोला जंक्शन दरम्यान उभारण्यात येणाऱ्या  एलिवेटेड कॉरिडॉरचे डिझाईन व बांधकाम  (भाग-2 ).

प्रकल्प माहितीः
BKC (बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स) येथील व्यापारी संकुलांचा झपाट्याने विकास होत आहे. ICICI बँक, देना बँक, वॉकहार्ट, रिलायन्सचे आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र, भारत डायमंड बोर्‍स, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, स्टेट बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, यूएस कौन्सुलेट इत्यादी अनेक महत्त्वाच्या कॉर्पोरेट कार्यालयांनी येथे आपली मुख्य कार्यालये स्थापन केली आहेत.
शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे BKC कडे सर्व दिशांमधून वाहतूक एकवटते. त्यामुळे BKC परिसरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक लवकरच त्यांच्या वहनक्षमतेच्या मर्यादेला पोहोचली आहे. म्हणूनच, BKC ला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे व वेस्टर्न एक्सप्रेस हायवे यांच्याशी थेट जोडण्यासाठी एलिवेटेड कॉरिडॉर (उन्नत मार्गिका) उभारणे आवश्यक झाले आहे.
मुंबई अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट (MUIP) अंतर्गत ही गरज आधीच ओळखून, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (SCLR) वर BKC जंक्शन, युनिव्हर्सिटी जंक्शन, डॉ. आंबेडकर चौक, वाकोला जंक्शन तसेच MTNL जंक्शन यांना जोडणारा एलिवेटेड रोड प्रस्तावित करण्यात आला आहे.
प्रगत वाहतूक अभ्यासाने हे अधोरेखित केले आहे की BKC या प्रमुख व्यापारी केंद्रासाठी पूर्व-पश्चिम वाहतुकीची सुलभता सुनिश्चित करण्यासाठी हा एलिवेटेड कॉरिडॉर अत्यावश्यक आहे..

प्रकल्पाच्या ठळक वैशिष्ट्ये :

1. संचालन संस्था मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
2. पकल्य व्यवस्थापन सल्लागार एम. पॅक्डी कंपनी लिमिटेड.
3. पकल्य व्यवस्थापन सल्लागार एम. एस. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड.
4. जोडणी (Connectivity) भारत डायमंड बौर्स, BKC पॅपल वेस्टर्न
5. एलिवेटेड स्टॅच्याची लांबी भारत नगर ते युनिव्हर्सिटी गेट क्र. 2 (4 लेन): 0.50 किमी (हाइट: 17.2 मीटर)
युनिव्हर्सिटी गेट क्र. 2 ते SCLR फेज-1 व वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (2 लेन): 0.90 किमी
6. प्रवास वेळेचे बचत सुमारे 35 मिनिटे
7. पाया बांधणीचा प्रकार पाईल फाउंडेशन / पॅम शाफ्ट रिटेनिंग वॉल
8. उपरचना प्रकार RCC पिअर (सिंगल शॅफ्ट / कंटिन्युअस / सेगमेंटल)
9. सुपरस्टक्चर प्रकार RCC PSCI गर्डर / स्टील कम्पोझिट स्पॅन
10. निविदा लावलेला खर्च ₹245.91 कोटी
11. मंजूर निविदा खर्च ₹220.89 कोटी (10.17% घट कमी दर)
12. स्थावरित खर्च ₹191.88 कोटी
13. काम सुरू झाल्याची तारीख 18 ऑगस्ट, 2017
14. काम पूर्ण करण्याची निर्धारित मुदत 30 महिने
15. काम पूर्ण होण्याची तारीख 31 डिसेंबर, 2025 (EOT - अतिरिक्त मुदत)
16. सद्यस्थिती 31 भौतिक प्रगती: 75% आर्थिक प्रगती: 73%
17. स्थान

31 भारत नगर, BKC — वाकोला नाल्याच्या

 

16) कामाचेनावः सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडवरील कुर्ला ते वाकोला उड्डाणपुलाचे बांधकाम, ज्यामध्ये वाकोला जंक्शन, युनिव्हर्सिटी जंक्शन आणि बीकेसी जंक्शन आणि बी) एमटीएनएल जंक्शन, बीकेसी ते कुर्ला येथील एलबीएस उड्डाणपुलाचा समावेश आहे.

प्रकल्प माहितीः
मुंबई नागरी सुविधा प्रकल्पांतर्गत (MUIP) अंतर्गत सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR) ची योजना आखण्यात आली आहे जेणेकरून बांद्रे कुर्ला संकुलनातील प्रमुख व्यावसायिक केंद्रातील वाहतुकीच्या आवश्यक प्रवाहाला आधार देण्यासाठी पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी असेल. सदर उन्नत मार्ग पश्चिम द्रुतगती महामार्ग व पुर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडत आहे. यामध्ये चार चौकांचा समावेश होतो, म्हणजे बांद्रे कुर्ला संकुल जंक्शन, युनिव्हर्सिटी जंक्शन, डॉ. आंबेडकर चौक, वाकोला जंक्शन याशिवाय बीकेसी मधून चढण्याकरिता एमटीएनएल जंक्शन येथून लालबहादूर शास्त्री मार्गावरील फ्लायओव्हरला जोडणारी मार्गाका यांचाही  समावेश आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला जंक्शनवर केबल स्टे ब्रीज: 
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सिग्नल मुक्त पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी आणि नवी मुंबई, पुर्व द्रुतगती महामार्ग आणि बीकेसी कडून विमानतळाकडे येणाऱ्या वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासाठी केबल स्टे ब्रीज बांधला आहे. या ब्रीजमध्ये 215 मीटर लांबीचा स्पॅन. आहे. सदर भाग सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड भाग-1 प्रकल्पाचा एक भाग आहे. तसेच हा दक्षिण आशियातील 100 मीटर त्रिज्येची वक्रता असलेला पहिलाच केबल स्टे ब्रीज आहे. ज्यामध्ये ऑथॉट्रॉफिक स्टील डेकचा समावेश आहे. सदर ब्रीज जमिनीपासून सुमारे 25 मीटर उंचीवर असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला फ्लायओव्हर वरून जातो व पुढे सांताक्रुझ येथील पानबाई इंटरनॅशनल स्कूलजवळ उतरतो.
ब्रीजमधील केबलस्टे ब्रीजच्या सुपरस्ट्क्चरचा भार केबलद्वारे 'वाय 'आकाराच्या एका पायलॉनवर हस्तांतरीत होत असल्याने ब्रीजच्या-पिअर्सची  संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. केबल स्टे ब्रीजची रुदी १०.५० मी. ते 17.20  मी. पर्यंत असून हा दोन लेनचा ब्रीज आहे. 

मुंबई  महानगर प्रदेश विकास प्राधिकरण  
अ.क्र. प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये माहिती
1 प्रकल्प व्यवस्थापन मॅ पॅडको कंपनी लिमिटेड.
2 प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मे जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड.
3 उन्नत मार्गाची लांबी अ) एमटीएनएनआरएम - बीकेसी ते एचबीएमएस फ्लायओव्हर पर्यंत 2 लेन - 1.2 कि.मी. (दुसरा टप्पा)
(दि.: 10.02.2023 रोजी वाहतुकीसाठी खुला)
ब) फॉर्च्यून बिझिनेस ते कापाडिया कुली पर्यंत 4 लेन - 1.65 कि.मी. आणि कापाडिया नगर ते
4 वाहतुकीसाठी खुली कारवाईची लांबी मुंबई डायमंड (बांद्रा) पासून पाणशेत इंटरचेंज स्क्वेअर पर्यंत (2 लेन) - 1.66 कि.मी.
(दुसरा टप्पा)
5 प्रवासाचा वेळ 45 मिनिटे बचत तसेच इंधनाचीही बचत होणार
6 फाउंडेशनचा प्रकार पाइल फाउंडेशन / ओपन फाउंडेशन.
7 सब स्ट्रक्चरचा प्रकार आरसीसी पिअर (सिंगल सेंटर / कॅप्सूल / पोर्टल) केबल स्टेसाठी पायथन
8 सुपरस्ट्रक्चरचा प्रकार आरसीसी सेगमेंटल बॉक्स गर्डर / स्टील कंपोझिट / ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक
9 प्रकल्पाची किंमत ₹670 कोटी
10 प्रकल्प सुरू होण्याची तारीख 27 ऑक्टोबर 2016
11 पूर्ण होण्याची तारीख जुलै 2025
12 प्रकल्पाची एकूण भौतिक प्रगती 100%
13 प्रकल्पाची आर्थिक प्रगती 96%

17)  कामाचे नाव: उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम (पॅकेज १,२ आणि, ३)


1.    नेताजी चौक ते कैलास कॉलनी मार्गे कुर्ला कॅम्प, पर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे – उल्हासनगर-४. (लांबी १८५० मीटर, रुंदी २२.०० मीटर)
2.    न्यू इंग्लिश हायस्कूल ते लालचक्की चौक मार्गे पेट्रोल पंप आणि हिल लाईन पोलिस स्टेशन, पर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे – उल्हासनगर-४. (लांबी ११०० मीटर, रुंदी २२.०० मीटर)
3.    ए- ब्लॉक ते साई बाबा मंदिर मार्गे डॉल्फिन क्लब ते सेंच्युरी ग्राउंड ते गुरुद्वारा, पर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे – उल्हासनगर-१.  (लांबी: ९५० रुंदी: २२ मीटर)
4.    सोनार चौक ते कोयंडे मार्गे शारदा वाडा, पर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे – उल्हासनगर-४. (लांबी: ३३० रुंदी: १८ मीटर)
5.    हिराघाट मंदिर ते डर्बी हॉटेल ते समर्पण अपार्टमेंट, पर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे – उल्हासनगर-३. (लांबी: ३०० रुंदी: १२ मीटर)
6.    श्यामा प्रसाद मुखर्जी चौक ते शांतीनगर मार्गे विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन, पर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे – उल्हासनगर-३. (लांबी: १२५० रुंदी: १८ मीटर)
7.    वॅको कंपाऊंड ते व्हीनस चौक, पर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे – उल्हासनगर-३. (लांबी: २००० रुंदी: १८ मीटर आणि २४ मीटर)

प्रकल्पाचा खर्च: 
1.    पॅकेज -१ - रु: ४८.३९ कोटी.
2.    पॅकेज -२ - रु: ४६.२८ कोटी. 
3.    पॅकेज -३ - रु: ३९.०३ कोटी. 

कामाचा आदेश देण्याची तारीख:
1.    पॅकेज -१ - २४/०४/२०२३
2.    पॅकेज -२ - २४/०४/२०२३
3.    पॅकेज -३ - ११/०४/२०२३. 
सध्याची स्थिती: 
I.    भौतिक प्रगती:

  •     पॅकेज -१ - ९३% 
  •     पॅकेज -२ - ९१% 
  •     पॅकेज -३ - ९४%.

II.    आर्थिक प्रगती: 

  •     पॅकेज -१ - ७२% 
  •     पॅकेज -२ - ५३% 
  •     पॅकेज -३ - ७८%. 

प्रकल्पाचे वर्णन
१. प्रकल्पाची एकूण लांबी = ७७३० मीटर
२. M40 PQC असलेला मुख्य कॅरेज वे.
३. स्टॅम्प केलेल्या काँक्रीट फूटपाथसह M-२५ ग्रेड कॉंक्रिटमध्ये RCC SWD.
४. दोन्ही बाजूंना १०० मिमी पेव्हर ब्लॉक असलेले साइड शोल्डर्स.
५. बांधकामादरम्यान वाहतूक व्यवस्थापन आणि वाहतूक चिन्हे: वाहतूक वॉर्डन, अनिवार्य सावधानता फलक, वेग मर्यादा बोर्ड, रोड स्टड इ.
६. स्ट्रीट लाईटची व्यवस्था.
७. अडथळे:

  •  युएमसि द्वारे पाण्याच्या लाईन शिफ्टिंगचे काम.
  •  सीवरेज लाईनचे काम आणि मालमत्ता कनेक्शन..

 

18) प्रकल्पाचे नाव :- पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे पर्यंत विस्तारीकरण करणे.

प्रकल्पाची माहिती :-

  •     मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दि. 05/03/2024 रोजी झालेल्या 156व्या बैठकीत पूर्व मुक्त मार्ग छेडानगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे या प्रकल्पाच्या प्रस्तावास व यास अपेक्षित ₹. 3314.40 कोटी इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली
  •     सदर विस्तारीत प्रकल्प हा 6 पदरी (3+3 पदरी) रस्त्याचे संरेखन 13.90 किमी आहे.                    जे ठाण्याजवळील आनंदनगरपासून सुरू होतो आणि मुलुंड, ऐरोली, जेव्ही.एल.आर, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपरमधून जातो आणि छेडा नगर येथे संपतो. नवघर उड्डाणपूल  3+3 पदरी टोल प्लाझाची तरतूद, दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी मुलुंड चेक नाका, ऐरोली जंक्शनजवळ, विक्रोळी जंक्शनजवळ 2 पदरी अप-डाउन रॅम्प प्रस्तावित आहेत.
  •     सदर उन्नत मार्गाचा शेवट आनंद नगर, ठाणे येथे होणार असून सदर मार्ग पुढे प्रस्तावित आनंद नगर ते साकेत उन्नत मार्गास मिळणार आहे
  •     मे. नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडची कंत्राटदार म्हणून नियुक्ती दि. 18/12/2024  रोजी करण्यात आली आहे आणि मे. शेलाडिया असोसिएट्स इंक. आणि मे. एस.एम.ई.सी. इंटरनॅशनल प्रा. लि. दि. 18/12/2024 रोजी यांची संयुक्त भागीदारीत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये :- 

  •     प्रकल्पाची लांबी : 13.90 कि.मी.
  •     प्रकल्पाची सुपर स्ट्रक्चरल रुंदी : 25 मी. (6 पदरी आणि 3+3 पदरी)
  •     स्पॅन लांबी : 40 मी.
  •     प्रस्तावित संरेखन मुलुंड, ऐरोली, JVLR, विक्रोळी, गोदरेज जंक्शन, मानखुर्द, घाटकोपर आणि छेडा नगर ओलांडते.
  •     काम पूर्णत्वाचा कालावधी = 48 महिने (संकल्पन / पर्यावरणीय मंजुरीचा कालावधी               12 महिने) + (बांधकामाचा कालावधी 36 महिने)
  •     दोष दायित्व कालावधी : 24 महिने
  •     प्रकल्पाची किंमत : रु. 2682 कोटी

सद्य:स्थिती :
प्राथमिक सर्वेक्षण आणि टेस्ट पाईल पूर्ण झाले आहेत आणि भू-तांत्रिक तपासणीचे काम, उपयुक्तता ओळखण्याचे काम आणि Working pile चे काम प्रगतीपथावर आहेत.


19) प्रकल्पाचे नाव :- बाळकुम ते गायमुख ठाणे खाडी किनारा पुलाचे बांधकाम करणे. (ठाणे कोस्टल रोड)

 

प्रकल्पाची माहिती :-

  •     मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दि. 05/03/2024 रोजी झालेल्या 156 व्या बैठकीत बाळकुम ते गायमुख ठाणे खाडी किनारा पुलाचे बांधकाम करणे (ठाणे कोस्टल  
  •     रोड) या प्रकल्पाच्या प्रस्तावास व यास अपेक्षित ₹. 3364.62 कोटी इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
  •     प्रस्तावित 6 पदरी रस्ता (ग्रीनफिल्ड सरंखेन) एकूण लांबी 13.450 कि.मी. आहे. सदर प्रकल्प मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोल प्लाझा येथे बाळकुम (जुना राष्ट्रीय             महामार्ग-3) पासून गायमुख पर्यंत प्रस्तावित आहे.
  •     सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक वाहतूक होते ज्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. शिवाय, घोडबंदर रोडवरील वाढत्या शहरीकरणामुळे प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे ज्यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे.
  •     घोडबंदर रस्त्यावरील व्यावसायिक वाहतूक वेगळी करण्यासाठी ठाणे खाडीच्या किनारपट्टीवर नवीन रस्ता (ग्रीनफिल्ड संरेखन) तयार करण्याचा प्रस्ताव आहे.
  •     मे. नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडची कंत्राटदार म्हणून नियुक्ती दि. 18/12/2024  रोजी करण्यात आली आहे आणि मेसर्स टेक ४ इंजेनिएरोस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स योशिन इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनची दि. 18/12/2024 रोजी यांची संयुक्त भागीदारीत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये :- 

  •     संरेखनाची लांबी  : 13.450 कि.मी
  •     काम पूर्णत्वाचा कालावधी = 48 महिने (संकल्पन / पर्यावरणीय मंजुरीचा कालावधी  12 महिने) + (बांधकामाचा कालावधी 36 महिने)
  •     दोष दायित्व कालावधी : 24 महिने
  •     प्रकल्पाची किंमत : रु. 2727.00 कोटी

सद्य:स्थिती :
प्राथमिक सर्वेक्षण आणि टेस्ट पाईल पूर्ण झाले आहे आणि भू-तांत्रिक तपासणीचे काम, युटिलिटी आयडेंटिफिकेशन आणि  Working Pile चे काम प्रगतीपथावर आहेत.


20)प्रकल्पाचे नाव:    पूर्व द्रुतगती महामार्गावरील आनंद नगर ते साकेत पर्यंत ठाणे शहरातील उन्नत मार्गाचे बांधकाम करणे.

प्रस्तावना: 
ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्ग तीन हात नाका, नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन, गोल्डन डाईज जंक्शन (माजिवडा) या महत्त्वाच्या जंक्शनमधून जातो. तीनहात नाका जंक्शन येथे सहा पदरी उड्डाणपूल, नितीन व कॅडबरी जंक्शन येथील कॅडबरी उड्डाणपूल, माजीवाडा जंक्शनवरील गोल्डन डाईज उड्डाणपूल आहे. तीन हात नाका येथे ठाण्याकडून येणारे दोन रस्ते आणि एलबीएस मार्गावरून येणारा रस्ता आहे. तसेच ये-जा करणाऱ्या सर्व्हिस रोड आणि उड्डाणपुलांचे स्लिप रोड आहेत. माजिवडा जंक्शन, प्रमुख घोडबंदर रोड. जे मुंबईहून गुजरातला आणि नाशिकहून गुजरातला जाणारी वाहतूक करते. मुंबई अहमदाबाद महामार्गाला मोठी कनेक्टिव्हिटी. मुंबईहून येणारी अवजड वाहतूक आणि या जंक्शनमुळे मोठ्या वाहतुकीची भर पडत असल्याने ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत असते.
ठळक वैशिष्ट्ये :
1.    लांबी: 8.24 किमी (3+3 मार्गिका)
2.    कालावधी :48 महिने
3.    प्रकल्पाची किंमत - 1847.72 कोटी
सद्यस्थिती :
माती परिक्षण, युटिलिटी आयडेंटिफिकेशन (Utility Identification) आणि टेस्ट पाईल्सचे (Test Pile)  कामे पूर्ण झाली आहेत. पाईल फाउंडेशनचे (Pile Foundation) कामे कामप्रगतीपथावरआहेत. 
ठिकाण :
आनंद नगर ते साकेत, ठाणे
प्रकल्पाचे महत्त्व :

  •     सदर प्रकल्पामुळे ठाण्यातील वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे.
  •     सदर प्रकल्पामुळे इंधनाची बचत होणार आहे.
  •     सदर प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.

21)कल्याण बाह्यवळण रस्ता भाग- 8 (रुंदे रस्ता ते गोवेली रस्ता) बांधकाम करणे.

 

  •     प्रस्तावित काम कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र आणि जिल्हा  ठाणे, महाराष्ट्र राज्यात स्थित आहे. 
  •     सेगमेंट मोटागाव-माणकोली रोड जंक्शनपासून मोटागाव गावात सुरू होते आणि गोविंदवाडी बायपास रोडवर संपतो. 
  •     कल्याण बाह्यवळण रस्त्याची संपूर्ण लांबी सुमारे 30.50 कि.मी. व रूंदी 30 मी. ते 45 मी. असुन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार बदलापूर-कटाई रस्त्यावरील हेदुटणे गावापासून पुढे कल्याण शिळ रस्त्यास माणगांव येथे, मध्य लोहमार्गास कोपर रेल्वे स्थानकाजवळ, वसई-दिवा लोहमार्गास गांवदेवी गावाजवळ छेदून ठाकुर्ली, दुर्गाडी पुलापासून उल्हास/काळू नदीस समांतर टिटवाळा पर्यंत आहे.
  •     कल्याण बाह्यवळण रस्ता 8 विभागांमध्ये विभागला गेला आहे. सेगमेंट 4 ते 7 पूर्ण झाले आहेत आणि आता सेगमेंट-3 काम प्रगतीप्रवर आहे.
  •     दि.03/10/2022, 06/07/2023 आणि 24/11/2023 रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत मा. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, भाग आठचे काम हाती घेण्याचे ठरले. 

प्रशासकीय मंजुरी: 

  •     दि.27/06/2014 रोजी झालेल्या प्राधिकरणाच्या 134 व्या बैठकीत ठराव क्र.1304 अन्वये ₹ 3628.51 कोटी इतक्या अंदाजित किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. सदर प्रशासकीय मान्यतेमध्ये ₹ 578 कोटी इतक्या किंमतीच्या कल्याण बाह्यवळण रस्ता (भाग - 1 ते 7) या कामाचा समावेश आहे. 
  •     भाग-3 (मोठागांव पूल ते गोंविदवाडी रस्ता) मधील एकूण 5.86 किमी इतक्या लांबीत रस्ता व उन्नत मार्गाच्या बांधकामाकरीता स्वतंत्रपणे दि.16/11/2021 रोजी झालेल्या प्राधिकरणाच्या 151 व्या बैठकीत ठराव क्र. 1573 अन्वये ₹ 661.36 कोटी इतक्या किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
  •     प्राधिकरणामार्फत पूनरावलोकन (Peer review) करणेकामी मे. टाटा कन्सल्टींग इजिनिअर्स लि. यांची नियुक्ती केली असून त्यानुसार सल्लागाराने तयार केलेले प्रकल्प अंदाजपत्रकांचे पूनरावलोकन करून घेण्यात आले.
  •     त्यामध्ये अंदाजपत्रकीय किंमत ₹39.85कोटी इतकी होत आहे. 

प्रकल्प खर्चाचा व पूर्णत्वाचा तपशील:-

  •   कंत्राटदाराचे नाव :- मे. एन ए  कंस्ट्रक्शन  प्रा. लि 
  •   प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराचे नाव :- मे . टी  जी  पी  प्रोजेक्ट
  •    कामाची  रक्कम- रु. 29.14  कोटी.
  •   कार्यारंभ आदेश- 14/10/2024.
  •    प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी- 18 महिने पावसाळ्यासहित कार्यरंभ आदेशापासून


प्रकल्पाचे वैशिष्टये /फायदे:- 

  •     लांबी: 1.096  कि.मी.,  रुंदी: 30 मी.
  •     भाग 8 चे काम पूर्ण झाल्यास त्या भागात होऊ घातलेल्या समुद्धी महामार्ग, वडोदरा-मुंबई महामार्ग तसेच अतिजलद गतीने दळणवळण होण्यासाठी कल्याण-अहमदनगर हायवे, मुंबई नाशिक हायवे यांना पुरक रस्ता म्हणून बाह्यवळण रस्त्याचा उपयोग होईल.

प्रकल्पाची सद्यस्थिती:-

  •     प्रकल्पाची सर्वसाधारण भौतिक प्रगती – 5%
  •     प्रकल्पाची सर्वसाधारण आर्थिक प्रगती - निरंक.


22)प्रकल्पाचे नाव :- गायमुख ते पायेगाव खाडी पुलाचे डिझाइन आणि बांधकाम करणे.

प्रकल्पाची माहिती :-

  •     मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दि. 05/03/2024 रोजी झालेल्या 156व्या बैठकीत गायमुख ते पायेगाव खाडी पुलाचे डिझाइन आणि बांधकाम या प्रकल्पाच्या प्रस्तावास व यास अपेक्षित रु 1551.18 कोटी इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
  •     सदर उन्नत प्रकल्प रस्त्याचे संरेखन 4-लेन (2 + 2 लेन) 6.506 किमी आहे जे ठाण्यातील गायमुख जवळील ठाणे खाडीपासून सुरू होते आणि पुढे मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल, मल्टीमॉडल कॉरिडॉर (एमएमसी), दिवा-वसई रेल्वे, समर्पित फ्राईट कॉरिडॉर आणि अंजूर चिंचोटी रोडमधून जाते आणि पायेगाव गावाजवळ समाप्त होते.
  •     मे. अशोका बिल्डकॉन लिमिटेड यांची कंत्राटदार म्हणून दि. 14/10/2024  रोजी नियुक्ती करण्यात आली आहे आणि मे. शेलाडिया असोसिएट्स इंक. यांची दि. 14/10/2024  रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये :- 

  •     प्रकल्पाची लांबी : 6.509 कि.मी.
  •     काम पूर्णत्वाचा कालावधी = 42 महिने (संकल्पन / पर्यावरणीय मंजुरीचा कालावधी               12 महिने) + (बांधकामाचा कालावधी 30 महिने)
  •     दोष दायित्व कालावधी : 24 महिने
  •     प्रकल्पाची किंमत : रु. 975.580 कोटी (जीएसटी वगळून)

सद्य:स्थिती :
स्थलाकृतिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. भू-तंत्रज्ञान तपासणी, बार्जेसचे फॅब्रिकेशन, तात्पुरत्या प्रवेश पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.


 23)

प्रकल्पाचे नाव कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे (भाग 3)
प्रशासकीय किंमत रु. 332.05 कोटी
कराराची किंमत रु. 63.64 कोटी
रस्त्याची लांबी 4.672 किमी
मार्गिका क्र. 02
रस्त्याचा प्रकार काँक्रीटकरण + डांबरीकरण
ठेकेदाराचे नाव मे. बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि.
सल्लागाराचे नाव मे. माहिमतुरा कंन्सल्टंट प्रा. लि.
कार्यादेशाची सुरुवात 26/12/2022
प्रकल्पाचे फायदे
  • वाहतुकीचा खोळंबा कमी होईल आणि प्रवासाचा वेळ 20 मिनिटे होईल
  • वेळ व इंधनाची बचत होईल
  • खड्डेमुक्त रस्ता उपलब्ध होईल
  • कमी देखभाल खर्च
सद्य:स्थिती काम प्रगतीपथावर आहे (94%)
स्थळ कल्याण पूर्व आणि डोंबिवली पश्चिम

24)प्रकल्पाचे नाव:ऐरोली काटई नाका उन्नत मार्गावर ठाणे-बेलापूर मार्गावरून चढणे व उतरणेकरीता अप आणि डाऊन आर्म मार्गिकांचे आराखडा व बांधकाम.

प्रकल्प माहिती:

  •  अप रॅम्पची लांबी – ५२१.६० मीटर
  •  डाऊन रॅम्पची लांबी – ३४०.०० मीटर
  •  रस्त्याची रुंदी – ७.५० मीटर
  •  लेनची संख्या – २ 
  •  प्रकल्प खर्च – ₹४९.९० कोटी
  •  सुधारित खर्च – ₹५९.७९ कोटी

प्रकल्पाची  सद्यस्थिती:

  •  भौतिक प्रगती : ३०.०० % पूर्ण
  •  आर्थिक प्रगती : २७.४० % पूर्ण
  • अपेक्षित पूर्णता दिनांक:
  •   ३१ मार्च २०२६.

प्रमुख प्रकल्प वैशिष्ट्ये:

  •     ठाणे-बेलापूर रोडवरून मुलुंडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी चढण्याच्या मार्गिकेमुळे अखंड आणि सुरळीत     वाहतूक सुनिश्चित करणे.
  •     ऐरोली आणि ऐरोली –काटई नाका फ्लायओव्हर दरम्यान थेट आणि अखंड जोडणी व्यवस्था प्रदान करणे, जे वाहनांना मुलुंडकडून येताना किंवा जाताना उपयुक्त ठरेल.

 
प्रमुख प्रकल्प अडचणी:

  •  चढण्या-उतरण्या करिताच्या मार्गिकेचे काम हे काम ठाणे-बेलापूर रोडवरील अतिवाहनदाब असलेल्या परिसरात सुरू आहे.
  •  चढण्या-उतरण्या करिताच्या मार्गिकेचे स्टील वक्र गर्डर लाँचिंग हे ठाणे-बेलापूर रोडसारख्या अतिव्यस्त मार्गावर केले जाणार आहे.


25)कल्याण बाह्यवळण रस्ता (भाग 3 मोटागांव पूल ते गोंविदवाडी बायपास)

कल्याण बाह्यवळण रस्ता हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास आराखड्याप्रमाणे  बदलापूर कटाई रस्त्यावरील मौजे. हेदुटणे पासून सुरु होतो, मौजे. भोपर जवळील शिळ-कल्याण-भिवंडी रस्ता, दिवा वसई रेल्वे लाईन, कोपर स्टेशन जवळ मध्य रेल्वे, मोठागांव माणकोली जोडरस्ता ओलांडून उल्हास नदीच्या कडेने शिळ-कल्याण-भिवंडी रस्त्यावरील दुर्गाडी पूल जवळून टिटवाळा येथे समाप्त होतो.
सध्या पडघा नाशिक राष्ट्रीय महामार्गावरुन तसेच गुजरात राज्यातून पुणे व कर्नाटकच्या दिशेने जाणारी व येणारी वाहतूक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत रस्त्यावरुन जाते. सदर वाहतूक नवीन कल्याण बाह्यवळण रस्त्यावर वळवून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अंतर्गत वाहतूकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. 

दुर्गाडी चौक ते टिटवाळा दरम्यान (16.4 किमी.) रस्त्याचे बांधकाम हाती घेतले होते. त्यापैकी 12 किमी इतक्या लांबीत (कडोंमपाने उपलब्ध करुन दिलेल्या जागेनुसार) रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आलेले आहे. मोटागांव पूल ते गोंविदवाडी बायपास दरम्यान रस्त्याच्या बांधकामासाठी कंत्राटदारास कार्यारंभ आदेश (भाग-3) दि.12/12/2023 रोजी देण्यात आले असून काम प्रगतीपथावर आहे.सदर बांधकाम 36 महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. बदलापूर कटाई रोड ते मोटागांव पुलापर्यंत (भाग-1 व 2) रस्त्याचे काम भविष्यामध्ये हाती घेण्याचे नियोजन आहे. भाग 8 (भाग- 7 पासून टिटवाळा ते गोवेली रस्त्यापर्यंत) हाती घेण्यात आले असुन प्रक्ल्प  व्यवस्थापन सल्लागार व कत्रांटदारा साठी निविदा  मागविण्यात आल्या आहेत. 

    प्रकल्पाचे फायदे:-

  •     रस्ता जोडणी: काटई बदलापूर रस्ता, कल्याण शिळ रस्ता व शिळ पनवेल रस्त्यापासून राष्ट्रीय महामार्ग 3 पर्यंत, ज्यामुळे कडोंमपाच्या अंतर्गत रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होणे अपेक्षित.
  •     वाहतुकीच्या वेळेत होणारी बचत: 30 मिनिटे अपेक्षित.

    प्रकल्पाची वैशिष्टये:-

  •     लांबी: जमीनीवरील रस्ता: 3.58 कि.मी.
  •          स्टील्ट रस्ता:  2.28 कि.मी.
  •          एकूण रस्ता:  5.86 कि.मी.
  •     रुंदी: 45/30 मी.
  •     2+2 मार्गिका डांबरीकरण आणि उर्वरित मार्गिकेच्या जागेत मुरुम भरणी.
  •     रस्त्याच्या दोन्हीकडेला पर्जन्यवाहिन्या.
  •     रस्त्याच्या दोन्ही बाजूस पदपथ.

    प्रकल्प खर्चाचा व पूर्णत्वाचा तपशील:-

  •     प्रशासकीय मान्यता रक्कम रु. 661.36 कोटी.
  •     निविदा रक्कम- रु. 598.12  कोटी.
  •     कार्यारंभ आदेश- 12/12/2023.
  •     प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी- 36 महिने पावसाळ्यासहित कार्यरंभ आदेशापासून.
  •     प्रकल्प पूर्ण होण्याची सुधारीत दि.- 12/12/2026.
  •     कंत्राटदाराचे नाव :- मे.'ऋत्विक आरपीएस (संयुक्त उपक्रम).
  •     प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराचे नाव :- मे .टेक्नोजम कन्सल्टन्ट प्रा. लि.

    प्रकल्पाची सद्यस्थिती:-

  •     प्रकल्पाची सर्वसाधारण भौतिक प्रगती  - 15%
  •     प्रकल्पाची सर्वसाधारण आर्थिक प्रगती - 13 % 

26)प्रकल्पाचे नाव: राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर शिळफाटा येथे उड्डाणपूल तसेच कल्याण फाटा येथे उड्डाणपूलाचे बांधकाम.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 (जुना मुंबई पुणे महामार्ग) वर शिळफाटा जंक्शन व कल्याण फाटा जंक्शन येथे उड्डाणपूलाचे काम हाती घेण्यात आलेले आहे.
  
    प्रकल्पाचे फायदे :-
सदर प्रकल्पामुळे मुंब्रा वाय जंक्शन ते कल्याण फाटा तसेच कल्याण डोंबिवलीवरुन नवी मुंबई यादिशेकडील वाहतुक कोंडी सोडविण्यास मदत होणार आहे. सदर प्रकल्पामुळे कल्याण – डोंबिवली आणि नवी मुंबईमधील अंतर 7 कि.मी. ने कमी होईल त्यामुळे 15 मिनिटांच्या वेळेत बचत होईल. सध्या जेएनपीटीकडून गुजरातकडे येणारी जड कंटेनरची वाहतूक आणि कल्याण-डोंबिवलीकडून मुंबईकडे येणारी वाहतूक महापे मार्गे आहे. त्यामुळे पनवेलच्या बाजूने तसेच कल्याणच्या बाजूने प्रचंड वाहतूक कोंडी होते ती कमी होण्यास मदत होणार आहे.
    प्रकल्पाची वैशिष्टये:-

  •     कल्याण फाटा जंक्शन: 1) लांबी : 2394.04 मी.  2)  रुंदी : 12.00 मी. (2+2 पदरी)
  •     शिळ फाटा जंक्शन: 1) लांबी : 786.50 मी.  2)  रुंदी : 24.20 मी. (3 + 3 पदरी)
  •     प्रकल्प खर्चाचा पूर्णत्वाचा तपशिल :-
  •     प्रशासकीय मान्यता                       :- रु. 410 कोटी
  •     प्रकल्प अंमलबजावणीकरिता नियुक्त कंत्राटदार :- मे. एस. एम. सी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.
  •     कार्यारंभाचे आदेश                                         :- दि. 09/04/2021
  •     निविदा रक्कम                                               :- रु. 191.17 कोटी
  •     प्रकल्प पूर्व होण्याचा कालावधी                         :- 30 महिने
  •     प्रकल्प पूर्ण होण्याची सुधारित तारीख                 :- दि. 30/06/2025

    प्रकल्पाची सद्यस्थिती: 
कंत्राटदाराने मेट्रो लाईन 14 च्या कल्याण फाटा उड्डाणपूलाशी जोडणीचा संरेखन सादर केला आहे, जो मेट्रो लाईन-14 च्या डी.पी.आर सल्लागार आणि वाहतूक आणि दळणवळण विभाग (एमएमआरडीए) यांच्याकडून छाननीत आहे.

    शिळ फाटा जंक्शन- प्रकल्पाची सर्वसाधारण भौतिक प्रगती  :- 99.20%  
                               प्रकल्पाची सर्वसाधारणआर्थिक प्रगती  :- 99.99% 
डावी बाजू वाहतूकीसाठी खूली करण्याचे दि.12/02/2024 
उजवी बाजू वाहतूकीसाठी खूली करण्याचे दि.03/05/2024

    कल्याण फाटा जंक्शन- प्रकल्पाची सर्वसाधारण भौतिक प्रगती  :- 20%  
                                   प्रकल्पाची सर्वसाधारण आर्थिक प्रगती  :- 13.59%  

 

27) प्रकल्पाचे नाव शिवडी वरळी उन्नत मार्गाचे बांधकाम.

प्रकल्पाचे सक्षिप्त माहिती 

  •     मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने अटल सेतू वरुन येणारी वाहतुकीचा प्रसार प्रणालीचा एक भाग म्हणून शिवडी वरळी उन्नत मार्ग हा दुवा प्रधान करेल.
  •     सदर उन्नत मार्ग हा चार पदरी आहे.
  •     हा प्रकल्प अटल सेतूला वांद्रे वरळी सागरी मार्ग आणि मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील किनारी रस्ता प्रकल्पाशी थेट जोडला जाईल

प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्ये

  •     कामाचा कार्यारंभ आदेश- १३जानेवारी २०२१.
  •     उन्नतमार्गाची एकूण लांबी- ५.९६४ कि.मी 
  •     उन्नतमार्गाची एकूण रुंदी- १७ मी. 
  •     वेगमर्यादा- ८० कि.मी/प्रती तास 
  •     सुपरस्ट्रक्चरचा प्रकार- सेंगमेंटल
  •     ओबिलिगेटरीस्पॅनचा प्रकार- स्टीलकंपोझिट
  •     शिवडी येथील रेल्वे उड्डाणपुलाची एकुण लांबी- ८१.११७ मी
  •     एलिफिन्स्टन येथीलरेल्वे उड्डाणपुलाची एकुण लांबी- १३२.२०० मी

प्रकल्पाची किंमत रु. 

  •     सुधारित प्रशासकीय मंजुरी खर्च २२८३.५३ कोटी.
  •     कंत्राट खर्च १०५१.८६ कोटी.
  •     आरओबी खर्च २१४ कोटी.
  •     कंत्राटदार मेसर्स जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड.
  •     पीएमसी मेसर्स असिस्टम स्टूप

सद्यस्थिती

  •     भौतिक प्रगती ६१%
  •     आर्थिक प्रगती  59%

प्रकल्पाचे फायदे

  •     या प्रकल्पामुळे अटल सेतू आणि वांद्रे वरळी सागरी मार्ग जोडले जातील. 
  •     हा उन्नत मार्ग पूर्णपणे सिग्नल फ्रि प्रवास प्रधान करेल.
  •     या प्रकल्पामुळे नवी मुंबई आणि दक्षिण मुंबई ला जाणार्या-येणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची बचत होऊन त्यांना  त्रास मुक्त प्रवास प्रधान करेल.
  •     पश्चिम उपनगरातील प्रवासी गोवा आणि दक्षिण भारताकडे जाण्याकरीता वांद्रे वरळी सागरी मार्ग - शिवडी वरळी उन्नत मार्ग आणि अटल सेतू याचा वापर करतील. 
  •     शिवडी वरळी उन्नत मार्ग हा अटल सेतू करीता एकुण 15% वाहतूकीचे योगदान देईल.
  •     दररोज सुमारे ३५००० ते ४५००० वाहनधारकांना हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर फायदे होईल. 
  •     वेळ आणि इंधन ह्या मध्ये लक्षणीय बचत होऊन नागरिकांचा एकूण प्रवास सुखकर होईल.

28)

प्रकल्पाचे नाव कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे (भाग 5)
प्रकल्पाचे संक्षिप्त वर्णन आणि वैशिष्ट्ये प्रकल्पाचा तपशील:
प्रशासकीय किंमत: ₹ 332.05 कोटी
कराराची किंमत: ₹ 76.03 कोटी
रस्त्याची लांबी: 4.890 किमी
मार्गिका क्रमांक: 02
काँक्रीटकरण + डांबरीकरण

कराराचा तपशील:
ठेकेदाराचे नाव: मे. आर. ई. इन्फ्रा प्रा. लि.
सल्लागाराचे नाव: मे. पेन्टॅकल कन्सल्टंट इंडिया प्रा. लि.
कार्यादेश आरंभ: दि. 22/12/2022
प्रकल्पाचे फायदे वाहतुकीचा खोळंबा कमी होईल आणि प्रवास 20 मी. होईल
वेळ व इंधनाची बचत होईल.
खड्डेमुक्त रस्ता
कमी देखभाल
सद्य:स्थिती काम प्रगतीपथावर आहे. (87%)
स्थळ कल्याण, टिटवाळा आणि उल्हासनगर

 29)

प्रकल्पाचे नाव कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे (भाग 4)
प्रकल्पाचे संक्षिप्त वर्णन आणि वैशिष्ट्ये प्रकल्पाचा तपशील:
प्रशासकीय किंमत: ₹ 66.87 कोटी
कराराची किंमत: ₹ 66.87 कोटी
रस्त्याची लांबी: 6.8 किमी
मार्गिका क्रमांक: 02
काँक्रीटकरण + डांबरीकरण

कराराचा तपशील:
ठेकेदाराचे नाव: मे. ईगल इन्फ्रा इं. प्रा. लि.
सल्लागाराचे नाव: मे. कंम्पोझिट कंम्बाईन टेक्नोक्रॅटस प्रा. लि.
कार्यादेश आरंभ: दि. 27/12/2022
प्रकल्पाचे फायदे वाहतुकीचा खोळंबा कमी होईल आणि प्रवास 20 मी. होईल
वेळ व इंधनाची बचत होईल
खड्डेमुक्त रस्ता
कमी देखभाल
सद्य:स्थिती काम प्रगतीपथावर आहे. (90%)
स्थळ कल्याण

 30)

प्रकल्पाचे नाव कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे (भाग 2 )
प्रकल्पाचे संक्षिप्त वर्णन आणि वैशिष्ट्ये प्रकल्पाचा तपशील:
प्रशासकीय किंमत : रु. 332.05 कोटी
कराराची किंमत : रु. 62.63 कोटी
रस्त्याची लांबी : 4.008 किमी
मार्गिका क्र. : 02
काँक्रीटकरण + डांबरीकरण
कराराचा तपशील : ठेकेदाराचे नाव : मे. आर.पी.एस इन्फ्राप्रोजेक्टस प्रा. लि.
सल्लागाराचे नाव : मे. पेन्टॅकल कन्सल्टंट इंडिया प्रा. लि
कार्यादेश आरंभ : दि. 26/12/2022
प्रकल्पाचे फायदे: वाहतुकीचा खोळंबा कमी होईल आणि प्रवास 20 मी. होईल
वेळ व इंधनाची बचत होईल.
खड्डेमुक्त रस्ता
कमी देखभाल
सद्य:स्थिती काम प्रगतीपथावर आहे. (97%)
स्थळ डोंबिवली पूर्व

 31)

प्रकल्पाचे नाव कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे (भाग 1)
प्रकल्पाचे संक्षिप्त वर्णन आणि वैशिष्ट्ये प्रकल्पाचा तपशील:
प्रशासकीय किंमत : रु. 332.05 कोटी
कराराची किंमत : रु. 77.74 कोटी
रस्त्याची लांबी : 6.056 किमी
मार्गिका क्र. : 02
काँक्रीटकरण + डांबरीकरण
कराराचा तपशील : ठेकेदाराचे नाव : मे. अश्विनी इन्फ्राडेव्हलपमेंट प्रा. लि.
सल्लागाराचे नाव : मे. माहिमतुरा कन्सल्टंट प्रा. लि.
कार्यादेश आरंभ : दि. 21/12/2022
प्रकल्पाचे फायदे: वाहतुकीचा खोळंबा कमी होईल आणि प्रवास 20 मी. होईल
वेळ व इंधनाची बचत होईल.
खड्डेमुक्त रस्ता
कमी देखभाल
सद्य:स्थिती काम प्रगतीपथावर आहे. (84%)
स्थळ कल्याण

32)  कोलशेत ते काल्हेर खाडीपुलाचे बांधकाम करणे.


प्रकल्पाची माहिती: 

  •     प्रकल्पाची एकूण लांबी: 1640 मी. आणि रुंदी 23.60 मी.
  •     प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याचा कालावधी : 36 महिने 
  •     प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता प्राप्त किंमत रु. 544 कोटी.


प्रकल्पाची मुख्य वैशिष्टये:
    कोलशेत ठाणे आणि ठाणेमधील काल्हेर भिंवडी दरम्यानची प्रस्तावित मिसींग लिंक आहे. काल्हेर गाव जुना आग्रा रोडशी जोडलेले असून सदर परिसर औद्योगिक क्षेत्र आहे. सद्यस्थितीत कोलशेत ते काल्हेर (कोलशेत-कापूरबावडी-बाळकुम-कशेळी-काल्हेर) ह्या 8.50 किमी अंतरासाठी सुमारे पाऊण तास कालावधी लागत आहे.

प्रकल्पाची सद्यस्थिती :
प्राथमिक सर्वेक्षण कार्य प्रगतीत आहे.  भूसंपादन, वन मंजुरी, कोस्टल रेग्युलेशन झोन, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि बी एम सी पाणी पाईप लाईन मंजुरी यांचे परवानग्या घेण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

प्रकल्पाचे फायदे : 
1) सद्यस्थितीत कोलशेत ते काल्हेर ह्या अंतरासाठी पाऊण तास कालावधी लागत असून प्रकल्पामुळे प्रवासाचे अंतर केवळ 5 ते 7 मिनिटे होणार आहे. 
2) इंधनाची व वेळेची बचत होणार आहे.              
3) प्रकल्पामुळे प्रवास जलद होणार आहे.

 

33)

प्रकल्पाचे नाव कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 03 रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे.
प्रकल्पाचे संक्षिप्त वर्णन आणि वैशिष्ट्ये प्रकल्पाचा तपशील:
प्रशासकीय किंमत : रु. 25.00 कोटी
कराराची किंमत : रु. 18.99 कोटी
रस्त्याची लांबी : 1675 किमी
मार्गिका क्र. : 02
काँक्रीटकरण + डांबरीकरण
कराराचा तपशील : ठेकेदाराचे नाव : मे. यशराज इन्फ्रास्ट्रक्चर्स
कार्यादेश आरंभ : दि. 15/10/2024
प्रकल्पाचे फायदे: वाहतुकीचा खोळंबा कमी होईल आणि प्रवास 20 मी. होईल
वेळ व इंधनाची बचत होईल.
खड्डेमुक्त रस्ता
कमी देखभाल
सद्य:स्थिती काम प्रगतीपथावर आहे. (35%)
स्थळ कल्याण

 

34)सांताक्रुझ-चेंबुर जोडरस्त्याचे वाकोला जं., आंबेडकर चौक/युनिर्व्हसिटी जं. व बीकेसी जं. मिळून मिठी नदी ते वाकोला पुलाला जोडणारा उन्नत मार्ग बांधणे व MTNL जं., बीकेसी ते एलबीएस मार्ग उड्डाण पुलाला जोडणारा उन्नत मार्ग बांधणे.

प्रकल्प माहितीः

मुंबई नागरी सुविधा प्रकल्पांतर्गत (MUIP) अंतर्गत सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR) ची योजना आखण्यात आली आहे जेणेकरून बांद्रे कुर्ला संकुलनातील प्रमुख व्यावसायिक केंद्रातील वाहतुकीच्या आवश्यक प्रवाहाला आधार देण्यासाठी पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी असेल. सदर उन्नत मार्ग पश्चिम द्रुतगती महामार्ग व पुर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडत आहे. यामध्ये चार चौकांचा समावेश होतो, म्हणजे बांद्रे कुर्ला संकुल जंक्शन, युनिव्हर्सिटी जंक्शन, डॉ. आंबेडकर चौक, वाकोला जंक्शन याशिवाय बीकेसी मधून चढण्याकरिता एमटीएनएल जंक्शन येथून लालबहादूर शास्त्री मार्गावरील फ्लायओव्हरला जोडणारी मार्गाका यांचाही  समावेश आहे. 

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला जंक्शनवर केबल स्टे ब्रीज:

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सिग्नल मुक्त पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी आणि नवी मुंबई, पुर्व द्रुतगती महामार्ग आणि बीकेसी कडून विमानतळाकडे येणाऱ्या वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासाठी केबल स्टे ब्रीज बांधला आहे. या ब्रीजमध्ये 215 मीटर लांबीचा स्पॅन. आहे. सदर भाग सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड भाग-1 प्रकल्पाचा एक भाग आहे. तसेच हा दक्षिण आशियातील 100 मीटर त्रिज्येची वक्रता असलेला पहिलाच केबल स्टे ब्रीज आहे. ज्यामध्ये ऑथॉट्रॉफिक स्टील डेकचा समावेश आहे. सदर ब्रीज जमिनीपासून सुमारे 25 मीटर उंचीवर असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला फ्लायओव्हर वरून जातो व पुढे सांताक्रुझ येथील पानबाई इंटरनॅशनल स्कूलजवळ उतरतो. 

ब्रीजमधील केबलस्टे ब्रीजच्या सुपरस्ट्क्चरचा भार केबलद्वारे 'वाय 'आकाराच्या एका पायलॉनवर हस्तांतरीत होत असल्याने ब्रीजच्या-पिअर्सची  संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. केबल स्टे ब्रीजची रुदी १०.५० मी. ते 17.20  मी. पर्यंत असून हा दोन लेनचा ब्रीज आहे. 

अ.क्र प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये Details
1 प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मे.पॅडेको कंपनी लिमिटेड.
2 प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मे.जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड.
3 उन्नत मार्गाची लांबी
  • अ) एम.टी.एन.एल.आर्म –बीकेसी ते एलबीएस फ्लायओव्हर पर्यंत 2 लेन – 1.2 किमी (दुसरा स्तर) (दि. 10.02.2023 रोजी वाहतुकीसाठी खुला)
  • ब) फॉरेन्सिक लॅबोरेटरी ते कपाडियानगर कुर्ला पर्यंत 4 लेन – 1.65 किमी आणि कपाडिया नगर ते वाकोला डाउन रॅम्प 2 लेन – 1.0 किमी (दि. 13.04.2023 रोजी वाहतुकीसाठी खुले)
4 वाहतुकीसाठी खुली करावयाची लांबी मुंबई विद्यापीठ (नॉर्थगेट) पासून पानबाई इंटरनॅशनल स्कूल पर्यंत (2 लेन) – 1.66 किमी. (दुसरा स्तर)
5 प्रवासाचा वेळ 45 मिनिटे बचत तसेच इंधनाचीही बचत होणार
6 फाउंडेशनचा प्रकार पाइलफाउंडेशन /ओपन फाउंडेशन.
7 सब स्ट्रक्चरचा प्रकार आरसीसी पियर (सिंगल सेंट्रल / कॅन्टिलिव्हर / पोर्टल) केबल स्टेसाठी पायलॉन
8 सुपरस्ट्रक्चरचा प्रकार- आरसीसीसेगमेंटल बॉक्स गर्डर / स्टील कंपोझिट / ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक.
9 प्रकल्पाची किंमत: रु .670 कोटी
10 प्रकल्प सुरू होण्याची तारीख 27 ऑक्टोबर 2016
11 पूर्ण होण्याची तारीख जुलै 2025
12 प्रकल्पाची एकूण भौतिक प्रगती 100%
13 प्रकल्पाची आर्थिक प्रगती 96%

35)भारत डायमंड बोर्‍स कंपनी, युनिव्हर्सिटी ते वाकोला जंक्शन दरम्यान उभारण्यात येणाऱ्या एलिवेटेड कॉरिडॉरचे डिझाईन व बांधकाम (भाग-2 ).

प्रकल्प माहितीः

BKC (बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स) येथील व्यापारी संकुलांचा झपाट्याने विकास होत आहे. ICICI बँक, देना बँक, वॉकहार्ट, रिलायन्सचे आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र, भारत डायमंड बोर्‍स, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, स्टेट बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, यूएस कौन्सुलेट इत्यादी अनेक महत्त्वाच्या कॉर्पोरेट कार्यालयांनी येथे आपली मुख्य कार्यालये स्थापन केली आहेत.

शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे BKC कडे सर्व दिशांमधून वाहतूक एकवटते. त्यामुळे BKC परिसरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक लवकरच त्यांच्या वहनक्षमतेच्या मर्यादेला पोहोचली आहे. म्हणूनच, BKC ला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे व वेस्टर्न एक्सप्रेस हायवे यांच्याशी थेट जोडण्यासाठी एलिवेटेड कॉरिडॉर (उन्नत मार्गिका) उभारणे आवश्यक झाले आहे.

मुंबई अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट (MUIP) अंतर्गत ही गरज आधीच ओळखून, सांताक्रूझ-चेंfबूर लिंक रोड (SCLR) वर BKC जंक्शन, युनिव्हर्सिटी जंक्शन, डॉ. आंबेडकर चौक, वाकोला जंक्शन तसेच MTNL जंक्शन यांना जोडणारा एलिवेटेड रोड प्रस्तावित करण्यात आला आहे.

प्रगत वाहतूक अभ्यासाने हे अधोरेखित केले आहे की BKC या प्रमुख व्यापारी केंद्रासाठी पूर्व-पश्चिम वाहतुकीची सुलभता सुनिश्चित करण्यासाठी हा एलिवेटेड कॉरिडॉर अत्यावश्यक आहे..

अ.क्र प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये Details
1 पसंचालक संस्था मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA)
2 प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मे.पॅडेको कंपनी लिमिटेड.
3 प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार मे.जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड.
4 जोडणी (Connectivity): मभारत डायमंड बोर्‍स, BKC पासून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंत
5 पएलिवेटेड रस्त्याची लांबी:
  • भारत नगर ते युनिव्हर्सिटी गेट क्र. 2 (4 लेन): 0.50 किमी (रुंदी: 17.2 मीटर)
  • युनिव्हर्सिटी गेट क्र. 2 ते SCLR फेज-I व वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (2 लेन): 0.90 किमी (रुंदी: 8.5 मीटर) एकूण लांबी: 1.40 किमी
6 प्रवास वेळेत बचत सुमारे 35 मिनिटे
7 पायाभरणीचा प्रकार पाईल फाउंडेशन / रॅम्प भागात रिटेनिंग वॉल
8 उपसंरचनेचा प्रकार RCC पिअर (सिंगल सेंट्रल / कँटिलिव्हर / पोर्टल)
9 सुपरस्ट्रक्चरचा प्रकार RCC PSCI गर्डर / स्टील कॉम्पोझिट स्पॅन
10 पनिविदा लावलेला खर्च (Tendered Cost): ₹245.91 कोटी
11 मूळ निविदा खर्च ₹220.89 कोटी (10.17% नी कमी दर)
12 सुधारित खर्च ₹191.88 कोटी
13 पप्रकल्प सुरू झाल्याची तारीख 18 ऑक्टोबर, 2017
14 काम पूर्ण करण्याचा निर्धारित कालावधी 30 महिने
15 काम पूर्ण होण्याची तारीख 31 डिसेंबर, 2025 (EOT – अतिरिक्त मुदत मंजूर)
16 सद्यस्थिती
  • भौतिक प्रगती: 75%
  • आर्थिक प्रगती: 73%
17 स्थान भारत नगर, BKC — वाकोला नाल्याच्या समांतर

36)मुंबई पारबंदर ते मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचे बांधकाम

प्रकल्पाची माहिती :-

मुंबई पारबंदर प्रकल्प चिर्ले येथून मुंबई-पुणे महामार्गात थेट जोडणी करणे, JNPT ते पनवेल मार्गावरील वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हा पर्यायी मार्ग आहे. पुणे-गोवा कडून येणारी व जाणारी वाहतूक बिना अडथळा मुंबई पारबंदर प्रकल्पावरुन होईल.

अ) प्रकल्पाची वैशिष्ट्ये :-

प्रस्तावित प्रकल्पामध्ये 6 पदरी पुलाचा समावेश असून सदर प्रकल्पनवी मुंबई एमटीएचएल (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) कनेक्टर, विशेषता चिर्ले आणि पळस्पे येथे. हा व्यापक एमटीएचएल प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याचा उद्देश मुंबईला नवी मुंबईशी अधिक कार्यक्षमतेने जोडणे आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) ला विद्यमान पायाभूत सुविधांशी जोडण्यासाठी डिझाइन केलेल्या रस्त्यांच्या जाळ्यातील चिर्ले आणि पळस्पे विभाग हे महत्त्वाचे बिंदू आहेत.

1. चिर्ले:

चिर्ले परिसर येणाऱ्या विमानतळाजवळ स्थित आहे आणि प्रवासी आणि मालवाहतूक दोन्हीसाठी सुरळीत कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करून विकसित केला जात आहे. या प्रदेशातील एमटीएचएल कनेक्टरमध्ये रस्ते, पूल आणि इंटरचेंज बांधणे समाविष्ट आहे, जे नवी मुंबई आणि मुंबईच्या इतर भागांमधील कार्यक्षम वाहतूक प्रवाह सुनिश्चित करेल.

2. पळस्पे:

पळस्पे परिसर हा कनेक्टरमधील आणखी एक महत्त्वाचा बिंदू आहे, जो एमटीएचएलला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेशी जोडतो. दोन्ही शहरांमधील वाहतुकीची हालचाल सुव्यवस्थित करण्यासाठी, गर्दी कमी करण्यासाठी आणि विमानतळासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी हा विभाग महत्त्वाचा आहे. चिर्ले आणि पळस्पे येथील हे कनेक्टर्स एकत्रितपणे प्रवासाच्या वेळेत लक्षणीय सुधारणा करतील, गर्दी कमी करतील आणि नवी मुंबई प्रदेशात आर्थिक संधी वाढवतील, जे या क्षेत्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतील.

ब) प्रकल्पाचे फायदे:

नवी मुंबई एमटीएचएल कनेक्टर प्रकल्पाच्या फायद्यांमध्ये चिर्ले आणि पळस्पे सारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महत्त्वाच्या रस्ते पायाभूत सुविधांचा विकास समाविष्ट आहे. प्रकल्पाच्या प्रमुख घटकांमध्ये हे समाविष्ट आहे:

1. पूल आणि उन्नत रस्ते:

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचे आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह प्रमुख ठिकाणांना जोडण्यासाठी उन्नत रस्ते आणि पूल बांधणे.

2. इंटरचेंजे: सुरळीत वाहतूक प्रवाहासाठी इंटरचेंजेसचा विकास, अडथळे कमी करणे आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये चांगली प्रवेश सुनिश्चित करणे.

3. वाहतूक व्यवस्थापनः वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना, दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ २० मिनिटांवरून अंदाजे 30 मिनिटांपर्यंत कमी करणे,

4.पर्यावरणीय बाबीः पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न. ज्यामध्ये पर्यावरणपूरक बांधकाम पद्धती आणि स्थानिक परिसंस्थांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजनांचा समावेश आहे.

5.आर्थिक वाढः हा प्रकल्प नवी मुंबईच्या विकासाला पाठिंबा देईल, विमानतळापर्यंत पोहोच वाढवेल आणि या प्रदेशात व्यापार आणि वाणिज्य वाढवेल.

एकंदरीत, या प्रकल्पाचे उद्दिष्ट प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारणे, वाहतूक कोडी कमी करणे, आर्थिक क्रियाकलापांना चालना देणे आणि या क्षेत्रातील भविष्यातील वाढीसाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रदान करणे आहे.

प्रकल्पाचा तपशील :

सदर प्रकल्पासाठी रु. 1420 कोटी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच रु. 1120.75 कोटी इतकी कंत्राटीय किंमत असून लांबी 7.35 किमी व रुंदी 11.5+ 11.5 मी. (6 पदरी) इतकी आहे.

प्रकल्पाची सद्यस्थिती:

सद्यस्थितीत दि. 15 ऑगस्ट, 2024 रोजी कंत्राटदाराची नियुक्ती करून कामचे कार्यादेश देण्यात आले संपूर्ण प्रकल्पाच्या लांबीसाठी भू-तांत्रिक तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. विले विभागातमध्ये कास्टींग यार्ड आणि साईट ऑफिसची स्थापना प्रगतीपथावर आहे. चिले भागातील सेवा रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. दि. 25 ऑक्टोबर, 2024 रोजी प्रकल्पाच्या बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. 176 ठिकाणांपैकी, 55 ठिकाणी पायाभरणी, 35 ठिकाणी खांब आणि 8 ठिकाणी खांब टोप्या बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. याव्यतिरिक्त, 830 प्रीकास्ट गर्डरपैकी 125 पूर्ण झाले आहेतसदर प्रकल्प माहे फब्रुवारी, 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

37)कलानगर उड्डाणपुलाचे डिझाईन व बांधकाम

प्रकल्पाची वैशिष्टये: -

  • वरळी सी लिंक, पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी आणि वांद्रे-कुर्ला संकुलातून येणाऱ्या वाहतुकीमुळे कलानगर जंक्शन हे दिवसेंदिवस वर्दळीचे ठिकाण आहे.
  • याकामामध्ये वांद्रे-कुर्ला सकंलातून वरळी सी लिंक च्या दिशेने जाणारी व येणारी तसेच धारावी कडून वरळी सी लिंकच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपूलाचा समावेश आहे.
  • कलानगर जंक्शनवरील या उड्डाणपूलामुळे जंक्शनवरील वाहतुक सुरळीत होण्यास तसेच वेळेत 10 मिनिटांची बचत होईल.

प्रकल्पाचा तपशील:

a) पुलांची एकूण लांबी: आर्म B (BWSL to BKC) 804 मी., आर्म C (BKC to BWSL) 653 मी., आर्म D (Dharavi to BWSL) 340 मी.

b)पुलांची एकूण लांबी: आर्म B (BWSL to BKC) 804 मी., आर्म C (BKC to BWSL) 653 मी., आर्म D (Dharavi to BWSL) 340 मी. पुलांची रुंदी: आर्म B व आर्म C 9.9 मी. प्रत्येकी आर्म आणि आर्म D 8.5 मी

  • प्रशासकीय मंजुरी : रु. 163.08 कोटी
  • सुधारित अंदाजित खर्च : रु. 90.53 कोटी
  • कार्यारंभ आदेश : दि. 02/01/2017.
  • कामाचा कालावधी : 30 महिने
  • प्रकल्पाचा संरचना
  • कंत्राटदार : मे सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि मे. आर.पी.एस इन्फ्राप्रोजेक्टस् प्रा.लि.
  • सल्लागार : मे. पडेको इंडिया लि.

सद्यस्थिती:

  • आर्म C चे काम पूर्ण झाले असून दिनांक 21/02/2021 पासून वाहतुकीस खुले करण्यात आले आहे.
  • आर्म B चे काम पूर्ण झाले असून दिनांक 28/06/2021 पासून वाहतुकीस खुले करण्यात आले आहे.
  • आर्म D चे काम पूर्ण झाले असून दिनांक 14/08/2025 पासून वाहतुकीस खुले करण्यात आले आहे.
Engineering Category
×

Rate Your Experience