प्रकल्पाची माहिती
सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
403 द.ल.ली प्रतिदिन सुर्या प्रादेशिक जलपुरवठा योजना हा मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, जो प्रादेशिक पातळीवर घाऊक प्रमाणात जलपुरवठा प्रणाली निर्माण व अंमलात आणण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प पश्चिम उप-क्षेत्रातील, म्हणजेच मिरा-भाईंदर महानगरपालिका, वसई विरार शहर महानगरपालिका व पालघर जिल्ह्यातील 44 गावांना घाऊक प्रमाणात पाणी पुरवठा करण्यासाठी राबवण्यात येत आहे.
प्रकल्पाचे स्थान
- पाण्याचा स्त्रोत: सुर्या धरण, गाव: धामणी, तालुका: जव्हार
- उदंचन केंद्र: गाव: कवडस, तालुका: विक्रमगड, जिल्हा: पालघर
- जल शुद्धीकरण केंद्र: गाव: वेती, तालुका: डहाणू, जिल्हा: पालघर
- इतर पायाभूत सुविधा: जल शुद्धीकरण केंद्र ते वसई विरार आणि मिरा-भाईंदर शहरापर्यंत विस्तारित
लाभार्थी व पाणी पुरवठा तपशील
| अनु क्र. | लाभार्थी | सद्यस्थितीत लोकसंख्या (म.न.पा. कडून प्राप्त माहिती नुसार) |
सद्यस्थितीत पाण्याची मागणी (द.ल.लि) | सद्यस्थितीत होणारा पाणी पुरवठा (द.ल.लि) | सदर योजनेतून होणारा पाणी पुरवठा (द.ल.लि. प्रतिदिन) | कमतरता |
|---|---|---|---|---|---|---|
| अ. | वसई विरार महानगरपालिका व मार्गातील 44 गावे | 25 लक्ष | 422 | 400 | 170 | 22 (5.2%) |
| ब. | मिरा-भाईंदर महानगरपालिका | 15 लक्ष | 240 | 195 | 218 | 55 (22.9%) |
| क. | पालघर जिल्ह्यातील 44 गावे | 2.2 लक्ष (सन 2051) | 15 | - | 15 | - |
| एकूण | 403 द.ल.ली | |||||
कराराबाबतची माहिती
- प्रकल्पाची निविदा रक्कम : ₹1329.01 कोटी (या मध्ये 8 वर्षांचे देखभाल व संचालन समाविष्ट आहे)
- प्रकल्प कंत्राटदार: मे. एल अँड टी कन्स्ट्रक्शन
- प्रकल्प सल्लागार: मे. एसटीसी कन्सोर्टियम
- कार्यारंभ आदेश: 04.08.2017
- प्रकल्प कालावधी: 34 महिने
- सुधारित पूर्णता दिनांक: 31.12.2025
WSRMC category



